chhagan bhujbal | शरद पवार यांना आजही गुरु मानणारे, भुजबळ Tv9 मराठीच्या मुलाखतीत पवारांच्या त्या वक्तव्यावर असे संतापले
छगन भुजबळ हे शरद पवार यांना आजही गुरु मानतात, असं त्यांनी Tv9 मराठीचे व्यवस्थापकीय संपादक उमेश कुमावत यांना दिलेल्या मुलाखतीत सांगितलं, पण येवल्यात येऊन शरद पवार यांनी, मी छगन भुजबळ यांना तिकीट देऊन चूक केली, असं म्हटलं होतं, यावर छगन भुजबळ यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे, ते म्हणाले
मुंबई | 11 ऑक्टोबर २०२३ | शरद पवार यांची छगन भुजबळ यांनी साथ सोडली आणि छगन भुजबळ हे अजित पवार यांच्यासोबत गेले, यानंतर शरद पवार यांनी पहिल्यांदाच येवल्याचा दौरा केला, येवला हा छगन भुजबळ यांचा बालेकिल्ला. यात शरद पवार यांनी जनतेला हात जोडून सांगितलं, माझी चूक झाली. माझी चूक झाली याचा अर्थ असा घेतला गेला की, मी छगन भुजबळ यांना आतापर्यंत तुम्हाला मी मतदान करण्याचं आवाहन केलं, त्यांना तिकीट दिलं ही माझी चूक झाली. छगन भुजबळ हे शरद पवार यांना गुरु मानतात, म्हणून मी त्यांच्यावर आरोप करणार नाही, पण माझी चूक झाली हे शरद पवार जे येवल्यात येऊन येवलेकरांना बोलून गेले यावर छगन भुजबळ यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे.
Tv9 मराठीचे व्यवस्थापकीय संपादक उमेश कुमावत यांनी छगन भुजबळ यांची मुलाखत घेतली, या रोखठोक मुलाखतीत, उमेश कुमावत यांनी छगन भुजबळ यांना प्रश्न विचारला, शरद पवार हे येवल्यात येऊन म्हणाले, जेव्हा तुम्ही अजितदादा यांच्यासोबत निघून गेले, त्यानंतर त्यांनी शरद पवार यांनी येवलेकरांना साद दिली, माझी चूक झाली, यावर तुम्ही काय म्हणाल, यावर छगन भुजबळ यांनी राष्ट्रवादीचा उभारणीचा इतिहास, आणि त्यांचं योगदान याचा इतिहास वाचून दाखवला. यावर छगन भुजबळ म्हणाले, मग मी कुठे कुठे सांगू, माझी चूक झाली. माझीही चूक झाली असं मला देखील म्हणता येईल, असं छगन भुजबळ यांनी सांगितलं.
शरद पवार साहेब यांना मी साथ दिली ही माझी चूक झाली का असा प्रतिप्रश्न देखील त्यांनी यावेळी केला. मला काँग्रेसकडून मुख्यमंत्रीपदाची ऑफर असताना मी शरद पवार यांच्यासोबत आलो, तेव्हा तर कुणीच नव्हतं, जयंत पाटील, आर.आर पाटील हे देखील नव्हते. प्रफुल्ल पटेल हे देखील २ महिन्यात आले, पक्षाचं धोरण काय, पक्षाचा झेंडा, पक्षाचं नाव हे ठरवण्यापर्यंत, पक्षाच्या बैठका, दौरा यात माझं मोलाचं योगदान होतं, तेव्हा गावोगावी फिरलो. तेव्हा मी शरद पवार साहेबांना साथ दिली. तर ही माझी चूक होती का हे देखील मी बोलू शकतो, असं छगन भुजबळ यांनी Tv9 मराठी या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आह.
एकंदरीत येवल्यात येऊन येवलेकरांसमोर शरद पवार जे बोलले की, छगन भूजबळ यांना तिकीट देऊन माझी चूक झाली, मला माफ करा, हे वाक्य छगन भुजबळ यांच्यामनात आतपर्यंत रुतून बसलं आहे, यावरुन छगन भुजबळ यांनी त्यांचे राजकीय गुरु शरद पवार यांच्यावर देखील निशाणा साधला आहे. Tv9 मराठी या न्यूज चॅनेलवरील मुलाखतीत, उमेश कुमावत यांनी विचारलेल्या प्रश्नांना छगन भुजबळ यांनी रोखठोक उत्तरं दिली.