एसटी कर्मचारी आमचेच, भाजप नेत्यांकडून आंदोलनात घुसखोरी; जयंत पाटलांची भाजपवर टीका

'एसटी महामंडळाचे कर्मचारी आमचेच आहेत. महाविकास आघाडी सरकारने त्यांच्याकडे दुजाभावाने कधीच पाहिले नाही. त्यांचे प्रश्न सोडविण्याची सरकारची पूर्ण इच्छा आहे. पण भाजपचे नेते आंदोलनात पुढे जाऊन बसत आहेत, दंगा करत आहेत, अर्वाच्च बोलत आहेत. या सर्व राजकीय गोष्टी होत असल्यामुळे त्याला राजकीय पद्धतीनेच उत्तर दिले जात असल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले.

एसटी कर्मचारी आमचेच, भाजप नेत्यांकडून आंदोलनात घुसखोरी; जयंत पाटलांची भाजपवर टीका
जयंत पाटील, जलसंपदा मंत्री
Follow us
| Updated on: Nov 12, 2021 | 4:44 PM

मुंबई : एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनावरुन राज्यात राजकीय वातावरन ढवळून निघाल्याचं पाहायला मिळत आहे. सत्ताधारी महाविकास आघाडी आणि विरोधी पक्ष असलेल्या भाजप नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाच्या मुद्द्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी भाजप नेत्यांवर जोरदार टीका केलीय. ‘एसटी महामंडळाचे कर्मचारी आमचेच आहेत. महाविकास आघाडी सरकारने त्यांच्याकडे दुजाभावाने कधीच पाहिले नाही. त्यांचे प्रश्न सोडविण्याची सरकारची पूर्ण इच्छा आहे. पण भाजपचे नेते आंदोलनात पुढे जाऊन बसत आहेत, दंगा करत आहेत, अर्वाच्च बोलत आहेत. या सर्व राजकीय गोष्टी होत असल्यामुळे त्याला राजकीय पद्धतीनेच उत्तर दिले जात असल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले. (Jayant Patil alleges BJP leaders infiltrated ST workers’ agitation)

परिवहन मंत्री अनिल परब कर्मचाऱ्यांच्या संघटनांशी चर्चा करत आहेत. हे प्रश्न लवकर सुटावेत, हीच राज्यसरकारची भूमिका आहे. आजपर्यंत सरकारी किंवा निमसरकारी कर्मचाऱ्यांची आंदोलने ही त्यांच्या संघटनांकडून व्हायची. कोणताही राजकीय पक्ष अशा संघटनांमध्ये पुढे जाऊन आंदोलन करत नाही. सर्व राजकीय पक्षांनी या मर्यादा पाळल्या होत्या. परंतु भाजप ऐनकेन प्रकारे सरकारच्या विरोधी वातावरण निर्माण करण्यासाठी कर्मचाऱ्यांची संघटना उत्सुक नाही दिसल्यावर स्वतःच पुढे येऊन आंदोलन करायला लागले आहेत अशी टीकाही जयंत पाटील यांनी केली. भाजपच्या नेत्यांकडून एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनात होत असलेली घुसखोरी आणि त्यांच्या चिथावणीखोर वक्तव्याचा समाचारही जयंत पाटील यांनी घेतला.

अनिल परबांचा सूचक इशारा

एसटी कामगार कामावर परतले नाहीत तर सरकार वेगळा म्हणजेच नव्या भरती प्रक्रियेचा विचार करणार का? असा सवाल अनिल परब यांना विचारण्यात आला. त्यावेळी परब यांनी सूचक उत्तर दिलंय. सरकारला एसटी कर्मचाऱ्यांसह सर्वसामान्य नागरिक आणि पवाशांचाही विचार करावा लागतो. त्यामुळे सरकार सर्वच पातळ्यांवर विचार करत आहे. एसटी कामगार कामावर आले नाहीत तर आम्ही अन्य पर्यायांचा विचार करु, असं अनिल परब म्हणाले. कालपर्यंत 2 हजार एसटी कर्मचाऱ्यांना निलंबित केलं आहे. यापुढे ही कारवाई अधिक कडक करु. एसटी कर्मचाऱ्यांचं कधीही न भरुन येणारं हे नुकसान गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत भरुन देणार का? असा सवालही अनिल परब यांनी केलाय.

नितेश राणेंच्या आरोपांना अनिल परबांचं प्रत्युत्तर

नितेश राणे यांचे आरोप आम्ही मोजतच नाही. कोण नितेश राणे? त्यांची मुख्यमंत्र्यांवर आरोप करण्याची पात्रता आहे का? त्यामुळे त्यांच्या आरोपांना आम्ही महत्व देत नाही, असं अनिल परब म्हणाले. तसंच कालपर्यंत 2 हजार एसटी कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलं आहे. यापुढे ही कारवाई अधिक कडक करु. एसटी कर्मचाऱ्यांचं कधीही न भरुन येणारं हे नुकसान गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत भरुन देणार का? असा सवालही अनिल परब यांनी केलाय.

इतर बातम्या :

कामगार कामावर आले नाहीत तर सरकार नव्या भरतीचा विचार करणार? पत्रकारांच्या प्रश्नाला अनिल परबांचं सूचक उत्तर

राज्यात 7 महिन्यात 8 हजार प्राध्यापकांची भरती पूर्ण करणार, तर 5 हजार प्राध्यापकांना जुनी पेन्शन, उदय सामंतांची घोषणा

Jayant Patil alleges BJP leaders infiltrated ST workers’ agitation

Non Stop LIVE Update
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार.
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.