‘या’ दिवशी सरकार जाणार, भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी काय सांगितलं?
चंद्रकांत खैरेंना प्रत्युत्तर देताना सुधीर मुनगंटीवार म्हणाले, ' मला त्यांची मजबुरी लक्षात येतेय.
मुंबईः महाविकास आघाडीतील (Mahavikas Aghadi) अनेक नेते शिंदे-भाजप सरकार पडण्याची वक्तव्य करत आहेत. येत्या दोन महिन्यात हे महायुतीचे सरकार कोसळेल असं वक्तव्य चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांनीही केलं. यावर भाजप नेते आणि सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी उत्तर दिलंय. ज्या दिवशी आम्ही जनतेची सेवा बंद करू, त्या दिवशी हे सरकार पडेल.
त्या दिवशी आम्हाला सत्तेत राहण्याचा अधिकार राहणार नाही. असं वक्तव्य सुधीर मुनगंटीवार यांनी केलं. 2019 मध्ये काँग्रेस-राष्ट्रवादीने शिवसेनेचा विचार हॅक करून सरकार बनवलं, पण जनता परीक्षा घेत असते, लोकांना सगळं कळतं, अशी घणाघाती टीका सुधीर मुनगंटीवार यांनी केली.
चंद्रकांत खैरेंना प्रत्युत्तर देताना सुधीर मुनगंटीवार म्हणाले, ‘ मला त्यांची मजबुरी लक्षात येतेय. त्यांच्या घरी जाणारा कार्यकर्ता संध्याकाळी तिथे जातो आणि रात्री शिंदे साहेबांच्या घरी.. हे कुणालाच माहिती नाही… असा टोला मुनगंटीवार यांनी लगावला.
पाहा सुधीर मुनगंटीवार काय म्हणाले-
साधारणतः अशा परिस्थितीत राज्यशास्त्र हे शिकवतं की दोन महिन्यात सरकार जाईल, अशी अफवा पसरवायची… ज्यांच्या मनात बाळासाहेब ठाकरे यांच्या मनात इच्छा जागी होते, त्यांच्यासाठी ही एक अफवेची फवारणी आहे. ही अफवेची फवारणी कामी येणार नाही. सरकार एक , दोन महिना नाही तर अनेक वर्षे टीकेल जनतेची सेवा करेल, असा विश्वास सुधीर मुनगंटीवार यांनी दर्शवला.
ज्या दिवशी आम्ही सेवा करणं बंद करू, त्या दिवशी आम्हीली सरकार टिकावं ही इच्छा मनात धरणार नाहीत. सरकार कुणाच्या कुटुंबासाठी, परिवारासाठी, कुणाचा मुलगा मंत्री व्हावा, मुलगी खासदार व्हावा, यासाठी सरकार नाही.. ज्या दिवशी आम्ही चुकू, त्या दिवशी सरकार रहावं हा अधिकार नाही, असं वक्तव्य सुधीर मुनगंटीवार यांनी केलं.
नियमित कर्ज भरणाऱ्यांसाठी 50 हजार या सरकारने दिले. जनहिताची कामे हे सरकार करत आहे. दिवाळीला आनंदाचा शिधा या सरकारने केले. एसटी, आरोग्य क्षेत्रात आम्ही सुविधा देत आहोत.
तुम्हीसुद्धा कुटुंबाचं सरकार यावं, यासाठी प्रयत्न करता. मागच्या दोन सव्वा दोन वर्षात तुम्ही काय दिवे लावले? पण जनता इश्वराचा अंश आहे. ते परीक्षा घेतात. 2019 मध्येही जनतेने तुम्हाला निवडून दिलंच नव्हतं. शिवसेनेचा विचार हॅक करून काँग्रेस-राष्ट्रवादीने सरकार बनवलं. आता 2024 मध्ये बघू दूध का दूध, पानी का पानी होईल, असं वक्तव्य सुधीर मुनगंटीवार यांनी केलंय.