Sujat Ambedkar: ‘आधी अमित ठाकरेंना हनुमान चालीसा म्हणायला लावा’ सुजातचं चॅलेंज ‘राजपुत्र’ स्वीकारणार?
Suraj Ambedkar on Amit Thackeray: आता सुजात आंबेडकर यांनी केलेल्या वक्तव्याला अमित ठाकरे काय प्रत्युत्तर देतात हे पाहणं महत्त्वाचंय. एकूणच राज्यात मशिदींवर भोंगे विरुद्ध हनुमान चालीसा वाद चांगलाच गाजण्याचीही चिन्ह आहेत.
मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या मुलाला सुजात आंबेडकर यांनी खुलं आव्हान दिलं आहे. मशिदीवरील भोंग्यांवर राज ठाकरे यांनी केलेल्या वक्तव्याचा सुजात आंबेडकर (Sujat Ambedkar on Amit Thackeray) यांनी खरपूस समाचार घेतलाय. राज ठाकरेंच्या वक्तव्याला पूर्णपणे पाठिंबा आहे, पण त्याआधी अमित ठाकरेंनी हनुमान चालीसा (Hanuman Chalisa) म्हणून दाखवावी, असं आव्हान सुजात आंबेडकर यांनी दिलं आहे. राज ठाकरेंनी गुढी पाडव्याच्या दिवशी केलेल्या भाषणात मशिदींवरील भोंग्यावर निशाणा साधत वक्तव्य केलं होतं. मशिदींवर मोठ्या आवाजात भोंगे लावले, तर मी तिथे हनुमान चालीसा म्हणायला लावेन, असं राज ठाकरेंनी म्हटलं होतं. राज ठाकरेंच्या या वक्तव्यावर सुजात यांनी निशाणा साधत राज ठाकरे आणि मनसेवर टीका केली आहे.
नेमकं काय म्हणाले सुजात?
सुजात आंबेडकर यांनी राज ठाकरेंचे सुपुत्र अमित ठाकरेंना आव्हान देत वक्तव्य करताना म्हटलंय, की…
काल कुणीतरी एक वक्तव्य केलंलं.. की जर मोठे भोंगे लावले मस्जिदीवर तर मी पोरांना हनुमान चालीसा तिकडे जाऊन म्हणायला लावेन.. आपण सगळ्यांनी हे वक्तव्य ऐकलंय..?
लोकांमधून आवाज : हो..
माझा तुमच्या वक्तव्याला शंभर टक्के पाठिंबा आहे… फक्त एक गोष्ट आहे.. तिकडे अमित ठाकरेंना हनुमान चाळीसा म्हणायला लावा.. मला एकही बहुजन पोरगा नकोय तिकडे.. जी कुणी जात आहेत तिकडे हनुमान चालीसा म्हणायला.. त्यांनी टीशर्ट काढून जानवं दाखवा आतमध्ये.. मग हनुमान चालीसा म्हणा.. एक बहुजन माणूस नकोय मला…
दुसरी गोष्ट ..
राज साहेबांना ही कळकळीची विनंती.. तुम्ही शरद पवारांचा इंटरव्हू घ्या… तुम्ही स्वतःचा उभा पक्ष भाड्यानं लावून दुसऱ्याच्या प्रचाराला फिरा..
पण तुमचा संपलेला पक्ष हिंदू मुस्लिम दंगलीवर उभा नका करु, एवढी कळकळीची विनंती आहे आणि महाराष्ट्र ऑथोरीटी, मुंबई ऑथोरीटी, महाराष्ट्र मुंबई पोलीस, या सगळ्यांना एवढं आव्हान देतो.. की तुमच्या सगळ्यांसमोर हे वक्तव्य केलंय त्यांनी! जर दंगल झाली, तर तुम्हाला माहितीये कुणाला पकडायचं..
पाहा व्हिडीओ :
अमित ठाकरे प्रत्युत्तर देणार?
आता सुजात आंबेडकर यांनी केलेल्या वक्तव्याला अमित ठाकरे काय प्रत्युत्तर देतात हे पाहणं महत्त्वाचंय. एकूणच राज्यात मशिदींवर भोंगे विरुद्ध हनुमान चालीसा वाद चांगलाच गाजण्याचीही चिन्ह आहेत.
पाहा राज ठाकरे यांचं गुढीपाडव्याला केलेलं संपूर्ण भाषण:
कोण आहेत सुजात आंबेडकर?
सुजात आंबेडकर हे प्रकाश आंबेडकर यांचे सुपुत्र आहेत. तरुण वयापासून ते राजकारण सक्रिय आहेत. सुजात यांनी पुण्यातील फर्ग्युसन कॉलेजमधून पदवी घेतली आहे. तसंच ते ड्रम वाद्य वाजवण्यातही माहीर आहेत. सध्या ते वंचित बहुजन आघाडीच्या युवा संघटनेचं काम पाहतात.
पाहा सुजात आंबेडकर EXCLUSIVE :
..तर भोंग्यांना हनुमान चालीसेनं प्रत्युत्तर : पाहा Video : राज ठाकरे नेमकं काय म्हणाले?
संबंधित बातम्या :
राष्ट्रवादीबाबत Raj Thackeray यांनी केलेल्या वक्तव्याला 200 टक्के सहमत – चंद्रकांत पाटील