SMC Election 2022, Ward 17 : आव्हान फक्त एमआयएमलाच; प्रभाग राखणार की गमावणार?
SMC Election 2022, Ward 17 : मतदारसंघाची पुनर्रचना झाल्यानंतर आरक्षण सोडतही निघाली. या आरक्षण सोडतीत बरीच उलथापालथ झाली आहे. खासकरून प्रभाग 17मध्ये मोठी उलथापालथ झाली आहे. एक म्हणजे आताच्या प्रभाग 17 आणि जुन्या प्रभाग 17मध्ये काहीच साम्य राहिलं नाही.
सोलापूर: निवडणुकांचा लोण आता काही फक्त ठरावीक जिल्ह्यांपुरतं राहिलं नाही. ते सर्वदूर पसरलं आहे. मी ती नागपूर महापालिकेची निवडणूक असो की सोलापूर महापालिकेची. (SMC Election 2022) सर्वत्रच महापालिका निवडणुकांची जोरदार चर्चा आहे. त्याला तीन कारण आहेत. एक म्हणजे शिवसेनेत (shiv sena) पडलेली मोठी फूट, दुसरं म्हणजे राज्यात झालेलं सत्तांतर आणि तिसरी तसेच महत्त्वाची गोष्ट म्हणजे ओबीसी आरक्षणाला (obc reservation) सर्वोच्च न्यायालयाकडून मिळालेला हिरवा कंदील. त्यामुळे ज्या महापालिकांमध्ये निवडणुका आहेत, तिथले कार्यकर्ते कामाला लागले आहेत. सोलापूरही त्यात मागे नाही. सोलापूर महापालिकेत भाजपची सत्ता असली तरी ही सत्ता राखण्याचा भाजपकडून जोरदार प्रयत्न होणार आहे. महाविकास आघाडीचं तगडं आव्हान आहे. हे तिन्ही पक्ष एकत्र लढल्यास सोलापूर महापालिकेचा निकाल वेगळा लागू शकतो. त्यामुळे यंदा भाजपला खूप जपून पावलं उचलावी लागणार आहेत.
एमआयएमचा बालेकिल्ला
2017च्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक 17मध्ये एमआयएमचं वर्चस्व होतं. या प्रभागातील चारही वॉर्डात एमआयएमचे चार नगरसेवक निवडून आले होते. विशेष म्हणजे गेल्या महापालिकेत एमआयएमचे एकूण 8 नगरसेवक निवडून आले होते. त्यातील चार नगरसेवक केवळ प्रभाग क्रमांक 17मधील होते. प्रभाग क्रमांक 17 अ मधून वाहिद नदाफ, ब मधून नुतन गायकवाड, क मधून रजिया नदाफ आणि ड मधून वाहिद विजापूरे विजयी झाले होते. हे सर्व नगरसेवक एमआयएमचे होते. यावेळी मात्र मतदारसंघाची फेररचना झाल्याने चित्रं वेगळं असणार आहे.
प्रभाग क्रमांक 17 अ
पक्ष | उमेदवार | विजयी उमेदवार |
---|---|---|
शिवसेना | ||
भाजप | ||
काँग्रेस | ||
राष्ट्रवादी | ||
एमआयएम | ||
अपक्ष/इतर |
तिघांनाच संधी
मतदारसंघाची पुनर्रचना झाल्यानंतर आरक्षण सोडतही निघाली. या आरक्षण सोडतीत बरीच उलथापालथ झाली आहे. खासकरून प्रभाग 17मध्ये मोठी उलथापालथ झाली आहे. एक म्हणजे आताच्या प्रभाग 17 आणि जुन्या प्रभाग 17मध्ये काहीच साम्य राहिलं नाही. जुन्या मतदारसंघातील अनेक विभाग इतर मतदारसंघात गेले आहेत. इतर मतदारसंघातील विभाग या मतदारसंघात आल्याने हा नवाच प्रभाग 17 मतदारसंघ निर्माण झाला आहे. शिवाय मागच्यावेळी चार वॉर्डांचा एक प्रभाग होता. आता तीन वॉर्डांचा एक प्रभाग आहे. त्यामुळे या प्रभागातून केवळ तीनच नगरसेवक पालिकेत जाणार आहेत.
एकाच मतदारसंघात संधी
नव्या प्रभाग क्रमांक 17 मधील अ आणि ब हे दोन वॉर्ड सर्व साधारण महिलांसाठी राखीव झाले आहेत. तर एक प्रभाग खुला झाला आहे. त्यामुळे एकाच मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची पुरुष उमेदवारांना संधी असणार आहे.
प्रभाग क्रमांक 17 ब
पक्ष | उमेदवार | विजयी उमेदवार |
---|---|---|
शिवसेना | ||
भाजप | ||
काँग्रेस | ||
राष्ट्रवादी | ||
एमआयएम | ||
अपक्ष/इतर |
कुठून कुठपर्यंत?
नव्या प्रभागात संगमेश्वर नगर भाग, इस्कॉन टेंपल, नितीन नगर, कामगार वसाहत, सुनील नगर, आशा नगर, विनायक नगर, माळी नगर, एमआयडीसी भाग आदींचा समावेश आहे.
लोकसंख्या काय?
या प्रभागाची एकूण लोकसंख्या 23 हजार 659 एवढी आहे. यात अनुसूचित जातीचे 1441 तर अनुसूचित जमातीचे 407 लोक राहतात.
प्रभाग क्रमांक 17 क
पक्ष | उमेदवार | विजयी उमेदवार |
---|---|---|
शिवसेना | ||
भाजप | ||
काँग्रेस | ||
राष्ट्रवादी | ||
एमआयएम | ||
अपक्ष/इतर |
सोलापूर महापालिका पक्षीय बलाबल (2017)
भाजप 49 शिवसेना 21, काँग्रेस 14 राष्ट्रवादी 04 MIM – 08 माकप – 01 अपक्ष/इतर – 04 रिक्त – 01 एकूण- 113