सोनिया गांधींचं पत्रं म्हणजे दबावतंत्र नाही, राऊतांची सावध प्रतिक्रिया; शिवसेना बॅकफूटवर?
काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेलं पत्रं म्हणजे दबावतंत्र नाही, अशी सावध प्रतिक्रिया शिवसेना नेते संजय राऊत यांनी दिली आहे. (sonia gandhi's letter is not part of pressure tactics says sanjay raut)
मुंबई: काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेलं पत्रं म्हणजे दबावतंत्र नाही. उलट त्यांनी या पत्रात किमान समान कार्यक्रमाशी संबंधित काही मुद्दे मांडले आहेत. त्याचं स्वागतच आहे, अशी सावध प्रतिक्रिया शिवसेना नेते संजय राऊत यांनी दिली आहे. त्यामुळे शिवसेना बॅकफूटवर आल्याचं बोललं जात आहे. (sonia gandhi’s letter is not part of pressure tactics says sanjay raut)
शिवसेना नेते संजय राऊत यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना यूपीएच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या पत्राविषयी छेडण्यात आलं. त्यावर सोनिया गांधी यांचं पत्रं हा दबाव तंत्राचा भाग नाही. सोनिया गांधी या संयुक्त पुरोगामी आघाडीच्या प्रमुख आहेत. राज्यातलं आघाडी सरकार अस्तित्वात आलं तेव्हा किमान समान कार्यक्रम तयार करण्यात आला होता. त्याविषयीचे काही मुद्दे त्यांनी पत्राद्वारे मांडले आहेत. याचा अर्थ हा दबावतंत्राचा भाग आहे, असं समजण्याचं कारण नाही, असं राऊत म्हणाले. किमान समान कार्यक्रमात दलित आणि शोषितांच्या विकासाची हमी देण्यात आली आहे. त्यावर आघाडी सरकार काम करत आहेत. स्वत: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे किमान समान कार्यक्रम कसा लागू होईल, याकडे लक्ष देत आहेत, असंही ते म्हणाले.
राज्यात कोरोनाचं संकट सुरू होतं. त्यामुळे राज्याला मोठी आर्थिक झळ सोसावी लागली. आता कुठे राज्याची आर्थिक गाडी रुळावर येतेय, असं सांगतानाच सोनिया गांधी यांनी या पत्रात मांडलेल्या मुद्द्यांचं स्वागतच असून त्यानुसार काम केलं जाईल, असंही ते म्हणाले.
ही तर सोनियांनी दिलेली पोचपावती: पडळकर
राज्यातील महाविकास आघाडीचं सरकार दलित, आदिवासी आणि वंचित समूहाच्या विरोधातील असल्याचं मी इतक्या दिवसांपासून सांगत होतो. सोनिया गांधी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून त्याची पोचपावतीच दिली आहे, असं सांगतानाच आता तरी सरकारमधील काँग्रेस मंत्र्यांनी सत्तेसाठीची लाचारी झुगारून आपल्या समाजबांधवांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करावा, असं आवाहन भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलं आहे.
काय लिहिलं होतं पत्रात?
महाराष्ट्रातील आदिवासी आणि दलित समाजाच्या विकासासाठी काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले होते. या दोन पानी पत्राद्वारे त्यांनी आदिवासी आणि दलित विकासासाठी लागणारा निधी देण्याची विनंती ठाकरे सरकारला केली होती. तसेच मोठ्या प्रमाणावर जनकल्याणकारी योजना राबवण्याचा सल्लाही त्यांनी ठाकरे सरकारला दिला होता. भविष्यात आदिवासी, दलित लोकांच्या विकासासाठी निधी कमी पडणार नाही, याची शाश्वती काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी दिली असल्याची माहिती महाराष्ट्राचे काँग्रेस प्रभारी एच. के. पाटील यांनी दिली. (sonia gandhi’s letter is not part of pressure tactics says sanjay raut)
SuperFast News | सुपरफास्ट 100 न्यूज | 19 December 2020 https://t.co/Vg0lwK9ELT #Maharashtra
— TV9 Marathi (@TV9Marathi) December 19, 2020
संबंधित बातम्या:
भाजपचं इनकमिंग उद्धव ठाकरेंनी रोखलं? बाळासाहेब सानपांची नाराजी दूर करण्यात यश?
महाआघाडी सरकारमध्ये ऑल इज नॉट वेल? ठाकरे सरकारविरोधात काँग्रेसची चक्क दिल्लीत प्रेस कॉन्फरन्स?
काँग्रेससाठी ऐतिहासिक दिवस; ते ‘स्पेशल 23’ इतिहास घडवणार की विजनवासात जाणार?
(sonia gandhi’s letter is not part of pressure tactics says sanjay raut)