Ajit Pawar | अजित पवारांची एक भेट आणि काम फत्ते
समोर आलेल्या कार्यकर्त्यांना निराश न करता थेट एक घाव दोन तुकडे हा अजित पवार यांचा स्वभाव असल्यानं त्यांच्या भेटीसाठी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं गर्दी करतात.
बारामती : समोर आलेल्या कार्यकर्त्यांना निराश न करता थेट एक घाव दोन तुकडे हा अजित पवार यांचा स्वभाव असल्यानं त्यांच्या भेटीसाठी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं गर्दी करतात. बारामतीतही आज (24 जानेवारी) अजित पवार यांच्या भेटीसाठी लांबच्या लांब रांगा लागल्या. याच निमित्ताने अजित पवार यांच्या कामाची पद्धत आणि नागरिकांनी आपली गाऱ्हाणी मांडल्यानंतर त्यावर त्यांनी घेतलेले तात्काळ निर्णय याचा आढावा घेणारा हा विशेष वृत्तांत (Special Report on Ajit Pawar effort to solve peoples problem Janata Darbar in Baramati).
बारामतीतील विद्या प्रतिष्ठान शैक्षणिक संकुलाच्या परिसरात आज वेगळंच चित्र पाहायला मिळालं. या ठिकाणी नागरिकांनी खास उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेण्यासाठी लांबच लांब रांगा केल्या. कुणी सार्वजनिक कामासाठी, तर कुणी व्यक्तीगत गाऱ्हाणं घेऊन इथं आले होते. अनेक नेते वातानुकुलित कक्षात बसून जनतेच्या अडीअडचणी ऐकतात. इथं मात्र रांगेत उभ्या असलेल्या नागरिकांजवळ जाऊन अजित पवार त्यांचं म्हणणं ऐकतात. सोबत असलेल्या अधिकाऱ्यांना लागलीच सूचना देत ही कामं मार्गी लावतात.
1991 पासून अजित पवारांकडून बारामतीकरांसाठी वेगळा एक दिवस
आपल्या मतदारसंघासह परिसरातील जनतेला कामानिमित्त मुंबई पुण्याला यावं लागू नये यासाठी अजित पवार आपला एक दिवस बारामतीसाठी देतात. 1991 पासून नागरिकांसाठी अजित पवार वेळ देतात. त्यामुळंच इथली जनता पवार कुटुंबियांवर भरभरुन प्रेम करत असल्याचं ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर सांगतात.
इथं येणाऱ्या नागरिकांच्या समस्येचं निराकरण झालं की नाही याबद्दलही आढावा घेतला जातो. आजही अनेक नागरिक आपल्या समस्या घेऊन अजित पवारांना भेटले. यावेळी अजित पवार यांनी आपल्या स्टाईलने ही कामं तात्काळ मार्गी लावली. त्यामुळंच इथं विविध कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांच्या चेहऱ्यावर एक समाधान पहायला मिळतं. त्याचवेळी त्यांच्या प्रतिक्रियाही तितक्याच बोलक्या असतात.
काम होणार असेल तरच होकार द्यायचा ही अजित पवारांची खासीयत
एखादं काम होणार असेल तरच संबंधित व्यक्तीला होकार द्यायचा ही अजित पवार यांची खासीयत आहे. त्यामुळंच अजित पवारांजवळ कार्यकर्त्यांची गर्दी नेहमीच पहायला मिळते. अर्थात जनतेची कामं तत्परतेनं मार्गी लावण्याची इच्छाशक्तीही महत्वाची असते. त्यामुळंच भल्या पहाटे जनतेच्या कामासाठी अजित पवार सज्ज असतात. त्यातूनच त्यांची जनतेबद्दलची आत्मियता अनुभवायला मिळते.
हेही वाचा :
…आणि बारामतीत बघता बघता दादांच्याभोवती रविवारीही गराडा पडला…
मोठी बातमी: बारामतीत अजित पवार आणि शिवेंद्रराजेंची भेट; महिन्याभरातील तिसऱ्या भेटीने चर्चांना उधाण
भाजपला आणखी एक झटका?, पुण्यातील माजी आमदार राष्ट्रवादीत जाणार; अजितदादांशी खलबतं!
व्हिडीओ पाहा :
Special Report on Ajit Pawar effort to solve peoples problem Janata Darbar in Baramati