वानखेडे स्टेडियममध्ये सुजय विखेंच्या भाजप प्रवेशाचा कार्यक्रम

मुंबई : काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे सुपुत्र सुजय विखे पाटील यांचा भाजपमधील प्रवेश निश्चित झाला आहे. सुजय विखेंच्या पक्षप्रवेशाचा कार्यक्रम दुसरं-तिसरं कुठं होणार नसून, थेट मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर पार पडणार आहे. वानखेडे स्टेडियममध्ये गरवारे क्लब हाऊस आहे, तिथे सुजय विखेंच्या भाजपप्रवेशासाठी भाजपसह विखेंच्या कार्यकर्त्यांनी जंगी तयारी केली आहे. […]

वानखेडे स्टेडियममध्ये सुजय विखेंच्या भाजप प्रवेशाचा कार्यक्रम
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:17 PM

मुंबई : काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे सुपुत्र सुजय विखे पाटील यांचा भाजपमधील प्रवेश निश्चित झाला आहे. सुजय विखेंच्या पक्षप्रवेशाचा कार्यक्रम दुसरं-तिसरं कुठं होणार नसून, थेट मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर पार पडणार आहे. वानखेडे स्टेडियममध्ये गरवारे क्लब हाऊस आहे, तिथे सुजय विखेंच्या भाजपप्रवेशासाठी भाजपसह विखेंच्या कार्यकर्त्यांनी जंगी तयारी केली आहे.

सुजय विखे पाटील यांचा भाजपमधील प्रवेश आज दुपारी एक वाजता होणार आहे. या प्रवेश सोहळ्याला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वत: उपस्थित राहणार आहेत. नगरच्या काही निवडक कार्यकर्त्यांना आज रात्री मुंबईत येण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे विखेंकडून मुंबईत शक्तीप्रदर्शन केलं जाण्याचीही शक्यता आहे.

राधाकृष्ण विखे पाटील राजीनामा देणार

महाराष्ट्र काँग्रेसमध्ये लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मोठा राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे. विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील पदाचा राजीनामा देणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. विखे पाटलांचे चिरंजीव सुजय विखे उद्या भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यापूर्वी विखे पाटील पदाचा राजीनामा देणार असल्याचं बोललं जातंय. मुलगा भाजपमध्ये प्रवेश करत असल्यामुळे नैतिकतेचा प्रश्न म्हणूम राजीनामा देणार असल्याची माहिती आहे.

विखे पाटलांची खंत 

मुलाच्या जागेसाठी एवढा संघर्ष करावा लागतोय, काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांची खंत व्यक्त केली. पक्षातील विरोधकांचा दिल्लीत हायकमांडसमोर विखेंनी पाढा वाचला.

तसेच, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनीही सुजय विखेंच्या भाजप प्रवेशाच्या शक्यतेची दखल घेतली. राहुल गांधी यांनी थेट राषट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी फोनवरुन बातचीत केली. त्यामुळे शरद पवार आणि राष्ट्रवादीची दक्षिण नगरच्या जागेबाबत काय भूमिका असेल, हे लवकरच स्पष्ट होईल.

तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.