‘फडणवीसांच्या काळात मुनगंटीवारांकडे गेल्यावर हाकलून दिलं होतं’, एसटी कर्मचारी आंदोलनावरुन राऊतांचा भाजपवर पलटवार
एसटी कर्मचाऱ्यांच्या मागणीबाबत सरकारला सहानुभूती आहे. शिवसेना कामगार क्षेत्रातून जन्माला आली आहे. शिवसेना कष्टकऱ्यांचे नेतृत्व करते. एसटी कर्मचारी आज ज्या मागण्या करत आहेत, त्या मागण्या घेऊन फडणवीस मुख्यमंत्री असताना मुनगंटीवार यांच्याकडे गेल्यावर त्यांना हाकलून देण्यात आलं होतं, असा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केलाय.
नवी दिल्ली : एसटी कर्मचारी आंदोलनावरुन राज्यातील राजकारण तापण्याची शक्यता आहे. भाजप नेत्यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला पाठिंबा दिला आहे. गोपीचंद पडळकर यांच्यासह प्रवीण दरेकर, किरीट सोमय्या, सदाभाऊ खोत यांनी आज परिवहन मंत्री अनिल परब आणि ठाकरे सरकारवर जोरदार टीका केलीय. या पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपवर पलटवार केलाय. (MP Sanjay Raut criticizes BJP leaders over ST workers’ agitation)
एसटी कर्मचाऱ्यांच्या मागणीबाबत सरकारला सहानुभूती आहे. शिवसेना कामगार क्षेत्रातून जन्माला आली आहे. शिवसेना कष्टकऱ्यांचे नेतृत्व करते. एसटी कर्मचारी आज ज्या मागण्या करत आहेत, त्या मागण्या घेऊन फडणवीस मुख्यमंत्री असताना मुनगंटीवार यांच्याकडे गेल्यावर त्यांना हाकलून देण्यात आलं होतं, असा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केलाय. भाजप एसटी कर्मचाऱ्यांची माथी भडकवत आहेत. आम्हाला कामगारांचे प्रश्न कुणी शिकवण्याची गरज नाही. कर्मचाऱ्यांनी भूलथापांना बळी पडू नये, असं आवाहनही राऊत यांनी एसटी कर्मचाऱ्यांना केलं आहे.
‘भाजपनं मशीन तयार केलीय, त्यात सगळे स्वच्छ होतात’
भाजपनं मशीन तयार केलीय. त्यात सगळे स्वच्छ होतात, अशी त्यांच्याकडे वॉशिंग मशीन आहे. साधू-संतांचे राजकारण राहिलं नाही. निवडणूक जिंकण्यासाठी राजकारण वेगळ्या थराला गेलं आहे. हे कुठेतरी थांबलं पाहिजे. आज प्रमुख माणसाने लक्ष घातलं पाहिजे. राज्याची आर्थिक परिस्थिती समजून घेतली पाहिजे, असंही संजय राऊत म्हणाले.
संवेदनशीलतेनं संपाकडे पाहा, फडणवीसांचं आवाहन
‘एसटी संपाबाबत सरकारची भूमिका असंवेदनशील. संप चिघळू नये असं आम्हाला वाटतं पण सरकार दमनशाहीचा वापर करत आहे. हे आंदोलन चिघळण्याचा प्रयत्न होत असेल तर ते अजून वाढेल. चर्चेतून मार्ग काढला पाहिजे. कर्मचाऱ्यांना दिलासा द्यायला हवा. राज्य सरकारनं तात्काळ चर्चा करुन यावर तोगडा काढायला हवा. आम्ही सरकारला पूर्ण सहकार्य करायला तयार. आमचे आमदार गोपीचंद पडळकर, इतर सर्व आमदार, सदाभाऊ खोत आंदोलनात आहेत. सरकारनं संवेदनशीलता दाखवावी’, असं आवाहन फडणवीस यांनी ठाकरे सरकारला केलंय.
एसटी कर्मचार्यांच्या मागण्यासंदर्भात राज्य सरकार असंवेदनशील आहे आणि सध्या होत असलेल्या आंदोलनाची राज्य सरकारने त्वरित दखल घ्यावी! नागपूर येथे माध्यमांशी साधलेला संवाद..https://t.co/fGwDI6pxvi pic.twitter.com/XXZmVTJ7sj
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) November 10, 2021
मागण्या मान्य होईपर्यंत मुंबई सोडणार नाही- पडळकर
राज्य सरकार म्हणतं एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड केली. जर दिवाळी गोड केली तर आत्महत्या का झाल्या? असा सवाल पडळकर यांनी केलाय. 35 कर्मचाऱ्यांनी आतापर्यंत आत्महत्या केल्या आहेत. हे तुमचं आंदोलन आहे, पण जबाबदारी आमची आहे. माणुसकीच्या हेतुनं आम्ही तुमच्यासोबत आहेत. सरकारकडे खायला पैसे आहेत, गरीबांना द्यायला नाहीत. त्यामुळे आता मागण्या पूर्ण होईपर्यंत माघार नाही, अशी घोषणाच पडळकर यांनी केलीय. आम्ही तुमच्यासोबत इथेच झोपणार. बायका-मुलांना बोलावून घ्या. मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत मुंबई सोडणार नाही, असा इशारा पडळकर यांनी दिलाय.
इतर बातम्या :
किरीट सोमय्यांमुळे अनिल परब पळून गेले तर आम्हाला न्याय कोण देणार? प्रवीण दरेकरांची घणाघाती टीका
इंधन दरवाढीविरोधात काँग्रेस पुन्हा आक्रमक, 14 ते 19 नोव्हेंबरदरम्यान राज्यव्यापी आंदोलनाची घोषणा
MP Sanjay Raut criticizes BJP leaders over ST workers’ agitation