इंदापूर – पुणे जिल्ह्यातल्या इंदापूर तालुक्यातील कडबनवाडी येथील चिंकारा संरक्षण आणि जैवविविधता वन उद्यानातील विकास कामांचे भूमिपूजन राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते झाले. यावेळी व्यासपीठावर इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे यांची देखील उपस्थिती होती. यावेळी बोलताना सुप्रीया सुळे आणि आमदार भरणे यांच्यामध्ये शाब्दीक कोट्या रंगल्याने उपस्थितांना हसू आवरले नाही.
राज्यमंत्री भरणे जेव्हा बोलत होते, तेव्हा त्यांनी हर्षवर्धन पाटलांना टोला लगावताना आपाण पाटलांना इंदापुरात लई भितो असे म्हटले. दरम्यान जेव्हा सुप्रीया सुळे बोलण्यासाठी उभ्या राहिल्या तेव्हा त्यांनी भरणे यांच्याकडे प्रश्नार्थक चिन्हाने पाहात नेमके तुम्ही कोणत्या पाटलांना भितात? मला कळले नाही असे म्हटले. पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, माझ्या दोनही बहिणी या पाटलांच्याच घरात दिल्या आहेत. माझे नेमके कुठले मेव्हुणे तुम्हाला त्रास देतात हे मलाही सांगा, सुळे असे म्हणताच उपस्थितांमधून एकच हशा पिकला. दरम्यान तुम्ही ज्या पाटलांबद्दल बोलता आहात ते मला कळले आहे, त्यांना घाबरण्याचे कारणच काय? तुम्ही त्यांना आधीच कुस्तीत चिटपट केल्याचे सुप्रीया सुळे यावेळी म्हणाल्या. यावेळी त्यांचा रोख देखील हर्षवर्धन पाटलांकडेच होता.
इंदापूर विधानसभा मतदारसंघात अटीतटीची निवडणूक पहायला मिळाली होती. राष्ट्रवादीचे उमेदवार दत्तात्रय भरणे यांच्या विरोधात हर्षवर्धन पाटील उभे होते. त्यांना भाजपाच्या वतीने उमेदवारी देण्यात आली होती. ही निवडणूक भरणे यांना जड जाणार असल्याचे बोलले जात होते. मात्र या अटीतटीच्या लढतील भरणे यांनी पाटलांचा तीन हजार मतांनी पराभव केला.
संबंधित बातम्या
‘ते रोज लवंग्या फोडतात, आम्ही बॉम्ब फोडणार’, प्रसाद लाड यांचा ठाकरे सरकारला इशारा
केंद्राने इंधनाचे दर कमी केले; आता राज्य सरकारही दर कमी करणार की जनतेचा रोष पत्करणार?