Raj Thackeray New Look | क्लीन शेव, सफेद कुर्त्यातील ‘स्टाईल स्टेटमेंट’ बदललं, राज ठाकरे यांचा न्यू लूक

अगदी महिनाभरापूर्वी आपल्या आधीच्या लूकमध्ये दिसणारे राज ठाकरे अचानक नव्या लूकमध्ये दिसत आहेत. नुकत्याच समोर आलेल्या त्यांच्या काही फोटोंमधून हे समोर आलं आहे.

Raj Thackeray New Look | क्लीन शेव, सफेद कुर्त्यातील 'स्टाईल स्टेटमेंट' बदललं, राज ठाकरे यांचा न्यू लूक
Follow us
| Updated on: Sep 01, 2020 | 11:02 AM

मुंबई : लॉकडाऊनच्या काळात अनेकांनी नवनवीन लूक आजमावून पाहिले. अगदी सर्वसामान्यांपासून कलाकारांपर्यंत बऱ्याच जणांनी घरच्या घरी हटके अंदाज केला. नेते मंडळीही याला अपवाद ठरले नाहीत. आपल्या खास स्टाईल स्टेटमेंटसाठी ओळखल्या जाणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही आपल्या लूकमध्ये मोठा बदल केला आहे. विशेष म्हणजे अगदी महिनाभरापूर्वी आपल्या आधीच्या लूकमध्ये दिसणारे राज ठाकरे अचानक नव्या लूकमध्ये दिसत आहेत. नुकत्याच समोर आलेल्या त्यांच्या काही फोटोंमधून हे समोर आलं आहे (MNS Chief Raj Thackeray New Look).

लॉकडाऊनमध्ये सलून बंद असताना कोणी वाढलेल्या केसांची अनोखी स्टाईल केली, तर कोणी घरच्या घरी केसांना कात्री लावली होती. कोणी दाढीला नवा आकार दिला. गॉगल आणि टीशर्ट घातला असतानाच राज ठाकरे यांच्या काही फोटोंनी त्यांच्या चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला. राज ठाकरे यांच्या नव्या फोटोंमध्ये त्यांनी दाढी वाढवलेली दिसत आहे. त्यामुळे कायम क्लीन शेव दिसणारे राज ठाकरे हटके लूकमध्ये दिसत आहेत.

राज ठाकरे यांचे स्टाईल स्टेटमेंट

अनेक राजकीय नेत्यांची स्वतःची अशी एक ओळख असते. त्यांचे स्वतःचे ‘स्टाईल स्टेटमेंट’ पाहायला मिळते. राज ठाकरेही बहुतेक वेळा क्लीन शेव करुन कुर्ता पायजमा घातलेले दिसले. पत्रकार परिषदेत त्यांचे पांढरेशुभ्र कुर्ते पाहायला मिळतात, तर एखाद्या विशेष कार्यक्रमात त्यांचा रंगीत कुर्ता पाहायला मिळतो. मात्र, त्यातील समान गोष्ट म्हणजे त्यांची क्लीन शेव.

जानेवारी महिन्यात मुंबईत मनसेचे महाअधिवेशन झाले होते. त्यावेळीही राज ठाकरे यांच्या लूककडे सर्वांचे लक्ष लागले होते. बांगलादेशी आणि पाकिस्तानी घुसखोरांविरोधात फेब्रुवारी महिन्यात मनसेने मोर्चाचे आयोजन केलं होतं. राज ठाकरे यांनी या मोर्चासाठी पांढऱ्या रंगाचा कुर्ता घातला होता. तर कपाळाला भगव्या रंगाचा टिळा लावला होता. मनसेचा नवा झेंडा असलेला बॅच उजव्या हाताला बांधला होता. राज ठाकरेंनी पांढऱ्या आणि करड्या रंगाचे शूज घातले होते. मात्र या शूजच्या लेसचा रंगही भगवा होता.

मात्र, आता कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरु असलेल्या लॉकडाऊनमध्ये राज ठाकरेंनी मेकओव्हर केलेला दिसत आहे. राज्यातील विविध संघटनांमधील प्रमुख कार्यकर्त्यांनी मनसेत प्रवेस केला आहे. त्याचाच फोटो मनसेच्या अधिकृत ट्विटर हँडलवर पोस्ट करण्यात आले. यात राज ठाकरे सफेद कुर्ता आणि नेहमीच्या चष्म्यात दिसत आहेत. मात्र, त्यात त्यांची फ्रेंच कट दाढी हा त्यांच्यातील मोठा बदल दाखवत आहे. त्यांचा हा नवा लूक देखील त्यांच्या चाहत्यांच्या पसंतीला उतरत आहे.

संबंधित बातम्या :

Raj Thackeray | टीशर्ट-गॉगल आणि दाढी, राज ठाकरे यांचा न्यू लूक

चंद्रकांत खैरे यांना धक्का, औरंगाबादेतील सात निष्ठावंत शिवसैनिकांचा मनसेत प्रवेश

MNS Chief Raj Thackeray New Look

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.