पवारांना नोटीस आली अन् चित्रं बदललं, आता शिवसेनेलाही नोटीस आलीय, ईडीचा पायगुण चांगला; येऊ द्या नोटीसा: सुप्रिया सुळे

शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांना ईडीकडून आलेल्या नोटीशीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. (supriya sule reaction on ed notice to shivsena mla)

पवारांना नोटीस आली अन् चित्रं बदललं, आता शिवसेनेलाही नोटीस आलीय, ईडीचा पायगुण चांगला; येऊ द्या नोटीसा: सुप्रिया सुळे
Follow us
| Updated on: Nov 28, 2020 | 5:19 PM

पुणे: शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांना ईडीकडून आलेल्या नोटीशीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. आधी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांना ईडीची नोटीस आली. त्यानंतर राज्यातील चित्रं पालटलं. आता शिवसेनेनेला नोटीस आलीय. त्यांच्याकडे आधीच मुख्यमंत्रीपद आहे. बहुतेक शिवसेनेला मोठं काही तरी मिळणार असं दिसतंय. ईडीचा पायगुण चांगला आहे. येऊ द्या नोटीसा, असा उपरोधिक टोला सुप्रिया सुळे यांनी भाजपला लगावला. (supriya sule reaction on ed notice to shivsena mla)

पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी सुप्रिया सुळे या मावळमध्ये आल्या होत्या. यावेळी त्यांनी ईडीच्या चौकशीवरून भाजपला धारेवर धरले. शरद पवारांना या आधी ईडीने नोटीस पाठवली होती. त्यानंतर राज्यात सत्तांतर झालं. आता सेनेकडे ईडीची नोटीस आली आहे. आधीच त्यांना मुख्यमंत्रीपद मिळालंय. आता शिवसेनेला आणखी काही मोठं मिळणार असं दिसतंय. ईडीचा पायगुण चांगला आहे. येऊ द्या नोटीसा. सगळं चांगलं घडेल, असं त्या म्हणाल्या. यावेळी त्यांनी पवारांच्या पावसातील सभेचाही आवर्जुन उल्लेख केला.

आज राज्यातील महाविकास आघाडी सरकारला एक वर्ष पूर्ण झालं आहे. आमचं सरकार आल्यावर अनेक दावे केले गेले. भविष्यवाणी वर्तवली गेली. सुरुवातीला सांगितलं हे सरकार सात दिवस टिकेल. त्यानंतर सात महिने टिकेल असं सांगितलं गेलं. आता तर एक वर्ष झालं आहे. आता पुढची पाच वर्षेच काय 25 वर्षेही कधी उलटून जातील, हे कळणारही नाही, असं त्या म्हणाल्या.

लस पुणेकर शोधत आहेत, नंतर क्लेम करू नका

एक लाख कोटींच्यावर गप्पा मारणारे आज पुण्यात आहेत. ‘दुनिया घुम लो, हमारे पुणे के आगे कुछ नहीं’, असा पंतप्रधान मोदींना चिमटा काढतानाच शेवटी पुण्यातच लस तयार होतेय. ही लस पुणेकरांनी शोधलीये, नाहीतर कोणीतरी म्हणायचं मीच (स्वतःबाबत) शोधली. पुण्यामध्येच ही लस तयार झालेली आहे. पुणेकरांनी ती लस शोधलेली आहे, त्यामुळे बाहेरून येऊन लसीवर कोणी क्लेम केलं तर गैरसमज नसावेत, असा टोलाही त्यांनी लगावला. (supriya sule reaction on ed notice to shivsena mla)

संबंधित बातम्या:

वर्षभरातील सरकारची कामगिरी शोभणारी नाही, जनता ठाकरे सरकारला नापास ठरवेल : रामदास आठवले

‘मोठा भाऊ पाहून कुंभकर्णानेही आत्महत्या केली असती, मुनगंटीवारांचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा

‘दिवाळीच्या मुहूर्तावर सरकारच्या डोक्यातील अंधार दूर झाला’, सुधीर मुनगंटीवार यांचा राज्य सरकारला टोला

(supriya sule reaction on ed notice to shivsena mla)

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.