माझी तिसरी निवडणूक, पार्थबाबूची तर सुरुवात : सुप्रिया सुळे
दौंड (पुणे) : मावळमधून राष्ट्रवादीकडून अजित पवारांचे सुपुत्र पार्थ पवार निवडणुकीच्या रिंगणात उभे राहिल्याने, पुण्यातील राष्ट्रवादीची यंत्रण पार्थ पवार यांच्या प्रचारासाठी दिवस-रात्र काम करु लागली आहे. हाच धागा पकडत खासदार सुप्रिया सुळेंना पत्रकारांनी विचारले, मावळमुळे बारामतीकडे दुर्लक्ष होते आहे का, त्यावर उत्तर देताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, “बाबू, ही माझी तिसरी निवडणूक आहे. पार्थबाबूची तर सुरुवात […]
दौंड (पुणे) : मावळमधून राष्ट्रवादीकडून अजित पवारांचे सुपुत्र पार्थ पवार निवडणुकीच्या रिंगणात उभे राहिल्याने, पुण्यातील राष्ट्रवादीची यंत्रण पार्थ पवार यांच्या प्रचारासाठी दिवस-रात्र काम करु लागली आहे. हाच धागा पकडत खासदार सुप्रिया सुळेंना पत्रकारांनी विचारले, मावळमुळे बारामतीकडे दुर्लक्ष होते आहे का, त्यावर उत्तर देताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, “बाबू, ही माझी तिसरी निवडणूक आहे. पार्थबाबूची तर सुरुवात आहे.”
मावळच्या तुलनेत बारामतीच्या प्रचाराकडे दुर्लक्ष होतंय का, या प्रश्नावर सुप्रिया सुळे यांनी खास शैलीत उत्तर दिले. खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, “ही माझी फर्स्ट टाईम इलेक्शन नाहीय बाबू. जर तिसऱ्या वेळीही सर्व यंत्रणा बारामतीत दिली, तर मी निष्क्रिय ठरत नाही का? मी एफवायला आहे. पार्थबाबूची तर सुरुवात आहे. त्यामुळे सुरुवातीला सर्व तिकडे जाणार ना. तुमचा खासदार 24 तास काम करत आहे, त्यामुळे तुम्हाला नाही का वाटत की तुमचा खासदार स्वतःच्या पायावरती उभा रहावा?” अशा शब्दात खासदार सुप्रिया सुळे यांनी खास शैलीत उत्तर दिले.
बारामती लोकसभा मतदारसंघाअंतर्गत येणाऱ्या दौंड तालुक्यातील केडगावमध्ये खासदार सुप्रिया सुळे यांनी पदयात्रा काढला. ढोलताशाच्या गजरात सुप्रिया सुळेंसह कार्यकर्त्यांची पदयात्रा मुख्य बाजारपेठेतून निघाली. व्यापारी आणि नागरिकांच्या भेटीगाठी सुप्रिया सुळे यांनी घेतल्या.
कांचन कुल यांच्याबद्दल सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?
“कांचन कुल यांची उमेदवारी हा भावनिक विषय नाही. निवडणुक लढणं हे जबाबदारीचं काम आहे. 22 लाख लोकांचं प्रतिनिधित्व करणं हे महत्वाचं काम आहे.”, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.
पाहा व्हिडीओ :