Ramdas Kadam : बाळासाहेब जिवंत असते तर उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री होऊ दिलं नसतं; रामदास कदमांनी सांगितलं नेमकं कारण
महाविकास आघाडी स्थापनेला आपला अगदी सुरवातीपासूनच विरोध असल्याचे माजी मंत्री रामदास कदम यांनी सांगितले. राष्ट्रवादीबरोबर गेल्यावर पक्षाचे नुकसानच होणार यापेक्षा आपल्या पदरी काहीच पडणार नाही. असे म्हणत राष्ट्रवादीसोबत सत्तेत नको अशी विनंती आपण सत्ता स्थापनेच्या दरम्यानच पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना केली होती.

मुंबई : (Shiv sena) शिवसेना पक्षातून बंड केलेला प्रत्येक आमदार, खासदार हे सध्या असलेली शिवसेना ही (Balasaheb Thackeray) बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना नाही असा उघड आरोप करु लागले आहेत. पक्षाच्या विचारसरणीत मोठा बदल होत असून महाविकास आघाडीबरोबर अनैसर्गिक युती केल्याने तर पक्षाला हिंदुत्वाचा विसर पडतो की असा सवालही बंडखोर आमदरांनी उपस्थित केला आहे. हे सर्व होत असताना मात्र, (Ramdas Kadam) रामदास कदम यांनी बाळासाहेब जिवंत असते तर उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री होऊ दिलं नसतं असे विधान केले आहे. ज्या कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी बरोबर आयुष्यभर संघर्ष केला त्यांच्या सोबत बसून मिळालेले मुख्यमंत्रीपद देखील बाळासाहेब ठाकरे यांना मान्य झालं नसते. त्यांनी उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री होऊच दिले नसते असे कदमांनी ठणकावून सांगितले. त्यामुळे आता उद्धव ठाकरे यांच्या भूमिकेवरुन प्रश्नचिन्ह निर्माण होऊ लागले आहेत.
नेमकं काय म्हणाले आहेत रामदास कदम?
बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदुत्वासाठी अख्ख आयुष्य घालवलं. राष्ट्रवादी काँग्रेससोबत आयुष्यभर संघर्ष केला. त्या शिवसेनाप्रमुखांचा चिरंजीव राष्ट्रवादीसोबत बसून मुख्यमंत्री होतो हे कळल्यावर मी त्यांना हात जोडले. म्हटलं उद्धव जी, हे पाप करू नका. हे साहेबांना आवडणार नाही. आपल्या पक्षाची ताकद वाढवू. व्हा तुम्ही मुख्यमंत्री. आपले आमदार निवडून आणू. पण साहेबांचं असं स्वप्न नव्हतं. ज्या राष्ट्रवादी काँग्रेस सोबत संघर्ष केला. त्यांना घेऊन मुख्यमंत्री व्हा असं स्वप्न साहेबांचं नव्हतं. साहेब जिवंत असते तर उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री होऊ दिलं नसतं.
अनैसर्गिक युती अमान्यच
महाविकास आघाडी स्थापनेला आपला अगदी सुरवातीपासूनच विरोध असल्याचे माजी मंत्री रामदास कदम यांनी सांगितले. राष्ट्रवादीबरोबर गेल्यावर पक्षाचे नुकसानच होणार यापेक्षा आपल्या पदरी काहीच पडणार नाही. असे म्हणत राष्ट्रवादीसोबत सत्तेत नको अशी विनंती आपण सत्ता स्थापनेच्या दरम्यानच पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना केली होती. हा अनैसर्गिक युती असून राष्ट्रवादी कॉंग्रेस ही शिवसेना पक्ष संपवायलाच बसलेली आहे हे देखील निदर्शनास आणून दिल्याचे कदमांनी सांगितले आहे. एवढे सर्व होऊन देखील त्यांचा निर्णय कायम राहिल्यानेच ही वेळ आल्याचे त्यांनी सांगितले आहे.




50 वर्षाचे योगदान अन् मिळाले काय?
ज्या पक्षासाठी आपण 50 वर्ष योगदान दिले त्या पक्षातून हकालपट्टी हे शोभत नाही. स्थानिक पातळीवर आमच्या पदाधिकाऱ्यांनी काम केल्यामुळेच हे पद आपणाला मिळाले असा मु्द्दाही रामदास कदम यांनी उपस्थित केला. सगळं उभा करुन अशा प्रकारे हकालपट्टी होत असेल तर हे वेदनादायी आहे. हे केवळ महाविकास आघाडीमध्ये सहभागी झाल्यामुळे परस्थिती ओढावली आहे. शिवाय राष्ट्रवादी सोबत नको असेही आपण पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना सांगितले असल्याचे कदमांनी स्पष्ट केले.