एसटी कर्मचाऱ्यांसाठी राज ठाकरे मैदानात, पवारांसोबत महत्वाची चर्चा; सातवा वेतन आयोग लागू करण्याची मागणी

एसटी कर्मचारी संघटनेतील काही प्रतिनिधींनी राज ठाकरे यांच्यासमोर आपली व्यथा मांडली होती. त्यानंतर आज राज ठाकरे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची सिल्व्हर ओकवर जाऊन भेट घेतली.

एसटी कर्मचाऱ्यांसाठी राज ठाकरे मैदानात, पवारांसोबत महत्वाची चर्चा; सातवा वेतन आयोग लागू करण्याची मागणी
एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावरुन राज ठाकरे, शरद पवार यांच्यात बैठक
Follow us
| Updated on: Nov 12, 2021 | 9:38 PM

मुंबई : एसटी कर्मचाऱ्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे मैदानात उतरले आहेत. एसटी कर्मचारी संघटनेतील काही प्रतिनिधींनी राज ठाकरे यांच्यासमोर आपली व्यथा मांडली होती. त्यानंतर आज राज ठाकरे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची सिल्व्हर ओकवर जाऊन भेट घेतली. यावेळी राज ठाकरे यांच्यासोबत मनसे नेते बाळा नांदगावकर आणि एसटी कर्मचारी संघटनेचे काही पदाधिकारीही उपस्थित होते. राज ठाकरे आणि पवार यांच्यात जवळपास तासभर महत्वपूर्ण चर्चा झाल्याची माहिती बाळा नांदगावकर यांनी दिलीय. (Raj Thackeray and Sharad Pawar’s important meeting on the issue of ST employees)

एसटी कर्मचाऱ्यांकडून एसटीचे राज्य सरकारमध्ये विलिनीकरण करण्याची मागणी लावून धरण्यात आली आहे. त्यासाठी राज्यभरात एसटी कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप सुरु आहे. मुंबईतील आझाद मैदानावरही एसटी कर्मचारी चार दिवसांपासून संपावर बसले आहेत. भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार सदाभाऊ खोत हे देखील एसटी कर्मचाऱ्यांसोबत ठाण मांडून आहेत. या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी आज शरद पवार यांची भेट घेतली. या वेळी विलिनीकरण आणि सातवा वेतन आयोग या दोन्ही मुद्द्यांवर चर्चा झाल्याची माहिती मिळतेय. तसंच एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर शरद पवार आणि राज ठाकरे एकत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार असल्याचंही कळतंय.

राज ठाकरेंनी काय आश्वासन दिलं होतं?

काल एसटी कामगारांनी राज ठाकरे यांच्याकडे कायदेशीर बाबी मांडून त्यांच्या मागण्याही सांगितल्या होत्या. सरकारची भूमिका काय आहे हे सुद्धा सांगितलं. त्यावर राज ठाकरे यांनी कामगारांना मदत करण्याचं आश्वासन दिलं. मी तुमचं नेतृत्व करेल. तुमच्यासाठी सरकारशी चर्चा करेल. मात्र तुम्ही आत्महत्या करू नका, असं आवाहन राज यांनी केलं होतं. कोणीही आत्महत्या करू नका. आत्महत्या हा काही पर्याय नाही. आपल्याला लढाई लढायची आहे. त्यासाठी आपल्या मनगटात रक्त आणि ताकद हवी. आत्महत्या करून डाव अर्धवट सोडायचं नाही. मनसे या लढाईत सोबत राहील, असं आश्वासनही राज यांनी दिलं आहे. राज यांना सरकारमध्ये कोणाशी बोलायचं याची पुरेपूर कल्पना आहे. तेच बोलतील तेव्हा तुम्हाला कळेल. तुम्हालाही माहीत आहे ते कुणाशी बोलतील, असं नांदगावकर यांनी सांगितलं होतं.

सातवा वेतन आयोगाची मागणी

एसटी महामंडळाचं विलनीकरण करावं ही त्यांची मागणी आहे. राज्य सरकारला उच्च न्यायालयाने 12 आठवड्याची मुदत दिली आहे. समिती गठीत केली आहे. ही माहिती त्यांनी राज ठाकरेंना दिली. सरकारची भावना प्रामाणिक असेल तर राज्य सरकरच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे आम्हाला सातवा वेतन आयोग लागू केला तर पहिलं महत्त्वाचं पाऊल ठरेल. त्यानंतर विलनीकराची प्रक्रिया सुरू होईल असं या कामगारांचं म्हणणं असल्याचं नांदगावर म्हणाले. तसेच एसटी कामगारांसोबत मनसेचे वकीलही त्यांना कायदेशीर मदत करणार असल्यांचही त्यांनी सांगितलं होतं.

इतर बातम्या :

त्रिपुरा ते महाराष्ट्र अशांतता, तणाव; राऊत म्हणतात ही तर भाजपची 2024 च्या निवडणुकीत उतरण्याची तयारी

VIDEO: दगडफेक, लाठीमार आणि कडकडीत बंद, राज्यातील हिंसक घटनांचे 5 महत्त्वाचे व्हिडीओ!

Raj Thackeray and Sharad Pawar’s important meeting on the issue of ST employees

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.