‘राज्यातील युवा, शेतकरी, कलाकार आत्महत्येच्या वाटेवर, सरकार बिल्डरांना सवलती देण्यात व्यस्त’, भाजपचं टीकास्त्र

पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्ष भाजपने राज्य सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी आत्महत्येच्या प्रकारानंतर सरकारवर गंभीर आरोपही केलाय.

'राज्यातील युवा, शेतकरी, कलाकार आत्महत्येच्या वाटेवर, सरकार बिल्डरांना सवलती देण्यात व्यस्त', भाजपचं टीकास्त्र
केशव उपाध्ये, मुख्य प्रवक्ते, भाजप
Follow us
| Updated on: Jul 04, 2021 | 3:08 PM

मुंबई : कोरोना संकटाच्या काळात राज्यात प्रत्येक वर्गातील नागरिकांना अडचणींचा मोठा सामना करावा लागत आहे. अशावेळी आत्महत्येसारखे प्रकार आता घडताना दिसत आहेत. राज्यात एकाच दिवशी शेतकरी, युवक आणि एका कलाकाराने आत्महत्या केल्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्ष भाजपने राज्य सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी आत्महत्येच्या प्रकारानंतर सरकारवर गंभीर आरोपही केलाय. (Suicide of Farmer, MPSC student and an artiste on the same day)

“राज्यातील युवा, शेतकरी, कलाकार हे निराशेने आत्महत्याचा मार्गावर असताना ठाकरे सरकार काय करतय तर बिल्डरांना सवलती देत आहे. चार घटना त्यात एकाच दिवशी 3 आत्महत्या. 1. प्रशासनाच्या अनास्थेमुळे लोहा नांदेड येथील दिव्यांग शेतकऱ्याची आत्महत्या, 2. एमपीएसीतील विलंबामुळे स्वप्निल लोणकरची आत्महत्या, 3. कला दिग्दर्शक राजेश साप्ते यांची आत्महत्या. मात्र, राज्य सरकारची प्राथमिकता काय तर BDDचाळ प्रकल्प एकही वीट लावली नसताना बिल्डर्सना 500 कोटी रूपये देण्याचा प्रस्ताव” असं ट्वीट करत केशव उपाध्ये यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीकास्त्र डागलंय.

‘एमपीएससीच्या कार्यपद्धतीचं नव्यानं अवलोकन गरजेचं’

पुण्यातील आत्महत्येची घटना दुर्दैवी आहे. एकूणच एमपीएससीच्या कार्यपद्धतीचं नव्याने अवलोकन करणं आवश्यक आहे. अनेक जागा रिक्त आहेत. परीक्षा उशिरा होतात. अनेक तरुण यामुळे भरडले जात आहे. एमपीएससीला स्वातंत्र्य हवंच पण स्वैराचार नको, अशा कडक शब्दात फडणवीस यांनी एमपीएससीवरही तोफ डागली आहे. स्वप्नील लोणकर या तरुणाने आत्महत्या केलीय. तो अथक परिश्रम घेऊन एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण झाला. पण उत्तीर्ण होऊन दीड वर्षे झाले तरी त्याला लोकसेवा आयोगाने नियुक्ती दिली नाही. अखेर नैराश्यातून त्याने आत्महत्येचं टोकाचं पाऊल उचललं. त्यानंतर सर्व स्तरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.

संबंधित बातम्या : 

युवी पिढी नैराश्यात, MPSC परीक्षा घ्या आणि प्रलंबित नियुक्त्याही द्या; रोहित पवार यांची सरकारला विनंती

सरकारच्या नाकर्तेपणामुळे माझ्या मुलाची आत्महत्या, स्वप्निल लोणकरच्या कुटुंबियांचा आरोप

Suicide of Farmer, MPSC student and an artiste on the same day

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.