स्पेशल रिपोर्ट : मतदानावेळी सुप्रियाताई अजितदादांच्या घरी का आल्या?

मतदान सुरु असताना चक्क सुप्रिया सुळे अजित पवारांच्या काटेवाडीच्या घरी आल्या. बारामतीत सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशी लढत असतानाच सुप्रिया सुळे अजित दादांच्या घरी अचानक का आल्या? असा प्रश्न उपस्थित झाला.

स्पेशल रिपोर्ट : मतदानावेळी सुप्रियाताई अजितदादांच्या घरी का आल्या?
सुप्रिया सुळे, अजित पवार आणि शरद पवार यांचा फोटोImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: May 07, 2024 | 9:10 PM

बारामतीत मतदान सुरु असतानाच, खासदार सुप्रिया सुळे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या काटेवाडीतल्या निवासस्थानी आल्या. त्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावणं स्वाभाविक आहे. मात्र आपण अजित पवारांच्या भेटीसाठी नाही. तर अजित पवारांच्या आई आशा काकूंच्या भेटीसाठी आल्याचं सुप्रिया सुळे म्हणाल्या. ज्यावेळी, सुप्रिया सुळे घरी आल्या त्यावेळी अजित पवारही घरीच होते. मात्र आपली अजित पवारांशी भेट झालेली नाही. तसेच आशा काकींचे आशीर्वाद घेण्यासाठी आल्याचं सुप्रिया सुळेंनी सांगितलं. तर अजित पवारांनीही अधिक न बोलताना आपल्याला माहिती नाही. तसंच मी घरी नव्हतोच, अशी प्रतिक्रिया दिली. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही सुप्रिया सुळेंची भावनिक स्टॅटर्जी आहे, अशी टीका केली.

विशेष म्हणजे या भेटीआधी अजित पवारांनी काटेवाडीतच मतदान केलं आणि मतदानासाठी पत्नी सुनेत्रा पवार, मुलगा पार्थ पवारसह आई आशा पवारही उपस्थित होत्या. आईचा हात पकडून अजित पवारांनी मतदान केंद्रापर्यंत आणलं. आणि मतदानानंतर, अजित पवारांनी दिवार सिनेमाचा डायलॉग मारला, “मेरे साथ मेरी मां है.”

अजित पवार आणि श्रीनिवास पवार यांच्यात जुगलबंदी

भाजपसोबत गेल्यापासून अजित दादांची डायलॉगबाजी सुरु असल्याचं अजित पवारांचे सख्खे भाऊ श्रीनिवास पवार म्हणाले. त्यातच दोन्ही भावांमध्ये मिशीच्या वक्तव्यावरुनही जुगलबंदी रंगलीय. मतदानानंतर हे भेटायला आले ना तर मिशी काढून देतो, असं अजित पवार म्हणाले.त्यावर अजित पवारांना मिशी काढायची का एवढी घाई झाली? असं श्रीनिवास पवार म्हणाले. तूच वस्तरा घेवून ये आणि तूच काढ, असं अजित पवार म्हणाले. तसेच श्रीनिवास पवारांनी मिशी काढली म्हणून माझी वाट बघतोय, असंही अजित पवार म्हणाले.

बारामतीच्या निवडणुकीत प्रचारात अजित पवार एकटे पडल्याचं चित्र होतं. सुनेत्रा पवारांनाच, सुप्रिया सुळेंच्या विरोधात उभं केल्यानं दादांच्या सख्ख्या भावांनीही साथ दिली नाही. श्रीनिवास पवारांनी सुप्रिया सुळेंचा प्रचार केला. आणि भावांमध्ये शाब्दिक चकमकही झाली. मात्र, आईला सोबत असल्याचं दाखवून मां मेरे साथ है असा संदेश अजित पवारांनी सुप्रिया सुळेंसह आपल्या भावांनाही दिलाय.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.