राजकारणात अनेक जयंत पाटील; राणे नक्की कोणत्या जयंत पाटलांबद्दल बोलले?; सुप्रिया सुळेंनी उडवली खिल्ली

महाविकास आघाडीची सत्ता आली नसती तर जयंत पाटील आज भाजपमध्ये असते, भाजप नेते नारायण राणे यांनी केलेल्या या दाव्याची राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी खिल्ली उडवली आहे. (supriya sule raction on on Narayan Rane’s statement)

राजकारणात अनेक जयंत पाटील; राणे नक्की कोणत्या जयंत पाटलांबद्दल बोलले?; सुप्रिया सुळेंनी उडवली खिल्ली
Follow us
| Updated on: Dec 01, 2020 | 12:17 PM

पुणे: महाविकास आघाडीची सत्ता आली नसती तर जयंत पाटील आज भाजपमध्ये असते, भाजप नेते नारायण राणे यांनी केलेल्या या दाव्याची राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी खिल्ली उडवली आहे. राजकारणात अनेक जयंत पाटील आहेत. राणे नेमकं कोणत्या जयंत पाटलांबद्दल बोलले?, असा सवाल करत सुप्रिया सुळे यांनी राणेंच्या विधानाची खिल्ली उडवली आहे. (supriya sule raction on on Narayan Rane’s statement)

राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी ‘टीव्ही 9 मराठी’च्या प्रतिनिधींशी संवाद साधला. बारामती मतदान केंद्रावर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे मतदानासाठी आल्या होत्या, त्यावेळी त्या बोलत होत्या. राणे कोणत्या जयंत पाटलांविषयी बोलले मला माहीत नाही. महाराष्ट्रातील राजकारणात अनेक जयंत पाटील आहेत. मी स्वत: चार-पाच जयंत पाटलांना ओळखते. ते राष्ट्रवादीच्या जयंत पाटलांविषयी बोलले असतील असं वाटत नाही, असं त्या म्हणाल्या.

दरम्यान, लवकरच ठाकरे सरकार पडणार असल्याच्या विरोधकातील दाव्यातील हवाही त्यांनी काढून घेतली. संघटना आणि कार्यकर्ते नीट ठेवण्यासाठी त्यांना असं बोलावं लागतं, त्यांच्याकडे सरकारविरोधात बोलण्यासारखं काहीच नाही म्हणून सरकार पडणार असं ते बोलत असतात, असंही त्या म्हणाल्या.

राणे काय म्हणाले होते?

  • जयंत पाटील यांना त्यांच्या इस्लामापुरात जाऊन उत्तर देणार. पुढचे सरकार आमचेच येणार हे बोलण्याऐवजी जयंत पाटील पुढील सरकारमध्ये मीच मंत्री असेन असं बोलले असतील. आज जर महाविकास आघाडीचं सरकार नसतं तर जयंत पाटील हे भाजपमध्ये असते. जयंत पाटील यांची भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी बोलणी झाली होती. हे सर्व मी त्यांच्या इस्लामपुरात जाऊन उघड करणार आहे.

जयंत पाटलांचं प्रत्युत्तर

  • दुसऱ्यांच्या पक्षात जाण्यापेक्षा मला माझा पक्ष वाढवण्यात जास्त रस आहे. आलेली सत्ता जाते व ती पुन्हा मिळवता येते, ही राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची शिकवण आहे. त्यामुळे सत्ता हा विषय माझ्यासाठी गौण आहे.
  • माझ्या पुरते सांगायचे झाले तर माझी भाजपच्या कोणत्याही वरिष्ठ नेत्याशी भाजपमध्ये जाण्याबाबत चर्चा झाली नाही म्हणून हा खुलासा. मी शरद पवारांचा कार्यकर्ता असल्याने असा विचार माझ्या मनात कधीच शिवत नाही. त्यामुळे मागील ५ वर्षे सरकारच्या विरोधात विधीमंडळात लढत होतो, असं सांगतानाच नारायण राणे यांची भाजपच्या वरिष्ठ नेत्यात गणती होत नाही हे जाणून खेद झाला. भाजपच्या कुठल्या वरिष्ठ नेत्यांशी माझी कधी, कुठे चर्चा झाली याचा तपशील मला कळला तर माझ्या ज्ञानात भर पडेल.

संबंधित बातम्या:

कितीही प्रयत्न केले तरी बॉलिवूड वेगळं केलं जाणार नाही; सुप्रिया सुळेंचा इशारा

भाजपमध्ये जाण्यासाठी कोणत्या नेत्याशी चर्चा केली ते जाहीर कराच; जयंत पाटलांचं राणेंना आव्हान

सरकार नसतं तर जयंत पाटील भाजपमध्ये असते, नारायण राणेंचा मोठा दावा

(supriya sule raction on on Narayan Rane’s statement)

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.