पवार म्हणाले, मला राजकारण करायचं नाही, प्रश्न सोडवायचाय, भाजपची पहिली प्रतिक्रिया काय?

एसटी कर्मचाऱ्यांच्या संघटनांच्या प्रतिनिधींसोबत पवार यांनी बैठक घेतली. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत शरद पवार यांनी एसटी कर्मचाऱ्यांना कामावर रुजू होण्याचं आवाहन केलंय. तसंच कर्मचाऱ्यांनी सरकारवर विश्वास ठेवावा, मागण्यांबाबत सरकार सकारात्मक असल्याचं पवार म्हणाले आहेत. अशावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शरद पवार आणि महाविकास आघाडी सरकारवर जोरदार निशाणा साधलाय.

पवार म्हणाले, मला राजकारण करायचं नाही, प्रश्न सोडवायचाय, भाजपची पहिली प्रतिक्रिया काय?
चंद्रकांत पाटील, शरद पवार
Follow us
| Updated on: Jan 10, 2022 | 5:58 PM

मुंबई : मागील दोन महिन्यांपासून सुरु असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर (ST Workers Strike) तोडगा काढण्यासाठी आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी पुढाकार घेतला आहे. परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) आणि एसटी कर्मचाऱ्यांच्या संघटनांच्या प्रतिनिधींसोबत पवार यांनी बैठक घेतली. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत शरद पवार यांनी एसटी कर्मचाऱ्यांना कामावर रुजू होण्याचं आवाहन केलंय. तसंच कर्मचाऱ्यांनी सरकारवर विश्वास ठेवावा, मागण्यांबाबत सरकार सकारात्मक असल्याचं पवार म्हणाले आहेत. अशावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी शरद पवार आणि महाविकास आघाडी सरकारवर जोरदार निशाणा साधलाय.

चंद्रकांत पाटलांकडून प्रश्नांची सरबत्ती

‘ST संपामुळे ग्रामीण भागातल्या जनतेचे हाल होताहेत, हे सरकारला आत्ता समजलं? लाल परी धावत नसल्याने ग्रामीण भागातली प्रवास व्यवस्था लंगडी झालीये. त्याकडे लक्ष द्यायला शरद पवार यांना आजवर का वेळ झाला नाही? आजचा मुहूर्त होता? बैठकीनंतर परिवहनमंत्री अनिल परब यांनी मनोरंजन केलं’, अशी टीका पाटील यांनी केलीय. त्याचबरोबर ‘ST कर्मचाऱ्यांवर कारवाई होणार नाही, असं परब सांगतात. मग आजवर कारवाई झालेल्यांचं काय? परबसाहेब, कारवाईची भीती मविआ सरकारवरील अविश्वासातून निर्माण होतेय. कारवाई नाही, पगारवाढीसाठी चर्चा करू, विलिनीकरणाचं कोर्ट सांगेल ते पाहू… मग मविआ सरकारकडे ST कर्मचाऱ्यांसाठी आहेच काय?’, असा प्रश्नही त्यांनी सरकारला केलाय.

शरद पवारांचं एसटी कर्मचाऱ्यांना आवाहन

‘मला आनंद आहे कृती समितीच्या संघटना प्रतिनिधींनी कामगारांच्या हिताबद्दलच जितकी आस्था आहे, त्यासोबत प्रवाशांचं हित आणि एसटी टिकली पाहिजे याही बद्दल कामगार संघटनांच्या लोकांचा आग्रह आहे. त्यामुळे त्यांचाही एकंदर दृष्टीकोन सकारात्मक आहे. या सकारात्मक दृष्टीकोनातूनच त्यांनी महाराष्ट्रभरातील एसटी कामगारांना आवाहन केलंय. माझी विनंती आहे, शेवटी आपली बांधिकली प्रवाशांशी आहे. ही बांधिकली जपली पाहिजे. याबाबत गांभीर्यानं विचार करत एसटी कशी सुरु होईल, याबाबत काळजी घ्यावी, एवढंच मला सुचवायचं’, असं शरद पवार म्हणालेत.

इतर बातम्या : 

‘यापुढे प्रत्येक मृत्यूला शरद पवार जबाबदार असतील’, पवारांच्या पत्रकार परिषदेवर सदावर्तेंची पहिली प्रतिक्रिया

Sharad Pawar : एस.टी. कर्मचाऱ्यांचं विलिनीकरण, पगारवाढीवर शरद पवार नेमकं काय म्हणाले, वाचा जशास तसं

Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.