भाजप-राष्ट्रवादीच्या संभाव्य सरकारमधले पालकमंत्रीही ठरले होते, शरद पवार यांचाच पुढाकार; आणखी एका नेत्याचा गौप्यस्फोट

भाजप आणि शिंदे गटात काही तरी वाद असल्याचा भास निर्माण केला जात आहे. पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भाजपचा पूर्ण पाठिंबा आहे. हिंदुत्वासाठी ते सत्तेला पाठ दाखवून आले. त्यागाची किंमत होते. त्यांनी सत्तेचा त्याग केला होता.

भाजप-राष्ट्रवादीच्या संभाव्य सरकारमधले पालकमंत्रीही ठरले होते, शरद पवार यांचाच पुढाकार; आणखी एका नेत्याचा गौप्यस्फोट
sharad pawarImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jun 29, 2023 | 2:51 PM

मुंबई : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आमच्याशी डबल गेम केला. शरद पवार यांच्या पुढाकारानेच राष्ट्रवादी आणि भाजपची सत्ता येणार होती. पण शरद पवार चार दिवस आधी मागे फिरले. त्यामुळे पुढच्या गोष्टी जमल्या नाहीत, असा गौप्यस्फोट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. फडणवीस यांच्या या गौप्यस्फोटामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. ही खळबळ उडालेली असतानाच आता भाजपचे नेते आणि सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी नवा दावा केला आहे. मुनगंटीवार यांनी हा दावा करतानाच शरद पवार यांच्याकडेच बोट दाखवलं आहे.

शरद पवारांनी आम्हाला धोका दिला यात तथ्य आहे. भाजप आणि राष्ट्रवादीची युती फायनल झाली होती. पवार साहेबांनी पालकमंत्री आणि जिल्हे वाटप सुद्धा केले होते. त्यानंतर ते माघार फिरले. देवेंद्र फडणवीस यांनी आज जे काही सांगितलं ते शंभर टक्के खरं आहे, असा दावा सुधीर मुनगंटीवार यांनी केला. ते मीडियाशी संवाद साधत होते. शरद पवार यांचा जो काही राजकीय प्रवास आहे, इतिहास आहे, ते पाहिलं तर फडणवीस जे म्हणत आहेत ते खरं आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

हे सुद्धा वाचा

असं कधीच वाटलं नव्हतं

यावेळी मुनंगटीवार यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीकाही केली. उद्धवजी काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत जातील असं आम्हांला कधीच वाटलं नव्हतं. आम्ही एकत्र लढलो होतो. पक्षाने मोठं मन केलं. त्यांना जागा दिल्या. पण तेव्हाही बेइमानी झाली. आम्ही आमच्या पक्षातून त्यांना उमेदवारही दिला होता. साताऱ्यातील भाजपचा उमेदवार हा शिवसेनेचा म्हणून दिला होता. कोणत्याही राजकीय पक्षात असं कधी होत नाही. पण आम्ही ते केलं, असं मुनगंटीवार म्हणाले.

उद्धवजींबद्दल सहानुभूती

उद्धव ठाकरेंबद्दल मला अनेकवेळा सहानुभूती राहिली आहे. जेव्हा ते मुख्यमंत्री होते तेव्हा मी त्यांना अनेक वेळा सांगितले की तुमची वाट चुकत आहे, असं त्यांनी सांगितलं. तसेच समान नागरी कायद्यावरून त्यांनी संजय राऊत यांना फटकारले. दुटप्पी भूमिका कशी घेता येईल, यावर ठाकरे गटाचा जोर असतो. समान नागरी कायद्याचा अर्थ काय? आमचा देश जाती-धर्मापेक्षा मोठा आहे. समान नागरी कायदा येईल की नाही माहीत नाही. पण मंथन सुरू आहे, असंही ते म्हणाले.

पक्षश्रेष्ठीच निर्णय घेतात

2024मध्ये मुख्यमंत्री कोण होणार यावरून चर्चा रंगली आहे. पुढचा मुख्यमंत्री भाजपचं संसदीय बोर्ड ठरवेल, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. त्याबाबत विचारलं असता, हे स्वाभाविक आहे. हे शिंदेना जरी विचारल तरी तेच सांगतील. पक्ष श्रेष्ठीच निर्णय घेतात, असं ते म्हणाले.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.