काही जणांना आजही मुख्यमंत्रिपदाची आस, गुलाबराव पाटलांचा खडसेंना चिमटा
गुलाबराव पाटील नशिराबाद येथे एका कार्यक्रमात बोलत असताना त्यांनी खडसे यांचे नाव न घेता खडसेंवर सडकून टीका केली आहे.
जळगाव – राज्यात जरी महाविकास आघाडीचं सरकार असलं तरी पक्षातल्या नेत्यांमध्ये अंतर्गत वाद असल्याचे वारंवार दिसून आले आहे. तसेच विरोध पक्षातील अनेक नेत्यांनी देखील याबाबत राज्य सरकारवरती टीका केल्याची पाहायला मिळाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (eknath khadase) यांनी जळगाव (jalgaon) जिल्ह्यातील नशिराबाद येथे मी मुख्यमंत्रीपदाचा दावेदार असल्यामुळे माझ्यावर अन्याय झाल्याचे म्हटले होते. त्याचबरोबर असं म्हणतं त्यांनी शिवसेना नेते तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील (gulabrao patil) यांच्यावर देखील एकनाथ खडसे यांनी टीकास्त्र सोडले होते. त्यामुळे दोन नेत्यांमधील वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला होता. अनेक दिवसांपासून जळगावमध्ये गुलाबराव पाटील आणि एकनाथ शिंदे यांच्यात वाद असल्याची चर्चा होती. परंतु दोन्ही नेत्यांनी कार्यक्रमात एकमेकांवर टिका केल्याने दोघांमधील वाद पुन्हा एकदा राज्याच चर्चेचा ठरणार आहे. एकनाथ खडसे नेहमी आपल्या विनोदी बोलण्यातून इतर नेत्यांना चिमटा काढत असतात परंतु गुलाबराव पाटील यांना हा चिमटा जोरदार लागला असल्याने त्यांनी एकनाथ खडसे यांना थेट चॅलेंज केले आहे.
काही जणांना आजही मुख्यमंत्रिपदाची आस, गुलाबराव पाटलांचा खडसेंना चिमटा pic.twitter.com/I5dw6itfF1
— TV9 Marathi (@TV9Marathi) February 21, 2022
गुलाबराव पाटील काय म्हणाले
गुलाबराव पाटील नशिराबाद येथे एका कार्यक्रमात बोलत असताना त्यांनी खडसे यांचे नाव न घेता खडसेंवर सडकून टीका केली आहे. काही लोक माझ्याविषयी नशिराबाद येथे बोलून गेले मात्र ते लपून लढाई करतात. कडाला कड लावून बोलवं, चारीमुंड्या चीत करूनचं हा पाटील नावाचा नाही निघाला तर गुलाबराव नाव लावणार नाही, असे थेट चॅलेंज गुलाबराव पाटील यांनी केले आहे. त्यांना जे जमलं नाही ते मी जमवण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे ते माझ्यावर व्यक्तिगत टीका करायला लागले आहेत. शिवाजी महाराजांच्या सैन्यात ही गद्दारांना जागा नव्हती अशी प्रतिक्रिया देत थेट एकनाथ खडसे यांच्यावर गुलाबराव पाटील यांनी निशाणा साधला.
एकनाथ खडसेंनी काढला होता चिमटा
“आमच्या वडिलोपार्जित कोणी राजकारणात नव्हते. मात्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने शिस्तबद्ध वचनबद्ध सेवाभावी व नामर्दांना स्थान नसलेली संघटना शिवसेना आली व त्यात मी सहभागी झालो, आमदार खासदार मुख्यमंत्री शिवसेनेचे होणार असा स्वप्नातही विचार नव्हता. मात्र त्यामुळे मी मंत्रीपदावर आहे, मात्र काहींना आजही मुख्यमंत्री पदाची आस असल्याचे म्हणत गुलाबराव पाटील यांनी खडसे यांचे नाव न घेता खडसेंना चिमटा काढला होता. दरम्यान नशिराबाद येथे एका कार्यक्रमात शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांनी खडसे यांचे नाव न घेता खडसेंवर सडकून टीका केली आहे.