Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘मुस्लिमांच्या अंगाला हात लावू देणार नाही, त्यांची जबाबदारी आमची’, सुजात आंबेडकरांचं राज ठाकरेंना थेट आव्हान

मुस्लिमांच्या अंगाला हात लावू देणार नाही. त्यांची जबाबदारी आमची आहे. महाविकास आघाडीनं राज ठाकरेंवर कारवाई करण्याची मागणीही सुजात आंबेडकर यांनी केलीय.

'मुस्लिमांच्या अंगाला हात लावू देणार नाही, त्यांची जबाबदारी आमची', सुजात आंबेडकरांचं राज ठाकरेंना थेट आव्हान
सुजात आंबेडकर, वंचित बहुजन आघाडीImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Apr 06, 2022 | 5:56 PM

पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी गुढीपाडव्याच्या मेळाव्यात शिवतीर्थावरुन हिंदुत्वाचा मुद्दा जोरकसपणे मांडला. इतकंच नाही तर मिशिदीवरील भोंगांच्या मुद्द्यावरुनही राज ठाकरे यांनी आक्रमक भूमिका घेतलीय. राज्य सरकारला मशिदीवरील भोंगे काढावेच लागतील. अन्यथा त्यांच्या भोग्यांसमोर लाऊडस्पीकर लावून हनुमान चालिसा लावा, असा आदेशच राज ठाकरे यांनी मनसैनिकांना दिलाय. अशावेळी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांचा मुलगा सुजात आंबेडकर (Sujat Ambedkar) यांनी राज ठाकरेंना थेट आव्हान दिलंय. मुस्लिमांच्या अंगाला हात लावू देणार नाही. त्यांची जबाबदारी आमची आहे. महाविकास आघाडीनं राज ठाकरेंवर कारवाई करण्याची मागणीही सुजात आंबेडकर यांनी केलीय.

राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगाच्या मुद्द्यावरुन घेतलेल्या भूमिकेमुळं राज्यातील राजकारण ढवळून निघालं आहे. अशावेळी सुजात आंबेडकर यांनी राज ठाकरे यांना थेट आव्हान दिलंय. मुस्लिमांच्या अंगाला हातही लावू देणार नाही. आता त्यांची जबाबदारी आमची आहे. उच्चवर्णीय ब्राह्मण बहुजनांच्या पोरांना भडकावण्याचं काम करतात. वंचित बहुजन आघाडी वेळ पडली तर रस्त्यावरही उतरणार. जर अमित ठाकरेंना हनुमान चालिसा येत नसेल तर इतरांच्या पोरांना सांगण्याचा हक्क तुम्हाला कुणी दिला? महाविकास आघाडीनं पुरोगामीत्वाची चादर पांघरलीय, तर संधी आहे राज ठाकरेंवर कारवाई करा. मशिदीच्या बाजूला भोंगे लागतील या वक्तव्यावर आक्षेप आहे, कारवाई व्हायला हवी. संपत चाललेला पक्ष दंगलीवर उभा करु नका, असं वक्तव्यही सुजात आंबेडकर यांनी केलंय.

सुजात आंबेडकरांचं अमित ठाकरेंना चॅलेंज

मशिदीवरील भोंग्यांवर राज ठाकरे यांनी केलेल्या वक्तव्याचा सुजात आंबेडकर यांनी खरपूस समाचार घेतलाय. राज ठाकरेंच्या वक्तव्याला पूर्णपणे पाठिंबा आहे, पण त्याआधी अमित ठाकरेंनी हनुमान चालीसा म्हणून दाखवावी, असं आव्हान सुजात आंबेडकर यांनी दिलं आहे. राज ठाकरेंनी गुढी पाडव्याच्या दिवशी केलेल्या भाषणात मशिदींवरील भोंग्यावर निशाणा साधत वक्तव्य केलं होतं. मशिदींवर मोठ्या आवाजात भोंगे लावले, तर मी तिथे हनुमान चालीसा म्हणायला लावेन, असं राज ठाकरेंनी म्हटलं होतं. राज ठाकरेंच्या या वक्तव्यावर सुजात यांनी निशाणा साधत राज ठाकरे आणि मनसेवर टीका केली आहे.

काल कुणीतरी एक वक्तव्य केलेलं की, जर मोठे भोंगे लावले मशिदीवर तर मी पोरांना हनुमान चालीसा तिकडे जाऊन म्हणायला लावेन. आपण सगळ्यांनी हे वक्तव्य ऐकलंय. माझा तुमच्या वक्तव्याला शंभर टक्के पाठिंबा आहे. फक्त एक गोष्ट आहे.. तिकडे अमित ठाकरेंना हनुमान चालीसा म्हणायला लावा. मला एखही बहुजन पोरगा नकोय तिकडे. जी कुणी जात आहेत तिकडे हनुमान चालीसा म्हणायला. त्यांनी टी शर्ट काढून जानवं दाखवा आतमध्ये… मग हनुमान चालीसा म्हणा… असं आव्हान सुजात आंबेडकर यांनी दिलंय.

इतर बातम्या : 

Sharad Pawar : केंद्रीय तपास यंत्रणा ‘मातोश्री’पर्यंत पोहोचल्या म्हणून तुम्ही मोदींना भेटलात? पवार म्हणतात, नाही नाही…

Sharad Pawar Modi Meet : मंत्रिमंडळ बदलांसह ईडी कारवाईपर्यंत! पवारांच्या पत्रकार परिषदेतील 10 मोठे मुद्दे

ठाकरे अन् शिंदे सर्वपक्षीय बैठकीत आमने-सामने, शिंदे दालनात येताच...
ठाकरे अन् शिंदे सर्वपक्षीय बैठकीत आमने-सामने, शिंदे दालनात येताच....
फक्त शिंदेवरच जोक का? कामराची वादानंतर TV9 कडे पहिली प्रतिक्रिया काय?
फक्त शिंदेवरच जोक का? कामराची वादानंतर TV9 कडे पहिली प्रतिक्रिया काय?.
शिंदेंच्या तमाशातला नाच्या म्हणजे पाटील, मनसेची गुलाबराव पाटलांवर टीका
शिंदेंच्या तमाशातला नाच्या म्हणजे पाटील, मनसेची गुलाबराव पाटलांवर टीका.
कुणाल कामराच्या CDR आणि बँक खात्यांची चौकशी होणार
कुणाल कामराच्या CDR आणि बँक खात्यांची चौकशी होणार.
कामराच्या स्टुडिओची तोडफोड कंबोज म्हणाले, अभी तो सिर्फ स्टूडिओ टूटा है
कामराच्या स्टुडिओची तोडफोड कंबोज म्हणाले, अभी तो सिर्फ स्टूडिओ टूटा है.
अमीर खानने घेतली धनंजय देशमुखांची भेट
अमीर खानने घेतली धनंजय देशमुखांची भेट.
कामराच्या गाण्यावरून ठाकरे vs शिंदेंच्या सेनेची जुगलबंदी, बघा व्हिडीओ
कामराच्या गाण्यावरून ठाकरे vs शिंदेंच्या सेनेची जुगलबंदी, बघा व्हिडीओ.
शेतकऱ्यांना दिलासा; भरपाई म्हणून मिळणार 53 हजार 727 कोटी
शेतकऱ्यांना दिलासा; भरपाई म्हणून मिळणार 53 हजार 727 कोटी.
आरोपी फहीम खानच्या घरावर फिरवला बुलडोजर
आरोपी फहीम खानच्या घरावर फिरवला बुलडोजर.
रायगडावरील वाघ्या कुत्र्याची समाधी हटवणार? श्रीमंत कोकाटेंनी म्हटलं...
रायगडावरील वाघ्या कुत्र्याची समाधी हटवणार? श्रीमंत कोकाटेंनी म्हटलं....