मर्द असाल तर राऊतांशी स्पर्धा करुन दाखवा.. मग एका हातात बाटली अन् एका हातात ग्लास घेऊ?

बार्शीत आजी-माजी आमदाराने केलेली टीका सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे. आमदार राजेंद्र राऊत यांनी दिलीप सोपल यांना दिलेल्या चॅलेंजला प्रत्युत्तर मिळालंय...

मर्द असाल तर राऊतांशी स्पर्धा करुन दाखवा.. मग एका हातात बाटली अन् एका हातात ग्लास घेऊ?
Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Oct 04, 2022 | 9:41 AM

सागर सुरवसे, सोलापूरः मर्द असाल तर राऊतांशी स्पर्धा करून दाखवा, असं आव्हान देणाऱ्या आमदाराला माजी आमदारानं चांगलंच प्रत्युत्तर दिलंय. आधी हे चॅलेंज दिलं बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत (Rajendra Raut) यांनी…. त्याला प्रत्युत्तर दिलंय माजी आमदारांनी. माजी आमदार दिलीप सोपल (Dilip Sopal) म्हणाले, आमदार राजेंद्र यांच्याबरोबर स्पर्धा करायची असेल तर मला दारू अड्डा, मटका, जुगार धंदा यापासून सुरुवात करावी लागेल… बार्शीतल्या आजी-माजी आमदारांमधील ही शाब्दिक चकमक सध्या सोलापूरमध्ये (Solapur) चर्चेचा विषय ठरलीय. येथील आमदार राजेंद्र राऊत यांनी ओपनली सोपल यांना चॅलेंज दिलं होतं.

राजेंद्र राऊत मागील आठवड्यात म्हणाले होते, दिलीप सोपल तुमच्यात जर दम असेल तर राऊतां बरोबर खेळ खेळा. तेव्हा तुम्हाला खरा मर्द म्हणतो. नाहीतर तुम्ही कोण आहेत ते सगळ्या बार्शीला माहिती आहे….

तुमच्यात धाडस असेल तर आमच्या घराण्याबरोबर स्पर्धा करून दाखवा. तुमच्यापेक्षा निष्क्रियतेमुळे बार्शी तालुक्यात २६ दालमिल, व्यापाराला नुकसान झालंय, असा आरोप राजेंद्र राऊत यांनी केला. त्यावर माजी मंत्री आणि माजी आमदार दिलीप सोपल यांनीही प्रत्युत्तर दिलंय. ते म्हणाले, आमदार राजेंद्र राऊतांनी अदानी, अंबानी, टाटा, बिरला यांना व्यावसायिक स्पर्धा करण्याचे चॅलेंज द्यावे… मी लोकांच्या सेवेत बाराआणे आयुष्य घालवलेला माणूस आहे त्यामुळे राऊतांसोबत मी व्यावसायिक स्पर्धा करायची म्हटलं तर मला एका हातात बाटली, ग्लास घ्यावा लागेल तसेच जुगार, मटका व्यवसायाने सुरुवात करावी लागेल.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.