TET Exam Scam : घोटाळ्यातील आकडेवारी डोळे पांढरे करणारी! बच्चू कडूंनी सांगितला घोळ दूर करण्यासाठीचा रामबाण उपाय

TET Exam Scam : तब्बल 7800 परीक्षार्थींना पैसे देऊन पात्र केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. पुणे पोलिसांच्या सायबर पोलिसांकडून याप्रकरणी सध्या तपास सुरु आहे.

TET Exam Scam : घोटाळ्यातील आकडेवारी डोळे पांढरे करणारी! बच्चू कडूंनी सांगितला घोळ दूर करण्यासाठीचा रामबाण उपाय
राज्यमंत्री बच्चू कडूImage Credit source: Tv9
Follow us
| Updated on: Jan 28, 2022 | 10:12 AM

मुंबई : टीईटी परीक्षेत (TET Exam Scam) हजारो विद्यार्थ्यांना पैसे घेऊन पात्र केल्याबाबतची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. यावर बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी टीव्ही 9मराठी शी बोलताना परीक्षांमध्ये होत असलेल्या घोटाळ्यांचा विषय कायमचा कसा निकाली काढता येईल, यावर रामबाण उपाय सांगितला आहे. थेट मिलिट्री आणून या सगळ्यांवर कंट्रोल करायला पाहिजे, असं विधान राज्यमंत्री बच्चू कडू यांनी टीव्ही 9 मराठीशी बोलताना केलं आहे. काही निवडक लोकं आणि ज्या कंपनीला परीक्षा घेण्याचं काम दिलं होतं, त्यांनी हा सगळा गैरप्रकार केला असल्याचं बच्चू कडू यांनी म्हटलंय. अनेक प्रामाणिक विद्यार्थी या परीक्षा घोटाळ्यामुळे भरडले गेले असल्याचं वक्तव्यही त्यांनी केलं आहे. टीईटी परीक्षेत जवळपास साडे सोळा हजार विद्यार्थी पास झाले होते. दरम्यान, परीक्षांमधील हा घोळ हे व्यवस्थेचं मोठं अपयश असून हे मोठं रॅकेट मोडून काढण्यासाठी या सगळ्यांवर कारवाई करण्यासाठी जनआंदोलन करण्याची गरज असल्याचंही बच्चू कडू यांनी म्हटलं आहे. परीक्षांच्या आडून पैसे खाणं हे प्रकार वाढले असल्याचं बच्चू कडू यांनी बोलताना मान्य केलं आहे.

मिलिट्री राज आणा…!

वाढत्या परीक्षा घोटाळ्यामुळे आता संपूर्ण संपूर्ण देशात मिलिट्री राज लावायला हवं, असं विधान बच्चू कडू यांनी केलं आहे. कुणावरच भरवसा राहिलेला नाही, इतकी वाईट अवस्था आहे, असंही ते म्हणाले. निःपक्षपाती चौकशी होणार का यावर विचारलं असतं, त्यांनी या घोटाळ्याला व्यवस्था जबाबदार असल्याचा आरोप केला. व्यवस्था पूर्णपणे कोलमडली असल्यानं चिंताही त्यांनी व्यक्त केली. मिलिट्री आणल्यानंतरच सगळं व्यवस्थित होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.

चौकशी सुरु!

दरम्यान, घोटाळ्याप्रकरणी चौकशी होणारच आहे. त्यासाठी पूर्ण प्रयत्न करतो आहोत, असंही त्यांनी म्हटलंय. जिथं जिथं परीक्षा झाल्या, तिथं तिथं घोळ झाल्याचं दिसून आलं असल्यानं त्यांनी चिंता व्यक्त केली आहे. करप्शनमुक्त परीक्षा झाल्या पाहिजे, असंही त्यांनी म्हटलंय. प्रामाणिक विद्यार्थ्यांचं प्रचंड मोठं नुकसान काही थोड्या घोटाळेबाज अधिकाऱ्यांमध्ये होतंय. झारीतले शुक्राचार्य कोण आहेत, हे लवकरच कळेल, असंही बच्चू कडू यांनी म्हटलंय.

आकडेवारी वाढण्याची भीती..

तब्बल 7800 परीक्षार्थींना पैसे देऊन पात्र केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. पुणे पोलिसांच्या सायबर पोलिसांकडून याप्रकरणी सध्या तपास सुरु आहे. या तपासातून 7 हजार 800 जणांना पैसे देऊन पात्र केलं असल्याची बाब उघडकीस आल्यानं एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, येत्या काही दिवसांत हा आकडा आणखी मोठा होण्याचीही शक्यता नाकारता येत नाही. पोलिसांच्या तपासातून आणखी मोठे आकडे समोर येण्याचीही दाट शक्यता आहे. पुणे सायबर पोलिसांना आरोग्य विभागाच्या परीक्षा पेपरफुटी प्रकरणाचा तपास करताना टीईटी परीक्षेतही गैर प्रकार झाल्याप्रकरमी महत्त्वाचे धागेदोरे हाती लागले होते. टीईटी परीक्षा घोटाळा प्रकरणी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे (Tukaram Supe), माजी आयुक्त सुखदेव डेरे, शिक्षण विभागाचा तांत्रिक सल्लागार अभिषेक सावरीकर, जीए टेक्नॉलॉजीचा आश्विन कुमार, सौरभ त्रिपाठी डॉ. प्रीतिश देशमुख याच्यासह इतरांना अटक करण्यात आली होती. त्यांच्या चौकशीतून ही आता रोज नवनवे खुलासे समोर येत आहेत.

संबंधित बातम्या :

TET Exam : तब्बल 7800 परीक्षार्थींना पैसे देऊन पात्र केलं! एका परीक्षार्थीकडून किती रुपये घेतले?

Aurangabad | छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या उद्धाटनाचा वाद पेटण्याची शक्यता

Pune | पुण्याच्या लाँड्रीचालकाला महाराष्ट्राचा सॅल्यूट, लाखो रुपयांचे सोन्याचे दागिने परत करणारा ‘माणूस’ झाला श्रीमंत!

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.