2014 ला काँग्रेसचं पानिपत कुणामुळे? का झालं? आत्मचरित्रात प्रणव मुखर्जींचा मोठा दावा
पक्षातील नेतृत्वाच्या मुद्द्यावरून आधीच काँग्रेसमध्ये शाब्दिक चकमक सुरू असतानाच माजी राष्ट्रपती आणि काँग्रेसचे दिवंगत ज्येष्ठ नेते प्रणव मुखर्जी यांच्या आगामी पुस्तकातील दाव्याने खळबळ उडवून दिली आहे. (Sonia, Manmohan to blame for 2014 poll rout: Pranab Mukherjee in 'The Presidential Years')
नवी दिल्ली: पक्षातील नेतृत्वाच्या मुद्द्यावरून आधीच काँग्रेसमध्ये शाब्दिक चकमक सुरू असतानाच माजी राष्ट्रपती आणि काँग्रेसचे दिवंगत ज्येष्ठ नेते प्रणव मुखर्जी यांच्या आगामी पुस्तकातील एका दाव्याने खळबळ उडवून दिली आहे. 2014मधील लोकसभा निवडणुकीतील पक्षाच्या पराभवाला मुखर्जी यांनी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी आणि तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांना जबाबदार धरले आहे. मी जर पंतप्रधान झालो असतो तर पक्षाला सत्तेबाहेर जावं लागलं नसतं असं पक्षातील काही खासदारांचं म्हणणं आहे, असं सांगत मुखर्जी यांनी थेट सोनिया गांधी आणि मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वावरच सवाल उपस्थित केला आहे. (Sonia, Manmohan to blame for 2014 poll rout: Pranab Mukherjee in ‘The Presidential Years’)
प्रणव मुखर्जी यांचं ‘द प्रेसिडेन्शियल इयर्स’ हे पुस्तक जानेवारी 2021मध्ये प्रकाशित होणार आहे. या पुस्तकात अनेक खळबळजनक दावे करण्यात आले आहेत. मी राष्ट्रपती झाल्यानंतर काँग्रेसची राजकीय दिशा भरकटली. सोनिया गांधी पक्षातील अनेक गोष्टींकडे दुर्लक्ष करत होत्या, असं मुखर्जी यांनी या पुस्तकात म्हटलं आहे. प्रणव मुखर्जी यांचं हे पुस्तक त्यांच्या राष्ट्रपतीपदाच्या कालखंडावर आधारीत आहे. मुखर्जी यांनी यापूर्वी कधीच ज्या गोष्टींवर भाष्य केलं नव्हतं, अशा गोष्टींचा उल्लेख केला आहे. त्यामुळे हे पुस्तक वादळी ठरण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मी 2004मध्ये पंतप्रधान झालो असतो तर 2014मध्ये काँग्रेसला असा मानहानीकारक पराभव स्वीकारावा लागला नसता, असं मला अनेक काँग्रेस खासदारांनी सांगितलं होतं, असा दावा या पुस्तकात करण्यात आला आहे.
काँग्रेसची दिशा भरकटली
मी पंतप्रधान झालो असतो तर पक्षाला मानहानीकारक पराभव स्वीकारावा लागला नसता, असं काँग्रेस खासदारांचं म्हणणं असलं तरी मला मात्र तसं वाटत नाही. पण मी राष्ट्रपती झाल्यानंतर पक्षाची दिशा भरकटली हे मात्र मी मान्य करतो. एककीडे सोनिया गांधी या पक्षातील अनेक गोष्टी पाहिजे तशा हताळत नव्हत्या. तर दुसरीकडे मनमोहन सिंग वारंवार संसदेत गैरहजर राहत असल्याने त्यांचा खासदारांशी संपर्क तुटला होता, असं त्यांनी या पुस्तकात नमूद केलं आहे.
मनमोहन सिंग – मोदी तुलना
मुखर्जी यांनी या पुस्तकात मनमोहन सिंग आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकालाची तुलनाही केली आहे. दोन्ही आजी-माजी पंतप्रधानांच्या काळात मुखर्जी राष्ट्रपती होते. त्यामुळे त्यांनी या दोन्ही नेत्यांच्या कार्यकाळाची तुलना केली आहे. मनमोहन सिंगांचा त्यांचा सर्वाधिक वेळ यूपीए आघाडी टिकवण्यात गेला. त्यामुळे त्याचा कारभारा मोठा परिणाम झाला. तर मोदींनी एकतंत्राचा अवलंब करत सत्ता चालवली. त्यामुळे सरकार, प्रशासन, कायदे मंडळ आणि न्यायपालिकेसोबतच्या त्यांच्या संबंधात कटुता निर्माण झाल्याचं पाहायला मिळालं, असं सांगतानाच मोदींच्या दुसऱ्या कार्यकाळात या संबंधात काही बदल होतो का हे पाहावं लागेल, असंही नमूद करण्यात आलं आहे. (Sonia, Manmohan to blame for 2014 poll rout: Pranab Mukherjee in ‘The Presidential Years’)
VIDEO : SuperFast News | सुपरफास्ट 100 न्यूज | 12 December 2020https://t.co/8rkl3O33qr
— TV9 Marathi (@TV9Marathi) December 12, 2020
संबंधित बातम्या:
LIVE – शरद पवारांचा वाढदिवस, गोपीनाथ मुंडेंची जयंती… जाणून घ्या दिवसभरातील घडामोडी
पवारांच्या UPA अध्यक्षपदावर नवनीत राणा म्हणतात एनिथिंग इज पॉसिबल!
(Sonia, Manmohan to blame for 2014 poll rout: Pranab Mukherjee in ‘The Presidential Years’)