Big Breaking : भास्कर जाधवांच्या घरावर दगडफेक, हल्लेखोर पसार; राजकीय लढाई घरापर्यंत पोहोचली?

या सर्व प्रकारावर भास्कर जाधव यांची कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. मात्र, जाधव यांच्या घरावर अज्ञातांनी हल्ला केल्याने चिपळूणमध्ये खळबळ उडाली आहे.

Big Breaking : भास्कर जाधवांच्या घरावर दगडफेक, हल्लेखोर पसार; राजकीय लढाई घरापर्यंत पोहोचली?
भास्कर जाधवांच्या घरावर दगडफेक, हल्लेखोर पसार; राजकीय लढाई घरापर्यंत पोहोचली? Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Oct 19, 2022 | 10:47 AM

चिपळूण: राज्यातील अनेक नेते एकमेकांवर अत्यंत कठोर शब्दात टीका करतात. हाडवैरी असल्यासारखं एकमेकांवर हल्ला चढवतात. त्यामुळे दोन्हीकडचे कार्यकर्ते कमालीचे संतापताना दिसतात. पण ही राजकीय लढाई केवळ राजकारणापुरतीच असते. ती कधीच घरापर्यंत पोहोचत नाही. मात्र, कोकणात सध्या वगेळंच काही तरी घडताना दिसत आहे. उद्धव ठाकरे (uddhav thackeray) गटाचे नेते आणि आमदार भास्कर जाधव (bhaskar jadhav) यांच्या चिपळूण (chiplun) येथील घरावर मध्यरात्री दगडफेक करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. हल्लेखोर अज्ञात आहेत. पण राजकीय लढाई आता घरापर्यंत पोहचली की काय? असा सवाल या निमित्ताने केला जात आहे.

भास्कर जाधव यांच्या चिपळूण येथील घरावर रात्री अज्ञात इसमांनी दगडफेक केली आहे. अज्ञात व्यक्तींनी मध्यरात्री भास्कर जाधव यांच्या घरावर दगड फेकले. स्टंम्प फेकले आणि बाटल्या फेकून पसार झाले. जाधव यांच्या घर आणि वाहनांवर दगडफेकण्यात आले आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. ही दगडफेककुणी केली हे माहीत नाही. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी जाधव यांच्या घरी धाव घेऊन तपास सुरू केली आहे.

हे सुद्धा वाचा

जाधव यांच्या घरावर हल्ला झाल्यानंतर पोलिसांनी त्यांच्या घराभोवती बंदोबस्त वाढवला आहे. तसेच घराशेजारील सीसीटीव्ही कॅमरे तपासले जात आहेत. तसेच शेजाऱ्यांचीही चौकशी करून काही माहिती मिळते का याचा पोलीस शोध घेत आहेत.

या सर्व प्रकारावर भास्कर जाधव यांची कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. मात्र, जाधव यांच्या घरावर अज्ञातांनी हल्ला केल्याने चिपळूणमध्ये खळबळ उडाली आहे. जाधव हे जिल्ह्यातील मोठं प्रस्थ आहे. शिवाय राज्याच्या राजकारणातील मोठं नाव आहे. त्यांच्याच घरावर हल्ला झाल्याने उलटसुलट चर्चांना उधाण आलं आहे.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून भास्कर जाधव यांचे महाराष्ट्रभर दौरे सुरू आहेत. या दौऱ्यातून भास्कर जाधव शिंदे गट आणि भाजपवर जोरदार हल्ला चढवत आहेत. त्यामुळे शिंदे गटाची पळताभूई थोडी झाली आहे. तर भाजपकडूनही जाधव यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं जात आहे.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.