सुप्रिया सुळेंना राज्यात रस नाही; सुप्रियांच्या मुख्यमंत्रीपदाबाबत शरद पवारांचं मोठं विधान

राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या मुख्यमंत्रीपदाबाबत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मोठं विधान केलं आहे. (supriya sule not interested in maharashtra politics says sharad pawar)

सुप्रिया सुळेंना राज्यात रस नाही; सुप्रियांच्या मुख्यमंत्रीपदाबाबत शरद पवारांचं मोठं विधान
Follow us
| Updated on: Dec 03, 2020 | 11:56 AM

मुंबई: राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या मुख्यमंत्रीपदाबाबत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मोठं विधान केलं आहे. सुप्रिया सुळेंना राज्याच्या राजकारणात रस नाही. त्यांना केंद्राच्या राजकारणात रस आहे, असं सांगत सुप्रिया यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या चर्चांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न शरद पवार यांनी केला आहे. (supriya sule not interested in maharashtra politics says sharad pawar)

भाजपचे नेते आशिष शेलार यांनी शरद पवार यांच्या समोरच मराठा स्त्री राज्याची मुख्यमंत्री व्हावी, असं विधान केलं होतं. त्यानंतर सुप्रिया सुळे यांच्या मुख्यमंत्रीपदाबाबतच चर्चा सुरू झाली होती. पण पवारांनी ही चर्चा फेटाळून लावली आहे. सुप्रिया सुळेंना राज्याच्या राजकारणात रस नाही. त्यांना राष्ट्रीय राजकारणात रस आहे. सुप्रियांना देशपातळीवर अनेक पुरस्कार मिळाले आहेत. त्यांना राष्ट्रीय स्तरावर काम करायला आवडतं. प्रत्येकाचा एक इंट्रेस्ट असतो. सुप्रियांचा इंट्रेस्ट तिकडे आहे, असं पवारांनी सांगितलं. दैनिक ‘लोकमत’ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली.

काय म्हणाले होते आशिष शेलार?

ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे यांच्या ‘कर्तृत्वान मराठा स्त्रिया’ या पुस्तकाचं राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या हस्ते नुकतंच प्रकाशन झालं. यावेळी शेलार यांनी पवारांसमोरच कर्तृत्वान मराठा स्त्री राज्याची मुख्यमंत्री व्हावी अशी अपेक्षा व्यक्त केली होती. “संदर्भ पुन्हा अनचॅलेंज राहू नये म्हणून, जर विषय मुख्यमंत्रिपदाचा असेल, तर पवारसाहेब, कर्तृत्त्ववान मराठा स्त्री महाराष्ट्राची मुख्यमंत्री व्हावी, अशी अपेक्षा बाळागणारा समाजात मोठा वर्ग आहे, त्याला माझ्यासारख्या माणसाचं सुद्धा समर्थन असू शकतं,” असं शेलार यांनी सांगून सुप्रिया सुळे यांच्या मुख्यमंत्रीपदाबाबतच्या चर्चेला पुन्हा तोंड फोडले होते.

मात्र, शेलार यांच्या या विधानावर भाजपमधून नाराजी व्यक्त झाल्यावर त्यांनी लगेचच सारवासारव केली होती. पुण्यात एका पत्रकार परिषदेत शेलार यांनी आमचं सरकार आलं तर देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील, असं सांगितलं होतं.

राजकीय विश्लेषक काय म्हणतात?

दरम्यान, पवारांनी सुप्रिया सुळे यांच्या मुख्यमंत्रीपदाबाबतचा विषय टोलवून लावला असला तरी राजकीय विश्लेषकांनी मात्र, सुप्रिया सुळे या मुख्यमंत्री होऊ शकतील असा दावा केला आहे. राजकारणात काहीही होऊ शकतं. आजची विधानं उद्या कायम असतील असं नाही. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनाही राष्ट्रीय राजकारणातच रस होता. पण हायकमांडचे आदेश मिळाल्यानंतर ते राज्यात आले आणि त्यांना मुख्यमंत्रीपद स्वीकारावं लागलं. त्यामुळे काय होईल हे आताच सांगता येणार नाही, असं काही राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे. तर, सुप्रिया सुळे आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्यासह चार दोन महिला राजकारण्यांची नावं कायमच मुख्यमंत्रीपदीसाठी चर्चेत असतात, त्यात काही नवीन नाही. तसेच राजकारणात उद्या काय घडेल हे आताच सांगणं शक्य नाही, असं राजकीय विश्लेषक आणि पत्रकार विजय चोरमारे यांनी सांगितलं. (supriya sule not interested in maharashtra politics says sharad pawar)

संबंधित बातम्या:

पवारसाहेब, कर्तृत्ववान मराठा स्त्री महाराष्ट्राची मुख्यमंत्री व्हावी : आशिष शेलार

शेलार काल म्हणाले, कर्तृत्त्ववान मराठा स्त्री मुख्यमंत्री व्हावी, आज म्हणाले, आमचं सरकार आल्यास मुख्यमंत्रिपदी…..

(supriya sule not interested in maharashtra politics says sharad pawar)

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.