‘यापुढे प्रत्येक मृत्यूला शरद पवार जबाबदार असतील’, पवारांच्या पत्रकार परिषदेवर सदावर्तेंची पहिली प्रतिक्रिया

आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि परिवहन मंत्री अनिल परब यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी कर्मचाऱ्यांना कामावर येण्याचं आवाहन केलं, तसंच एसटी पूर्ववत झाल्यास मागण्यांवर सकारात्मक विचार केला जाईल असं आश्वासनही दिलं आहे. मात्र, पवारांच्या या आवाहनानंतर वकील गुणरत्न सदावर्ते यांनी पवार आणि परब यांच्यावर जोरदार निशाणा साधलाय. यापुढे एसटी कर्मचाऱ्यांच्या मृत्यूला शरद पवार जबाबदार असतील असा इशाराच सदावर्ते यांनी दिलाय.

'यापुढे प्रत्येक मृत्यूला शरद पवार जबाबदार असतील', पवारांच्या पत्रकार परिषदेवर सदावर्तेंची पहिली प्रतिक्रिया
अनिल परब, गुणरत्न सदावर्ते, शरद पवार
Follow us
| Updated on: Jan 10, 2022 | 4:59 PM

मुंबई : महाविकास आघाडी सरकारमधील (Mahavikas Aghadi) मंत्र्यांचं आवाहन, पगारवाढ, कारवाईचा इशारा, बडतर्फीची कारवाई, कामावर रुजू होण्याची विनंती, अशा सर्व बाबींनंतरही राज्यातील हजारो एसटी कर्मचारी (ST Empolyee) आजही संपावर कायम आहेत. मात्र, एसटी कर्मचाऱ्यांकडून या संपाला दुखवटा असं नाव देण्यात आलं आहे. मागील दोन महिन्यांपेक्षा अधिक काळापासून सुरु असलेल्या या संपाच्या पार्श्वभूमीवर आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आणि परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी कर्मचाऱ्यांना कामावर येण्याचं आवाहन केलं, तसंच एसटी पूर्ववत झाल्यास मागण्यांवर सकारात्मक विचार केला जाईल असं आश्वासनही दिलं आहे. मात्र, पवारांच्या या आवाहनानंतर वकील गुणरत्न सदावर्ते यांनी पवार आणि परब यांच्यावर जोरदार निशाणा साधलाय. यापुढे एसटी कर्मचाऱ्यांच्या मृत्यूला शरद पवार जबाबदार असतील असा इशाराच सदावर्ते यांनी दिलाय.

आजची शरद पवार आणि अनिल परब यांची बैठक अत्यंत लाजीरवाणी होती. ज्या 67 एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केली त्यांच्याबाबत शरद पवारांनी ब्र देखील काढला नाही. ते खरं आहे की बारामतीच्या कष्टकऱ्यांनी ठराव घेऊन, फ्लेक्स लावून जाहीर केलं होतं की कामगारांचे, कष्टकऱ्यांचे कैवारी नाहीत. आणि ते पवारांनी आज कृतीत आणलं. शरद पवार हे एसटी महामंडळाकडे एखाद्या आयपीएलच्या खेळाप्रमाणे पाहत आहेत. त्यांना कर्मचाऱ्यांच्या मृत्यूवर बोलावसं वाटलं नाही. त्यामुळे ते कर्मचाऱ्यांच्या जीवाचा खेळ समजत आहेत. यावर महाराष्ट्र प्रश्न विचारत राहणार, असा इशारा अॅड. सदावर्ते यांनी पवार आणि परबांना दिलाय.

‘पवारांचा वाढदिवस किंवा एखादी शोकसभा वाटत होती’

त्याचबरोबर ‘आमच्याकडे एक पद्धत आहे की, आयोगाचे लोक जेलमध्ये विचारायला येतात की कुणाची काही तक्रार आहे का? तसं एका पाठोपाठ एक ज्या युनियनकडे माणसं नाहीत त्यांना संधी देण्यात आली. ते युनियनचे लोक आधी पवारांकडे पाहत होते आणि नंतर म्हणत होते कामगारांनी आता कामावर आलं पाहिजे. हा शरद पवारांचा वाढदिवस किंवा एखादी शोकसभा वाटत होती’, असा टोलाही त्यांनी लगावलाय.

‘कष्टकऱ्यांपुढे नतमस्तक होऊन विलीनकरण द्या’

सदावर्ते पुढे म्हणाले की, आमचा संप नाही. अजय गुजरची संघटनाही संपाच्या संदर्भात होती. आम्ही दुखवट्यात आहोत. उच्च न्यायालयाने 5 नोव्हेंबर 2021 ला न्यायमूर्ती शाहरुख काथावाला यांनी एख कमिटी स्थापन केली. त्या कमिटीने या आठवड्यात मुख्यमंत्र्यांना अहवाल द्यायचा होता आणि मुख्यमंत्र्यांनी 20 तारखेला न्यायालयात द्यायचा होता. शरद पवार हे महाराष्ट्राचे काळजीवाहू मुख्यमंत्री आहेत का? परबांनी मुख्यमंत्र्यांकडे जायला हवं होतं. आज शरद पवार यांनी आज पुन्हा न्यायालयाचा अवमान केला. ते आज पुन्हा करारावर बोलत आहेत. न्यायप्रविष्ठ प्रकरण असताना करारावर बोलण्याची काय गरज होती. त्या पुढे जाऊन वकिलपत्राबाबत सांगायचं झालं तर मी 75 हजार लोकांचा वकील आहे. ज्या युनियन होत्या त्या बाद झालेल्या होत्या. त्यांच्याकडे एक टक्काही कष्टकरी नाही. त्यांच्या मान्यता रद्द झाल्या आहेत. शरद पवारांच्या युनियनचीही मान्यता रद्द झाली आहे. मान्यता गेलेल्या लोकांवर बोलून वेळ वाया घालवायचा नाही. आता कष्टकरी एक झालाय. आता पवारांच्या शब्दाला वजन नाही. कष्टकऱ्यांपुढे नतमस्तक होऊन विलीनकरण द्यावं, असं आव्हान सदावर्ते यांनी पवारांना दिलंय.

‘..तर शरद पवार जबाबदार राहतील’

तसंच कामगारांच्या मृत्यूला आतापर्यंत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि परिवहन मंत्री अनिल परब जबाबदार होते. आता शरद पवारही जबाबदार असतील. तशी नोंद आता यापुढे केली जाईल, असा थेट इशाराच सदावर्ते यांनी पवारांना दिला आहे. त्यामुळे आता एसटी कर्मचाऱ्यांचं हे आंदोलन अधिक पेटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

गुणरत्न सदावर्तेंना हटवलं

यावेळी एसटी कर्मचारी संघटनेच्या प्रतिनिधींनी गुणरत्न सदावर्ते यांच्यावर निशाणा साधला. आमची चूक झाली, आता आम्ही वकील बदल आहोत, अशीही माहिती त्यांनी दिली. गेल्या दोन महिन्यांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरु होता. त्यावर अखेर आता तोडगा निघण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

इतर बातम्या :

सदावर्तेंना हटवलं! पवारांसोबत झालेल्या बैठकीत एसटी कर्मचाऱ्यांचे प्रतिनिधी म्हणाले, फार मोठी चूक झाली…

ST Strike | राजकीय पक्षांमुळेच हे आंदोलन पेटलं का, चिघळलं का? पवार म्हणाले, मला राजकारण करायचं नाही

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.