Special Report | शरद पवार आणि राजू शेट्टी यांच्या मैत्रीचा नवा अध्याय, राष्ट्रवादी आणि स्वाभिमानातील संघर्ष ते मैत्रीचा राजकीय प्रवास

राष्ट्रवादी काँग्रेसने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांना विधानपरिषदेची आमदारकी दिली (Raju Shetty-Sharad Pawar Friendship) आहे.

Special Report | शरद पवार आणि राजू शेट्टी यांच्या मैत्रीचा नवा अध्याय, राष्ट्रवादी आणि स्वाभिमानातील संघर्ष ते मैत्रीचा राजकीय प्रवास
Follow us
| Updated on: Jun 20, 2020 | 7:47 PM

कोल्हापूर : राष्ट्रवादी काँग्रेसने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांना विधानपरिषदेची आमदारकी दिली आहे. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि राजू शेट्टी यांच्या मैत्रीचा अध्याय सुरु झाला आहे. एकमेकांना टोकाचा विरोध ते पक्षाच्या चिन्हावर विधानपरिषद सदस्य असा हा प्रवास आहे. राजकारणात कोणीच कोणाचा कायमचा शत्रू किंवा मित्र नसतो हे शरद पवार आणि राजू शेट्टी यांच्यात घट होत चाललेल्या मैत्रीवरुन पुन्हा एकदा अधोरेखित होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि स्वाभिमानीमधील संघर्ष ते मैत्री राजकीय प्रवास या स्पेशल रिपार्टमधून… (Raju Shetty-Sharad Pawar Friendship)

शेतकऱ्यांच्या ऊसाला योग्य दर मिळवून देण्याच्या उद्देशाने 20 वर्षांपूर्वी राजू शेट्टी आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेची स्थापना केली. ऊस दराचा प्रश्न कारखानदारांचे संबंधित असल्याने साहजिकच राजू शेट्टी यांनी कारखानदारांना लक्ष करायला सुरुवात केली. तत्कालीन परिस्थितीत राज्यातील बहुतांशी कारखानदार काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसशी संबंधित आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार या कारखानदारांचे नेते होते आणि आज ही आहेत. त्यामुळे राजू शेट्टी यांचा हा संघर्ष सहाजिकच शरद पवार यांच्यापर्यंत गेला. राजू शेट्टी यांनी संधी मिळेल तेथे तत्कालीन कृषीमंत्री असलेल्या शरद पवार यांच्यावर आरोप केले.

अगदी उसाच्या दरापासून ते कांदा निर्यात बंदीला देखील शेट्टी यांनी पवार यांना जबाबदार धरलं. शरद पवार यांनी राजू शेट्टी यांच्या आरोपाला कधी फारसं गांभीर्यानं घेतलं नसलं तरी सातत्याने होणाऱ्या आरोपामुळे शरद पवार आणि पर्यायाने राष्ट्रवादीच्या राजकीय वाटचालीवर परिणाम होत गेले. स्वाभिमानी आणि राष्ट्रवादीमधील संघर्ष इतका टोकाला गेला की राजू शेट्टी यांनी थेट बारामतीमध्ये जाऊन पवार यांच्या विरोधात आंदोलन केलं.

2014 च्या निवडणुकांमध्ये शेट्टी यांनी पवारांना विरोध म्हणून भाजपसोबत जाणं पसंत केलं. मात्र अवघ्या दोन वर्षात त्यांचा भ्रमनिरास झाला. 2019 ला शेट्टी यांना काँग्रेस राष्ट्रवादी सोबत जाणं भाग पडलं.

2019 च्या निवडणुकीत स्वाभिमानी शेतकरी संघटना महाविकासआघाडी सोबत गेली. मात्र शरद पवार यांच्याविरोधात शेट्टी यांनी आंदोलन केलं. तेच शेट्टी कारखानदार आणि शरद पवार यांच्यासोबत एकाच व्यासपीठावर बसणं शेतकऱ्यांना आवडलं नाही. त्याचा परिणाम म्हणून राजू शेट्टी यांना पराभवाला सामोरे जावं लागलं.

मागच्या वर्षी झालेल्या निवडणुकीनंतर शरद पवार आणि राजू शेट्टी यांच्यातील दुरावा संपूर्ण मैत्रीचा एक नवं पर्व सुरू झालं. आता राष्ट्रवादीच्या कोट्यातून शेट्टी यांना विधानपरिषदेवर पाठवण्याचा निर्णय घेऊन शरद पवार यांनी ही मैत्री अधिक घट्ट करण्याचा प्रयत्न केला आहे. या निर्णयामुळे स्वाभिमानीत अस्वस्थता निर्माण झाली मात्र राजू शेट्टी आपल्या सहकाऱ्यांची नाराजी दूर करण्यात यशस्वी झाले आहेत.

देशाच्या राजकारणात मुरब्बी राजकारणी असलेले शरद पवार आपल्यावर झालेल्या आरोपांना थेट उत्तर देत नसले हे त्यांच्या लक्षात असतात. योग्य वेळी ते आपल्या कृतीतून ते दाखवून देतात. राजू शेट्टी यांनी शरद पवार यांच्यावर केलेले टोकाचे आरोप आणि त्यानंतर शरद पवार यांनी मैत्रीसाठी पुढे केलेला हात आजही अनेकांना शंकास्पद वाटत आहे. मात्र तूर्तास तरी स्वाभिमानीला आपलं अस्तित्व टिकवायचं असेल, तर शरद पवार यांचा हात धरुन पुढे जावं लागणार आहे.  (Raju Shetty-Sharad Pawar Friendship)

संंबंधित बातम्या : 

राजू शेट्टींच्या विधानपरिषदेचा मार्ग मोकळा, स्वाभिमानीतील वाद मिटला

तुम्ही आमदारकी स्वीकारावी, ही शेतकऱ्यांची भावना, राजू शेट्टी यांना महिला प्रदेशाध्यक्षाचं रक्ताने लिहिलेलं पत्र

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.