Sharad Pawar : अजितदादांचा पत्ता कट? राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदी पहिल्यांदाच महिला?; ‘या’ महिला नेत्याच्या नावावर होणार शिक्कामोर्तब

राष्ट्रवादीचे सुप्रीमो शरद पवार यांनी राष्ट्रीय अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे पवार यांचा उत्तराधिकारी कोण? असा सवाल केला जात आहे. पवारांचा उत्तराधिकारी म्हणून अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांची नावे चर्चेत आहेत.

Sharad Pawar : अजितदादांचा पत्ता कट? राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदी पहिल्यांदाच महिला?; 'या' महिला नेत्याच्या नावावर होणार शिक्कामोर्तब
sharad pawarImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: May 03, 2023 | 10:37 AM

मुंबई : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी राजीनामा दिल्यानंतर राष्ट्रवादीत खळबळ उडाली आहे. शरद पवार यांनी राजीनामा मागे घ्यावा म्हणून त्यांची मनधरणी सुरू आहे. मात्र, शरद पवार राजीनामा मागे घेणार नसल्याचं वृत्त आहे. त्यामुळे आता राष्ट्रवादीत नव्या राष्ट्रीय अध्यक्षाचा शोध सुरू झाला आहे. राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी अजित पवार यांची वर्णी लागण्याची शक्यता वर्तवली जात होती. पण ही शक्यता मावळली आहे. अजित पवार यांना पक्षाचं राष्ट्रीय अध्यक्षपद मिळणार नसल्याचं सूत्रांनी सांगितलं. अजितदादांऐवजी महिला नेत्याकडे राष्ट्रवादीचे अध्यक्षपद जाणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं.

शरद पवार यांनी राष्ट्रीय अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांचा उत्तराधिकारी कोण? असा सवाल केला जात आहे. या स्पर्धेत अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांचं नाव आहे. अजित पवार हेच पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष होतील असंही सांगितलं जात आहे. मात्र, अजित पवार यांच्या नावाला पक्षातील एका गटाचा तीव्र विरोध असल्याचं सांगितलं जात आहे. अजितदादा यांचा फटकळ स्वभाव आणि त्यांच्या तडकाफडकी भूमिका यामुळे पक्षाला भविष्यात नुकसान होऊ शकतं असंही सांगितलं जात आहे. त्यामुळे अजित पवार यांच्या नावाला पक्षातून नापसंती असल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे.

हे सुद्धा वाचा

सुप्रिया सुळे नव्या अध्यक्ष

अजित पवार ऐवजी सुप्रिया सुळे यांच्याकडे अध्यक्षपद जाण्याची शक्यता अधिक आहे. सुप्रिया सुळे या आज कर्नाटकातील निपाणी येथे प्रचाराला जात आहे. सुप्रिया सुळे कर्नाटकात प्रचाराला जात असल्याने त्यांच्याकडे पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसे झाल्यास राष्ट्रवादीला पहिल्यांदाच महिला अध्यक्ष मिळणार आहे. याशिवाय राज्यातील राजकीय पक्षाची पहिली महिला अध्यक्ष होण्याचा मानही सुप्रिया सुळे यांना जाणार आहे.

जमेच्या बाजू

सुप्रिया सुळे या शांत स्वभावाच्या आहेत. मीडियासमोर कसं बोलायचं आणि किती बोलायचं याचं अचूक ज्ञान त्यांना आहे. शरद पवार यांच्याप्रमाणेच त्या मीडियाशी पाहिजे तेवढंच बोलतात. वादग्रस्त विषयावर त्या पटकन रिअॅक्ट होत नाहीत. या शिवाय सुप्रिया सुळे या संपूर्ण देशात ओळखल्या जातात. त्यांनी संसंदेत आपला प्रभाव पाडलेला आहे. दिल्ली दरबारी त्यांचं वजन आहे. देशपातळीवर पक्षाचा प्रचार करण्यासाठी त्याच जात असतात.

प्रशासन आणि सत्ताकारणाची त्यांना उत्तम समज आहे. त्या मनमिळावू स्वभावाच्या आहेत. शिवाय सर्वांना सोबत घेऊन जाण्याची त्यांची हातोटी आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता अधिक आहे. कर्नाटक निवडणुकीनंतर चित्र स्पष्ट होणार असल्याचं सांगितलं जात आहे.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.