Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“आमदार प्रणिती शिंदे लवकरच कॅबीनेट मंत्री होणार”

सोलापूरच्या काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे लवकरच महाराष्ट्राच्या मंत्रिपदी विराजमान होणार असल्याचा दावा काँग्रेस नेते आणि कृषीराज्यमंत्री विश्वजीत कदम यांनी केलाय. 

आमदार प्रणिती शिंदे लवकरच कॅबीनेट मंत्री होणार
प्रणिती शिंदे, काँग्रेस आमदार
Follow us
| Updated on: Sep 19, 2021 | 9:53 AM

सोलापूर : सोलापूरच्या काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे लवकरच महाराष्ट्राच्या मंत्रिपदी विराजमान होणार असल्याचा दावा काँग्रेस नेते आणि कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम यांनी केलाय.  सोलापुरातील कॉंग्रेसच्या मेळाव्यात बोलताना विश्वजीत कदम यांनी आमदार प्रणिती शिंदे यांच्या मंत्रीमंडळ प्रवेशाबाबत भाष्य केले आणि शिंदे समर्थकांना आश्चर्याचा धक्का दिला.

प्रणिती शिंदे लवकरच कॅबीनेट मिनिस्टर

यावेळी बोलताना विश्वजीत कदम म्हणाले, आमदार प्रणिती शिंदे आमच्यासोबत मंत्रीमंडळात नाहीत याची खंत वाटते. मात्र कदाचित लवकरच प्रणिती शिंदे या राज्य मंत्रिमंडळात राज्यमंत्रीच नव्हे तर कॅबिनेट मंत्री होतील असे विधान त्यांनी केले.

विश्वजीत कदमांच्या विधानाने प्रणिती समर्थकांचा टाळ्यांचा कडकडाट

विश्वजीत कदम यांच्य विधानाने उपस्थित शिंदे समर्थकांनी टाळ्यांच्या कडकडाटात त्यांच्या विधानाचे स्वागत केले. आमदार प्रणिती शिंदे यांना मोठा वारसा आहे, जनताही त्यांना निवडून देते, मात्र काँग्रेस पक्षाने त्यांना एकदाही मंत्री म्हणून काम करण्याची संधी दिली नाही. खरं तर विश्वजीत कदम सोलापुरात आढावा बैठकीसाठी आले होते. पण त्यांनी संघटनेतील कार्यकर्त्यांनाही चार्ज केल्याची चर्चा पाहायला मिळाली.

प्रणिती शिंदेंना मंत्री म्हणून काम करण्याची अद्याप संधी नाही

अभ्यासू आणि व्यासंगी राजकारणी, दांडगा लोकसंपर्क, आक्रमकता, मनमिळावू स्वभाव आणि प्रभावी वक्तृत्व कौशल्य या बळावर काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांनी राज्याच्या राजकारणात आपली स्पेस निर्माण केली आहे. त्यांचे वडील सुशीलकुमार शिंदे देशातील ज्येष्ठ नेते आहेत. वडील माजी केंद्रीय मंत्री आणि माजी मुख्यमंत्री असूनही प्रणिती यांनी राजकारणात आपला स्वतंत्र ठसा उमटवला आहे. आमदार म्हणून त्यांनी स्वत:ला सिद्ध केलं आहे. पण मंत्री म्हणून सिद्ध करण्याची संधी त्यांना अद्याप मिळालेली नाही.

वयाच्या 28 व्या वर्षी आमदार

प्रणिती शिंदे या वयाच्या 28व्या वर्षीच आमदार झाल्या. 2009मध्ये त्यांनी सोलापुरातून पहिली निवडणूक लढवली. पहिल्याच निवडणुकीत त्यांनी 33 हजार मतांनी दणदणीत विजय मिळवला. त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिलं नाही. सलग तीन वेळा त्या विधानसभेवर निवडून आल्या आहेत. विशेष म्हणजे 2014 आणि 2019च्या विधानसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींची लाट असतानाही त्या निवडून आल्या हे विशेष.

प्रणिती यांना वडिलांकडून राजकारणाचे धडे

प्रणिती यांना ग्लॅमरस राजकारणी म्हणूनही ओळखलं जातं. त्यांचे वडील सुशीलकुमार शिंदे हे देशातील मोठे नेते आहेत. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते असलेले सुशीलकुमार शिंदे हे माजी केंद्रीय ऊर्जा मंत्री आणि माजी केंद्रीय गृहमंत्री आहेत. तसेच शिंदे हे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्रीही आहेत. प्रणिती यांच्यावर बालपणापासून राजकारणाचे संस्कार झाले. वडिलांकडे पाहूनच त्यांनी राजकारणाचे धडे गिरवले. घरी राजकारणी मंडळींच्या रंगणाऱ्या गप्पा, चर्चा या वातावरणातूनच त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. त्यातूनच त्यांची जडणघडण झाली.

हे ही वाचा :

सत्ता आली नसती पण संजय राऊतांच्या अंगात आलं आणि सरकार स्थापन झालं : विश्वजीत कदम

सुरक्षा यंत्रणांना चकवा देण्यासाठी अतिरेक्यांनी वापरले कोड नेम
सुरक्षा यंत्रणांना चकवा देण्यासाठी अतिरेक्यांनी वापरले कोड नेम.
टिट फॉर टॅट उत्तर द्यायला हवं; पहलगाम हल्ल्यावर जलील थेट बोलले
टिट फॉर टॅट उत्तर द्यायला हवं; पहलगाम हल्ल्यावर जलील थेट बोलले.
गिरीश महाजन श्रीनगरला रवाना; 4 पार्थिव मुंबईत, 2 पार्थिव पुण्यात येणार
गिरीश महाजन श्रीनगरला रवाना; 4 पार्थिव मुंबईत, 2 पार्थिव पुण्यात येणार.
सैन्याच्या वेशात आले आतंकवादी; खरे सैन्य आल्यावर जे झालं ते..
सैन्याच्या वेशात आले आतंकवादी; खरे सैन्य आल्यावर जे झालं ते...
निष्पाप भारतीयांचा जीव घेणाऱ्या चार नराधमांचा फोटो आला समोर
निष्पाप भारतीयांचा जीव घेणाऱ्या चार नराधमांचा फोटो आला समोर.
सुरक्षा यंत्रणेकडून नराधम दहशतवाद्यांचे स्केच जारी
सुरक्षा यंत्रणेकडून नराधम दहशतवाद्यांचे स्केच जारी.
गृहमंत्री अमित शाह बैसरन खोऱ्यात पोहोचले
गृहमंत्री अमित शाह बैसरन खोऱ्यात पोहोचले.
पहलगाममधील मृत कौस्तुभ गनबोटेच्या काकींना अश्रु अनावर
पहलगाममधील मृत कौस्तुभ गनबोटेच्या काकींना अश्रु अनावर.
भारतीय जवानांकडून 2 दहशतवाद्यांचा खात्मा; मोठा शस्त्रसाठा जप्त
भारतीय जवानांकडून 2 दहशतवाद्यांचा खात्मा; मोठा शस्त्रसाठा जप्त.
हल्ल्यानंतर काय आहे पहलगामची परिस्थिती?
हल्ल्यानंतर काय आहे पहलगामची परिस्थिती?.