‘मदिरालयावर ज्यांचा विश्वास, त्यांना मंदिरांशी काही देणंघेणं नाही’, सुधीर मुनगंटीवारांचा सरकारला टोला

मदिरालयांवर ज्यांचा विश्वास त्यांना मंदिरांशी काही देणंघेणं नाही. दारुवाल्यांना सूट देणारं, बार मालकांना सूट देणारं हे देशातील पहिलं राज्य सरकार आहे. हे जगातले एक नंबरचे मुख्यमंत्री आहेत, जे बीअर बार आणि दारुमालकांना सूट देतात. मेट्रोचं उद्धाटन चालतं, पुण्यातील कार्यालयाचं उद्घाटन चालतं, डान्सबार सुरु केले तरी यांना चालतं, त्यामुळे कोरोना होत नाही का? असा सवाल मुनगंटीवार यांनी उपस्थित केलाय.

'मदिरालयावर ज्यांचा विश्वास, त्यांना मंदिरांशी काही देणंघेणं नाही', सुधीर मुनगंटीवारांचा सरकारला टोला
सुधीर मुनगंटीवार, भाजप नेते
Follow us
| Updated on: Aug 21, 2021 | 5:37 PM

मुंबई : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव काहीसा कमी झाल्याचं पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील दुकानं, हॉटेल्स, बार, रेस्टॉरंट्स आदिंना कोरोना नियमातून सूट देण्यात आली आहे. मात्र, दुसरीकडे राज्यातील मंदिरं आणि अन्य धार्मिक स्थळं बंदच ठेवण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्य सरकारनं घेतला आहे. मंदिराच्या मुद्द्यावरुन आता भाजप नेते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मंदिरे उघडण्याची मागणी केल्यानंतर आता माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनीही मंदिरांबाबत राज्य सरकारवर जोरदार टीका केलीय. (Sudhir Mungantiwar Criticizes Mahavikas Aghadi and shivsena)

मदिरालयांवर ज्यांचा विश्वास त्यांना मंदिरांशी काही देणंघेणं नाही. दारुवाल्यांना सूट देणारं, बार मालकांना सूट देणारं हे देशातील पहिलं राज्य सरकार आहे. हे जगातले एक नंबरचे मुख्यमंत्री आहेत, जे बीअर बार आणि दारुमालकांना सूट देतात. मेट्रोचं उद्धाटन चालतं, पुण्यातील कार्यालयाचं उद्घाटन चालतं, डान्सबार सुरु केले तरी यांना चालतं, त्यामुळे कोरोना होत नाही का? असा सवाल मुनगंटीवार यांनी उपस्थित केलाय. दुसरीकडे जनआशीर्वाद यात्रा केली तर कोरोना येतो असं राज्यातील थोर नेत्यांना वाटत असल्याची टीका मुनगंटीवार यांनी केलीय.

किरीय सोमय्यांवरील हल्ल्याचा निषेध

जनतेचा आशीर्वाद घेण्यासाठी ही यात्रा आहे. जनतेचा आशीर्वाद भाजप-शिवसेनेवर होता. पण त्याविरोधात काम करणाऱ्यांना काय माहिती, असा टोलाही मुनगंटीवारांनी शिवसेनेला लगावलाय. भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर झालेला हल्ला निषेधार्ह आहे. लोकशाही मार्गानं त्यांना उत्तर देता येत नाही, अशा शब्दात मुनगंटीवार यांनी शिवसेनेवर जोरदार टीक केलीय.

फडणवीसांकडूनही मंदिरं सुरु करण्याची मागणी

आमच्यासाठी सगळीकडे देव आहे. मात्र, अनेक गरीब लोकांची उपजीविका मंदिरांवर अवलंबून आहे. हारवाल्यापासून ते पुजारी अशा अनेकांची उपजीविका ही मंदिरांवर अवलंबून असते. त्यांच्यासाठी तरी मंदिरं उघडा. मंदिरं बंद ठेवणे ही सरकारची चूक आहे. तुम्ही दारुची दुकानं सुरु ठेवता आणि मंदिरं बंद ठेवता, अशा शब्दात फडणवीस यांनी संताप व्यक्त केलाय. शेकापचे दिवंगत नेते गणपतराव देशमुख यांच्या कुटुंबांची सांत्वनपर भेट घेण्यासाठी आणि सुधारकरपंत परिचारक यांच्या प्रथम स्मृतीदिनानिमित्त देवेंद्र फडणवीस पंढरपुरात आले होते. गणपतराव देशमुख यांचं विधिमंडळात उचित स्मारक करण्याची मागणी करणार असल्याचंही यावेळी फडणवीस म्हणाले. शाळा सुरु करण्याच्या निर्णयाबाबत सरकार धरसोड करत आहे. पालकांना आणि विद्यार्थ्यांना विश्वासात घेऊन निर्णय घ्यावा असंही फडणवीस यांनी म्हटलंय.

इतर बातम्या :

गुन्हा दाखल करायचा असेल तर माझ्यावर करा; खासदार संभाजी छत्रपती कडाडले

‘परमबीर सिंग, सचिन वाझे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी 9 लाख वसूल केले’, बारमालकाचा खळबळजनक आरोप

Sudhir Mungantiwar Criticizes Mahavikas Aghadi and shivsena

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.