निर्णय होत नाही, तोपर्यंत मुंबई सोडणार नाही, राज्यातल्या एसटी कर्मचाऱ्यांना लेकरा बाळांसह मुंबई गाठण्याचं आवाहन

आझाद मैदानावर विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, भाजप आमदार गोपीचंद पडळकर, रयत क्रांती संघटनेचे नेते आणि आमदार सदाभाऊ खोत, भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या नेतृत्वात हजारो एसटी कर्मचारी एकत्र जमले आहेत.

निर्णय होत नाही, तोपर्यंत मुंबई सोडणार नाही, राज्यातल्या एसटी कर्मचाऱ्यांना लेकरा बाळांसह मुंबई गाठण्याचं आवाहन
गोपीचंद पडळकर, आमदार, भाजप
Follow us
| Updated on: Nov 10, 2021 | 2:53 PM

मुंबई : ऐन दिवाळीच्या तोंडावर सुरु झालेलं एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन अधिक पेटण्याची शक्यता आहे. आझाद मैदानावर विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, भाजप आमदार गोपीचंद पडळकर, रयत क्रांती संघटनेचे नेते आणि आमदार सदाभाऊ खोत, भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या नेतृत्वात हजारो एसटी कर्मचारी एकत्र जमले आहेत. अशावेळी गोपीचंद पडळकर यांनी ठाकरे सरकारवर जोरदार हल्ला चढवलाय. जोपर्यंत एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोवर मुंबई सोडणार नाही, अशी घोषणाच पडळकर यांनी केलीय. (Criticism of BJP MLAs Gopichand Padalkar and Praveen Darekar on the issue of ST employees)

राज्य सरकार म्हणतं एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड केली. जर दिवाळी गोड केली तर आत्महत्या का झाल्या? असा सवाल पडळकर यांनी केलाय. 35 कर्मचाऱ्यांनी आतापर्यंत आत्महत्या केल्या आहेत. हे तुमचं आंदोलन आहे, पण जबाबदारी आमची आहे. माणुसकीच्या हेतुनं आम्ही तुमच्यासोबत आहेत. सरकारकडे खायला पैसे आहेत, गरीबांना द्यायला नाहीत. त्यामुळे आता मागण्या पूर्ण होईपर्यंत माघार नाही, अशी घोषणाच पडळकर यांनी केलीय. आम्ही तुमच्यासोबत इथेच झोपणार. बायका-मुलांना बोलावून घ्या. मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत मुंबई सोडणार नाही, असा इशारा पडळकर यांनी दिलाय.

प्रवीण दरेकरांचाही ठाकरे सरकारवर घणाघात

संकटाच्या काळात एसटी कर्मचारी तुम्हाला चालतो. पण विलिनीकरणाचा मुद्दा आला तेव्हा अवमान याचिका दाखल करता. कर्मचारी संकटात असताना तुम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष करता. मी इथे विरोधी पक्षनेता म्हणून आलेलो नाही. एसा एसटी कर्मचाऱ्यांचा मुलगा म्हणून तुमच्यासमोर आलोय. मला तुमचं दु:ख माहिती आहे, अशी खंत प्रवीण दरेकर यांनी व्यक्त केलीय. त्यावेळी दरेकर भावूक झाल्याचं पाहायला मिळाले.

अनिल परब यांच्यावर जोरदार टीका

किरीट सोमय्यांमुळे अनिल परब पळून जायला नकोत. परब पळून गेले तर आम्हाला न्याय कोण देणार? असा खोचक सवाल करत दरेकर यांनी अनिल परब यांच्यावर जोरदार टीका केलीय. सर्व एसटी कर्मचारी संघटनांना आवाहन आहे, तुमच्याकडे मोर्चा वळवायला लावू नका. कर्मचाऱ्यांच्या जीवावर तुम्ही मोठे झाले आहात. आता कर्मचाऱ्यांचा विचार करा. तुम्ही एसीत बसा पण आम्हाला एसटी कर्मचाऱ्यांना बसायला तरी व्यवस्थित जागा द्या, अशी खोचक टीकाही दरेकर यांनी केलीय. त्याचबरोबर मंत्रालयात बसलेल्यांना अजूनही जाग येत नाही. एसटी कर्मचाऱ्यांसाठी 100 वेळा उंबरठे झिजवायला तयार आहे. न्याय मिळवल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही, असा इशाराही दरेकर यांनी यावेळी दिलाय.

इतर बातम्या :

Uddhav Thackeray Appeal to ST Workers: तुम्ही आमचेच आहात, तुमच्या मागण्या मान्य करण्यासाठी शासन प्रयत्नशील, उद्धव ठाकरेंचं ST कर्मचाऱ्यांना आवाहन

आता बाळासाहेबांच्या स्मृती स्थळावर गोमूत्र शिंपडण्याची वेळ आलीय, नितेश राणेंचा मुख्यमंत्र्यांना टोला

Criticism of BJP MLAs Gopichand Padalkar and Praveen Darekar on the issue of ST employees

... अन् एकटी महिला भिडली, छेड काढणाऱ्याला चांगलंच चोपल, बघा व्हिडीओ
... अन् एकटी महिला भिडली, छेड काढणाऱ्याला चांगलंच चोपल, बघा व्हिडीओ.
मुंबईतील काँग्रेस कार्यालयात घुसून आंदोलन करणं 'भाजप युवा'च्या अंगाशी
मुंबईतील काँग्रेस कार्यालयात घुसून आंदोलन करणं 'भाजप युवा'च्या अंगाशी.
'ए अंबादास खाली बस...', शिंदेंनी विरोधकांना फटकारलं, सभागृहात काय झाल?
'ए अंबादास खाली बस...', शिंदेंनी विरोधकांना फटकारलं, सभागृहात काय झाल?.
'.. आता भाजपची वाट', सुषमा अंधारे यांचा नेमका कोणाला खोचक टोला?
'.. आता भाजपची वाट', सुषमा अंधारे यांचा नेमका कोणाला खोचक टोला?.
बीड सरपंच संतोष देशमुखांची हत्या, शवविच्छेदन अहवालातून काय आलं समोर?
बीड सरपंच संतोष देशमुखांची हत्या, शवविच्छेदन अहवालातून काय आलं समोर?.
अचानक संध्याकाळी 17 लाख मतं वाढली? EVMच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर
अचानक संध्याकाळी 17 लाख मतं वाढली? EVMच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर.
'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?
'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?.
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?.
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका.
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर.