Raj Thackeray : 1 तारखेला शस्त्रक्रिया, राज ठाकरेंनी कशाचं ऑपरेशन आहे ते सविस्तर सांगितलं

राज ठाकरे यांचा आयोध्या दौरा रद्द झाला त्यामागे त्यांच्या पायाचे दुखणे हे कारण असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत होता. अखेर आज राज ठाकरे यांनीच याबाबत खुलासा केला आहे.

Raj Thackeray : 1 तारखेला शस्त्रक्रिया, राज ठाकरेंनी कशाचं ऑपरेशन आहे ते सविस्तर सांगितलं
राज ठाकरे
Follow us
| Updated on: May 22, 2022 | 12:22 PM

पुणे : राज ठाकरे (Raj Thackeray) यांचा अयोध्या (ayodhya) दौरा रद्द झाला. अयोध्या दौरा रद्द होण्यामागे त्यांच्या पायाचे दुखणे हे कारण असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत होता. अखेर आज राज ठाकरे यांनी आपल्यावर नेमकी कोणती शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे याबाबत खुलासा केला आहे. ते आज पुण्यातमध्ये आयोजित सभेमध्ये बोलत होते. यावेळी बोलताना राज ठाकरे यांनी म्हटले की, मी जेव्हा मागे पुण्यात आलो होतो, तेव्हाच मला पायाच्या दुखण्याचा त्रास सुरू झाला होता. जेव्हा मी मुंबईत परतलो तेव्हा काही टेस्ट करण्यात आल्या त्यामध्ये मला हिप बोनची (Hip bone) शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला. एक जूनला शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. म्हणूनच मी मुद्दामहून तुम्हाला याबद्दल माहिती दिली. तुम्हाला न सांगताच शस्त्रक्रिया  करण्यासाठी गेलो तर पत्रकार काहीही सांगू शकतात. असे म्हणत त्यांनी यावेळी पत्रकारांना देखील टोला लगावला आहे.

राज  ठाकरेंचा पत्रकारांना टोला

यावेळी बोलताना राज ठाकरे यांनी पत्रकारांना देखील टोला लगावला आहे. मी जर तुम्हाला न सांगताच शस्त्रक्रिया करण्यासाठी निघून गेलो तर उद्या पत्रकार काहीही दाखवू शकतात. त्यामुळे मी आज मुद्दामहून तुम्हाला माहिती देण्यासाठी आलो आहोत. पत्रकार काय दाखवतील त्याला काही मर्यादा नाही. त्या दिवशी मी पुस्तक खरेदी करण्यासाठी गेलो तर पत्रकार तेही दाखवत होते. राज ठाकरे कधी गाडीत बसतात कुठे निघतात कुठे जातात,  हे सर्व पत्रकार दाखवत असतात. मला देखील त्याचा वैताग येतो. असो ते त्यांचे काम करतात असे देखील यावेळी राज ठाकरे यांनी म्हटले आहे.

हे सुद्धा वाचा

शरद पवारांवर निशाणा

दरम्यान सभेच्या सुरुवातीलाच राज ठाकरे यांनी शरद पवारांना टोला लगावला. राज ठाकरे यांनी सभेसाठी मैदानाची निवड न करता सभागृहाची निवड केल्याने अनेक तर्कवितर्क लढवले जात होते. यावर बोलताना राज ठाकरे यांनी शरद पवार यांना टोला लगावला. आज पावसाचे वातावरण आहे. पाऊस पडू शकतो त्यामुळे आज इथे सभा घेत आहे. सध्या निवडणूक पण नाही. मग उगच का पावसात भिजायचे असे म्हणते राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा शरद पवारांवर निशाणा साधला आहे.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.