आम्ही कुठे जावं हे ठरवणारे संजय राऊत कोण?; सुनील तटकरे भडकले
नुकताच सुनील तटकरे यांनी टीव्ही9 च्या काॅनक्लेव्हमध्ये मोठे खुलासे केले आहेत. यावेळी काही महत्वाच्या विषयांवर बोलताना सुनील तटकरे दिसले. हेच नाही तर थेट संजय राऊत यांच्यावर हल्लाबोल करताना सुनील तटकरे हे दिसले आहेत. राऊतांना थेट खडेबोल देखील सुनावले आहेत.
मुंबई : नुकताच सुनील तटकरे हे मोठे भाष्य करताना दिसले. सुनील तटकरे यांनी काही मोठ्या विषयांवर जाहिरपणे भाष्य केले आहे. हेच नाही तर सकाळच्या शपथविधीबद्दल बोलताना देखील सुनील तटकरे हे दिसले आहेत. सध्या रायगडच्या जागेवरून महायुतीमध्ये कुठेतरी धुसफूस बघायला मिळतंय. त्यामध्येच आता सुनील तटकरे यांनी मोठा हल्लाबोल केल्याचे दिसतंय. हेच नाही तर सुनील तटकरे यांनी म्हटले, आमदारांच्या मनात दादांनी घेतलेला निर्णय अगदी योग्यच होता. यासोबतच थेट संजय राऊत यांच्यावर देखील हल्लाबोल करताना सुनील तटकरे दिसले आहेत.
सुनील तटकरे म्हणाले की, संजय राऊत कोण आम्ही कुठे जावं हे ठरवणारे. त्यांच्या पक्षातील लोक त्यांचं ऐकत नाहीत. आम्ही कसे ऐकणार. राऊत यांच्याबद्दल आदर आहे. ते आमच्या जिल्ह्यातील आहेत. प्रतिथयश संपादक आहेत. त्यांचं लिखाण चांगलं आहे. पण त्यांच्या बोलण्यामुळे आमचं जाणं थांबलं असं म्हणणं चुकीचं आहे, असे स्पष्ट बोलताना सुनील तटकरे दिसले.
पुढे सुनील तटकरे हे म्हणाले की, संजय राऊत यांना त्यांची माणसं थांबवता आली नाहीत, आम्हाला कसे थांबवतील. शिवसेनेतील एका तरी व्यक्तीला राऊतांनी थांबवलं का? असा थेट मोठा प्रश्नच सुनील तटकरे यांनी उपस्थित केला. संजय राऊत त्यांच्या स्टाईलने बोलत असतात. आमच्या पक्षात काय चर्चा झाली हे सांगायला ते आमचे प्रवक्ते आहेत का? असेही तटकरे म्हणाले.
राऊत सांगतात तसे काही घडले नसल्याचे सुनील तटकरे यांच्याकडून स्पष्ट करण्यात आले. हेच नाही तर काही गुपीत गुपीतच राहवीत, असेही सुनील तटकरे यांच्याकडून सांगण्यात आले. यावेळी पहाडेच्या शपथविधीबद्दल बोलताना तटकरे दिसले. यावेळी संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका करताना सुनील तटकरे दिसले.
सुनील तटकरे यांनी एकप्रकारे संजय राऊत यांना खडेबोल सुनावल्याचे दिसतंय. सुनील तटकरे हे टीव्ही9 च्या काॅनक्लेव्हमध्ये बोलताना दिसले. बारामतीमध्ये सुनेत्रा पवार विरोधात सुप्रिया सुळे अशी लढत होण्याचे संकेत देखील सुनील तटकरे यांच्याकडून देण्यात आले. सुनेत्रा पवार या बारामती लोकसभेसाठी इच्छुक असल्याचे देखील सांगितले जाते.