पक्षश्रेष्ठीच्या मध्यस्थीनंतर राष्ट्रवादीतील दोन गटात समेट, पालघर जिल्हापरिषद अध्यक्षाच्या निवडीसाठी एकदिलाने काम करणार

आगामी जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाच्या निवडीमुळे राष्ट्रवादीमध्ये निर्माण झालेली गटबाजी आणि भांडण शेवटी मिटले आहे.

पक्षश्रेष्ठीच्या मध्यस्थीनंतर राष्ट्रवादीतील दोन गटात समेट, पालघर जिल्हापरिषद अध्यक्षाच्या निवडीसाठी एकदिलाने काम करणार
palghar jilha parishad
Follow us
| Updated on: Jul 19, 2021 | 6:11 PM

पालघर : आगामी जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाच्या निवडीमुळे राष्ट्रवादीमध्ये निर्माण झालेली गटबाजी आणि भांडण शेवटी मिटले आहे. पक्षश्रेष्ठींनी हस्तक्षेप करत शेवटी येथील राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांमधील वाद मिटवला आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे निलेश सांबरे (Nilesh Sambre) आणि राष्ट्रवादीचे आमदार सुनिल भुसारा (Sunil Bhusara) यांच्या दोन गटांत वाद निर्माण झाला होता. या दोन्ही गटाने तीन दिवसांपूर्वी जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात तूफान राडा केला होता. आता हा वाद मिटला आहे. (Sunil Bhusara and Nilesh Sambre group will fight together in palghar zilla parishad president election clash has came to end)

नेमका वाद काय आहे ?

पालघर जिल्हा परिषद अध्यक्षांची आणि उपाध्यशांची निवडणूक जवळ आली असल्याने जिल्हा परिषद गटस्थापनेसाठी निलेश सांबरे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस गटाचे 6 सदस्य आणि काँग्रेसच्या 1 सदस्यांच्या पाठिंबाने गट स्थापन करण्यासाठी तीन दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयात बसले होते. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील भुसारा यांच्या गटाचा याला विरोध होता. त्यामुळे जिल्हाधिकारींच्या दालनात निलेश सांबरे गट आणि सुनील भुसारा गटात मोठा गदारोळ झाला होता. यावेळी जिल्हा परिषदेच्या महिला सदस्या मंदा घरट यांना दालनाबाहेर खेचून काढण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. तसेच त्यांना धक्काबुक्कीही करण्यात आली. राड्यानंतर जिल्हापरिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षांच्या निवडीचे काय होणार ? कोणते नवे राजकीय समीकरणं उदयास येणार का ? असे प्रश्न उपस्थित केले जात होते.

पक्षश्रेष्ठींची मध्यस्थी, एक गट स्थापन करण्याचा निर्णय

मात्र, अखेर पक्षश्रेष्ठींच्या म्हणण्यानुसार राष्ट्रवादीच्या जिल्हा परिषदेच्या आठ सदस्यांनी एकत्र येत जिल्हा परिषदेचा एक गट स्थापन करण्याचा निर्णय घेतला. तसा प्रस्तावसुद्धा जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आले. या प्रस्तावाला जिल्हाधिकारी यांनी मान्यता दिली असून ठरल्यानुसार राष्ट्रवादी, शिवसेना व बहुजन विकास आघाडी यांनी एकत्र  येत पुन्हा एकदा सत्ता स्थापन करण्याचा निर्धार करण्यात आला. आमदार सुनील भुसारा यांनी tv9 मराठीला तशी माहिती दिली.

संघटनेमध्ये मतभेद असतात मनभेद नसतात

तसेच मित्रपक्षांच्या सोबतीने जिल्हापरिषदेवर एकत्र काम करणार आहेत. संघटनांमध्ये मतभेद असतात. मात्र मनभेद नसतात. पक्षश्रेष्ठींच्या सूचनेनुसार आम्ही पुन्हा भेदभाव विसरून राष्ट्रवादीच्या आठ सदस्यांनी गट स्थापन केलेला आहे. आमच्या पक्षाच्या वतीने आम्ही उद्या शिवसेनेसोबत ठामपणे उभे राहणार आहोत. महाविकास आघाडी जिल्हा परिषदेवर पुन्हा एकदा आपले वर्चस्व प्रस्थापित करेल, असे भुसारा म्हणाले. तसेच यावेळीसुद्धा राष्ट्रवादी शिवसेना, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, बहुजन विकास आघाडी या सर्व मित्रपक्षांच्या सोबतीने जिल्हा परिषदेवर काम करणार आहे, असेही भुसारा यांनी सांगितले.

इतर बातम्या :

VIDEO : बदलापूरजवळच्या कोंडेश्वर धबधब्याने धडकी भरवली, तुफान पावसाने रौद्ररुप

बेस्ट CM ला देव तरी कसा पावेल, आषाढी वारीवरुन भाजपची मुख्यमंत्र्यांवर बोचरी टीका

Mumbai Rains Live Updates | विरार पूर्वेच्या पांढरतारा नदीला पूर, पूल पाण्याखाली, रस्ताही खचला

(Sunil Bhusara and Nilesh Sambre will fight together in palghar zilla parishad president election clash has came to end)

सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.