एसटी महामंडळ संपाबाबत अवमान याचिका दाखल करणार! संप मागे घेण्याचं परिवहन मंत्र्यांचं आवाहन
महागाई भत्ता आणि घरभाडे वाढीबाबतची मागणी मान्य करण्यात आली आहे. मात्र एसटीचे राज्य सरकारमध्ये विलिनीकरण करण्याच्या मागणीबाबत अद्याप तोडगा निघू शकला नाही. अशावेळी राज्य सरकारकडून नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी पर्यायी व्यवस्था केली जात असल्याची माहिती अनिल परब यांनी दिलीय.
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप सुरुच आहे. महागाई भत्ता आणि घरभाडे वाढीबाबतची मागणी मान्य करण्यात आली आहे. मात्र एसटीचे राज्य सरकारमध्ये विलिनीकरण करण्याच्या मागणीबाबत अद्याप तोडगा निघू शकला नाही. अशावेळी राज्य सरकारकडून नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी पर्यायी व्यवस्था केली जात असल्याची माहिती अनिल परब यांनी दिलीय. (ST Corporation to file contempt petition against employees’ strike, Information by Anil Parab)
एसटीचा संप सुरु आहे. त्यामुळे नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी व्यवस्था करत आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या ज्या 3 मागण्या आहेत, त्या मान्य केल्या गेल्या होत्या. मात्र, विलिनीकरणासंदर्भात नवी मागणी केलीय. हायकोर्टानं दिलेल्या आदेशानंतर समिती स्थापन केली आहे. ही समिती पुढील विचारविनिमय करेल. हायकोर्टानं हा संप बेकायदेशीर आहे असं जाहीर करुनही हा संप सुरुय. कोर्टानं सूचना केलीय की अवमान याचिका दाखल करु शकता. त्यानुसार एसटी महामंडळ संपाबाबत अवमान याचिका दाखल करत आहे, असंही अनिल परब यांनी सांगितलं.
‘यशस्वी मार्ग काढण्याचा प्रयत्न सुरु’
एसटी कर्मचाऱ्यांच्या विलिनीकरणाच्या मागणीचा निर्णय उच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे कमिटीच करेल. महामंडळावर आर्थिक भाग प्रचंड आहे. 12 हजार कोटीच्या संचित तोट्यात एसटी महामंडळ आहे. मी कर्मचाऱ्यांना सतत आवाहन करतोय. यशस्वी मार्ग काढण्याचा प्रयत्न सुरु आहे. सध्याचे आंदोलन बेकायदेशीर आहे. मुख्यमंत्र्यांशी याबाबत बोलणं झालंय. कामगारंच्या मागण्यांचा सामोपचारानं विचार करुन निर्णय घेतला जाईल, असं त्यांचं म्हणणं आहे. प्रवाशांची गैरसोय होतेय. खासगी बसेस, स्कूल बसेस, गुड्स कॅरिअरना तात्पुरत्या प्रवासी वाहतुकीला परवानगी देत असल्याचं परब यांनी जाहीर केलंय.
‘विलिनीकरणाच्या विषयावर चर्चा महत्वाची’
राज्य सरकारमध्ये एसटीच्या विलिनीकरणाचा विषय हा धोरणात्मक निर्णय आहे. हा निर्णय घेताना सर्व बाबिंचा विचार करुन निर्णय घ्यावा लागतो. एक दोन दिवसांत हा निर्णय होणार नाही म्हणून चर्चा महत्वाची असल्याचं अनिल परब म्हणाले.
महागाई भत्ता आता 17 टक्के होणार
महागाई भत्त्यात वाढ करावी, अशी कर्मचाऱ्यांची मागणी होती. या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत महागाई भत्त्यात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला. सध्या कर्मचाऱ्यांना 12 टक्के महागाई भत्ता मिळत आहे, त्यात आणखी 5 टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे अधिकारी-कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता आता 17 टक्के होणार असल्याचे परब यांनी यावेळी सांगितले.
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ (#ST) कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ५ टक्के वाढ करण्यात आली आहे. तसेच दिवाळीची भेट म्हणून अधिकाऱ्यांना ५ हजार रूपये तर कर्मचाऱ्यांना २५०० रूपये देण्यात येणार असल्याची घोषणा परिवहन मंत्री @advanilparab यांनी केली. pic.twitter.com/owJ6t6BZlt
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) October 25, 2021
इतर बातम्या :
देवेंद्र फडणवीसांनी मलिकांविरोधात ‘बॉम्ब’ फोडला! मलिकांचा मुलगा म्हणतो ‘सर्व व्यवहार कायदेशीर’!
ST Corporation to file contempt petition against employees’ strike, Information by Anil Parab