सुशांत सिंह प्रकरणात ईडीनं 8 तास चौकशी, ते गप्पा मारत होते का? थोडं थांबा, महिनाभरात सत्य समोर येणार : सुजय विखे
भाजपचे खासदार सुजय विखे यांनी अभिनेता सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणी राज्य सरकारवर अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत (Sujay Vikhe on Sushant Singh Case).
अहमदनगर : भाजपचे खासदार सुजय विखे यांनी अभिनेता सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणावरुन राज्य सरकारच्या भूमिकेवर अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत (Sujay Vikhe on Sushant Singh Case). ईडीने या प्रकरणात 8 तास चौकशी केली आहे. ते काय इतका वेळ गप्पा मारत होते का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. तसेच थोडं थांबा, तपास सीबीआयकडे गेला आहे. महिनाभरात सत्य समोर येणार आहे, असंही नमूद केलं आहे.
सुजय विखे म्हणाले, “सुशांत सिंह प्रकरणात सीबीआयची चौकशी सुरु झाली आहे. काल (7 ऑगस्ट) ईडीनेही 8 तास चौकशी केली. सीबीआय या प्रकरणाचा महिनाभरात तपास लावून सत्या समोर आणेल. त्यावेळी हे सर्व जनतेसमोर येणार आहे. आता हा बॉल सीबीआयच्या कोर्टात आहे. ईडीने 8 तास चौकशी केली आहे, तर त्यात त्यांनी गप्पा तर मारल्या नसतील ना. चौकशी होतेय, मला खात्री आहे लवकरच सत्य समोर येईल.”
TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!
“आमचा सरकारवर किंवा मुंबई पोलिसांवरही आक्षेप नाही. आमचं म्हणणं केवळ सत्य बाहेर यायला हवं इतकंच आहे. ते सीबीआयच्या माध्यमातून बाहेर आलं तर हकत नाही. याचा आणि बिहारच्या निवडणुकीचा काहीही संबंध नाही. एखाद्या महाराष्ट्राच्या सुपुत्राचा बाहेर राज्यात झाला आणि त्याच्या नातेवाईकांनी मुख्यमंत्र्यांकडे संशय व्यक्त केला असता तर मुख्यमंत्र्यांनी काय केलं असतं? उद्धव ठाकरेंनी याचं उत्तर द्यावं. आपल्या सुपुत्राला सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी त्या राज्याच्या मुख्यमंत्र्याची असते. तिच भूमिका नितीश कुमार यांनी घेतली आहे,” असंही त्यांनी नमूद केलं.
“थोडे दिवस थांबा एक महिनाभरात सीबीआय या प्रकरणाचा छडा लावेल. सीबीआय राजकारणात आहे असा सत्ताधाऱ्यांचा आरोप आहे का? सीबीआय देखील केंद्राच्या राजकारणात आहे असा ठाकरे सरकारचा आरोप आहे का? सीबीआय ही एक स्वतंत्र संस्था आहे. हे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. तुमचा सर्वोच्च न्यायालयावर विश्वास नाही का? मग तुमचा संविधानावरही विश्वास आहे का?” असा प्रश्न सुजय विखे यांनी विचारला.
संबंधित बातम्या :
लिल्लू ते बेबू, सुशांतच्या नोट्समध्ये उल्लेख, रियाकडे सुशांतची खास भेट
महाराष्ट्र सरकार कुणाला घाबरत नाही, बिहार निवडणुकीसाठी सुशांतच्या आत्महत्येवरुन राजकारण : रोहित पवार
Sujay Vikhe on Sushant Singh Case