Sudhir Mungantiwar : राज्यपालांनी पेढा भरवण्यावरुन टोलेबाजी! शरद पवारांवर सुधीर मुनगंटीवार यांचा पलटवार, म्हणाले…

हे वक्तव्य करत भाजपच्या सुधीर मुनगंटीवारांनी राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांच्यावर पलटवार केलाय. त्याचबरोबर विधानसभा अध्यक्ष निवडीवर बोलताना विधानसभा अध्यक्षपदाची निवड करण्यासाठी व्हीप लागतच नाही असंही ते म्हणालेत.

Sudhir Mungantiwar : राज्यपालांनी पेढा भरवण्यावरुन टोलेबाजी! शरद पवारांवर सुधीर मुनगंटीवार यांचा पलटवार, म्हणाले...
शरद पवारांवर सुधीर मुनगंटीवार यांचा पलटवार, म्हणाले...Image Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Jul 03, 2022 | 10:41 AM

मुंबई: मी कधी राज्यपालांना (Governor)पेढा भरवला नाही आणि मुख्यमंत्री झाल्यावर सुद्धा त्यावेळी राज्यपालांनीही कधी मला पेढा भरवला नाही अशा आशयाचं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (NCP Sharad Pawar) यांनी केलं होतं. त्याला पलटवार करताना सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) म्हणालेत,” तेव्हाचे जे राज्यपाल आहेत त्यांना कधीच झालेल्या मुख्यमंत्र्यांना पेढा भरवावा असं वाटलं नसेल , लोकशाहीच्या विजयाचा आनंद झाला नसेल, संविधानाच्या तरतुदीच्या सन्मानाचा आनंद झाला नसेल आणि तेव्हा मजबुरीने राज्यपाल महोदयांनी शपथ दिली असा त्यांचा भाव असेल तर कदाचित पेढा भरवला नसेल. त्यासाठी या राज्यपालांना दोष देण्याचं काय कारण आहे? राज्यपाल आणि त्यांनी पेढा भरवणं यावर आक्षेप घेणं म्हणजे मनाचा कोतेपणा आहे.” हे वक्तव्य करत भाजपच्या सुधीर मुनगंटीवारांनी राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांच्यावर पलटवार केलाय. त्याचबरोबर विधानसभा अध्यक्ष निवडीवर बोलताना विधानसभा अध्यक्षपदाची निवड करण्यासाठी व्हीप लागतच नाही असंही ते म्हणालेत.

विधानसभा अध्यक्षपदाची निवड करण्यासाठी व्हीप लागतच नाही

विधानसभा अध्यक्ष पदाची निवड ही तशी बिनविरोधच होत असते. पण सध्याच्या राजकीय नाट्यानंतर काहीही होऊ शकते. यामुळे महाविकास आघाडीने देखील उमेदवार दिला आहे. तर दुसरीकडे विधानसभा अध्यक्षपदाची निवड करण्यासाठी व्हीप लागतच नाही. सभागृहात उपस्थित असलेल्या सदस्यांच्या बहुमतावरुन अध्यक्ष ठरविला जात असल्याचे मुनगंटीवार यांनी सांगितले आहे. त्यामुळे राजकीय नाट्यानंतर या सर्व बाबींवर पडदा पडेल असे वाटत असताना आता अध्यक्ष पदावरुनही राजकारण सुरु झाले आहे. तर दुसरीकडे बंडखोर आमदारांचेही मत महाविकास आघाडी उमेदवाराला मिळतील असा विश्वास महाविकास आघाडीकडून व्यक्त केला जात आहे.

हे सुद्धा वाचा

माझा पक्ष, माझा विकास हेच या आघाडीमधील नेत्यांचे विचार

सभागृहाच्या अध्यक्ष पदाची निवड ही महत्वाची असते. त्यानुसारच सभागृहातील निर्णयांना अर्थ प्राप्त होतो. असे असाताना महाविकास आघाडी सरकारने अध्यक्ष पदाची निवडच केली नाही. त्यांचे धोरण हे लोकशाहीला घातक होते. माझा पक्ष, माझा विकास हेच या आघाडीमधील नेत्यांचे विचार असल्याचे म्हणत मुनगंटीवार यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरही टीका केली. तर भाजपाचा उमेदवार हा सत्याच्या बाजूने असणार तर महाविकास आघाडीकडून केवळ राजकारण करण्यासाठी उमेदवार दिल्याचेही त्यांनी सांगितले आहे.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.