AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sushant Singh Rajput Case | सुशांतच्या तपासादरम्यान छाती बडवणारे आता कुठे? अनिल परबांचा आठवले-कंगनावर निशाणा

मुंबई पोलिसांचा तपास योग्य पद्धतीने सुरू होता, यावर आता शिक्कामोर्तब झाले आहे’, अशी प्रतिक्रिया राज्य परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांनी दिली आहे.

Sushant Singh Rajput Case | सुशांतच्या तपासादरम्यान छाती बडवणारे आता कुठे? अनिल परबांचा आठवले-कंगनावर निशाणा
Follow us
| Updated on: Oct 04, 2020 | 2:34 PM

मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणावर एम्सच्या अहवालानंतर (AIIMS report) शिवसेनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. सुशांतचा मृत्यू हत्या नसून, आत्महत्याच असल्याचा दावा एम्सच्या पथकाने केला आहे. हा अहवाल आता सीबीआयकडे सुपूर्द करण्यात आला आहे. यावरून परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे. ‘सुशांत प्रकरणाच्या तपासा दरम्यान छाती बडवून घेणारे आता बोलणार का?’, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे (Sushant Singh Rajput Case Transport Minister Anil Parab Reaction after AIIMS report).

‘अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणाचा तपास आत्महत्या केली की हत्या? या प्रश्नभोवती फिरत होता. गेल्या तीन महिन्यापासून मुंबई पोलिस आणि नंतर सीबीआयनेही तपास सुरू केला होता. पण, आता AIIMS हॉस्पिटलच्या रिपोर्टमध्ये (report) या प्रश्नाचे उत्तर मिळाले आहे. मुंबई पोलिसांचा तपास योग्य पद्धतीने सुरू होता, यावर आता शिक्कामोर्तब झाले आहे’, अशी प्रतिक्रिया राज्य परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांनी दिली आहे.

‘सुशांत प्रकरणाचा तपास करताना ज्यांनी छाती बडवल्या, त्यांनी शिवसेना आणि ठाकरे कुटुंबांना टार्गेट करण्याचा प्रयत्न केला. पण, हे बोलणारे आता कुठे आहेत? रामदास आठवले कंगनावर बोलत होते, कात्रज प्रकरणी रामदास आठवले यांचे मौन का?’, असा प्रतिप्रश्न देखील परिवहन मंत्री अनिल परब यांनी केला आहे. (Sushant Singh Rajput Case Transport Minister Anil Parab Reaction after AIIMS report)

‘सुशांत प्रकरणात दिल्लीतील​ AIIMSच्या डॉक्टरांच्या टीमने सीबीआयकडे आपला अहवाल सुपूर्द केला आहे. AIIMSच्या डॉक्टरांनी सुशांत सिंह राजपूतची हत्या झाली असावी, या थेअरीला नकार दिला आहे. सुशांतची आत्महत्या असल्याचे स्पष्ट केली आहे. त्यामुळे सीबीआयच्या चार्जशीटनंतर शिवसेना पूर्णपणे भूमिका मांडेल,’ असे देखील अनिल परब (Anil Parab) यांनी म्हटले आहे.

हे तर मुंबईला बदनाम करण्याचे षड्यंत्र : महापौर किशोरी पेडणेकर

‘स्वतःच्या प्रसिद्धीसाठी इतरांना बदनाम करण्याचे काम सुशांत सिंह राजपूत प्रकरणात झाले आहे. मुंबई पोलिस, मनपा आणि मुंबईला बदनाम करण्याचे कारस्थान रचले गेले होते. मात्र, आता खोट्यांचे पितळ उघडे पडले आहे. व्हिसेरा अहवाल आणि शवविच्छेदन अहवाल (AIIMS Report) यामुळे आता लोकांचा मनपावरचा विश्वास वाढला आहे’, अशी प्रतिक्रिया महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली होती.

‘यंत्रणांनी काय समोर आणले ते पाहा. हे मुंबईला, आदित्य ठाकरेंना, शिवसेनेला बदनाम करण्याचे षड्यंत्र होते. आमचा यंत्रणांवर विश्वास आहे. मात्र, यंत्रणांचा चुकीचा वापर केला जातो आहे. आरोग्य सेवा, पोलिस सेवा आणि नेत्यांची बदनामी करणाऱ्यांबाबत मुख्यमंत्र्यांनी निर्णय घ्यावा. त्यांची चौकशी होणे गरजेचे आहे’, असे किशोरी पेडणेकर म्हणाल्या. आता प्रतिमा मलीन करणाऱ्यांचे हात खाली राहिले आहेत. मुंबईच्या जनतेने समाज माध्यमांतून त्यांना चागले उत्तर दिले आहे, असे म्हणत त्यांनी विरोधकांना टोला लगावला होता.

(Sushant Singh Rajput Case Transport Minister Anil Parab Reaction after AIIMS report)

संबंधित बातम्या : 

Sushant Singh Rajput | सुशांतची हत्या नव्हे आत्महत्याच!, एम्सच्या विशेष पथकाचा दावा 

Sushant Singh case | ‘एम्स’च्या रिपोर्टने महाराष्ट्राच्या बदनामीचा कट उधळला, शिवसेनेचा आक्रमक पवित्रा

Sushant Singh Rajput Case | सुशांतचा सीबीआय अहवाल लवकरात लवकर यावा; जनतेला सत्य समजलंच पाहिजे : अनिल देशमुख

पाकिस्तान बॅकफूटवर, 5 वाजेपासून युद्धविराम, दोन्ही देशांकडून सहमती अन
पाकिस्तान बॅकफूटवर, 5 वाजेपासून युद्धविराम, दोन्ही देशांकडून सहमती अन.
भारत-पाक तणावादरम्यान मुंबईकरांसाठी मोठी बातमी, आता 9 जूनपर्यंत....
भारत-पाक तणावादरम्यान मुंबईकरांसाठी मोठी बातमी, आता 9 जूनपर्यंत.....
मोदी सरकारचा दहशतवादाविरुद्ध मोठा निर्णय, यापुढे तसं कृत्य युद्ध ठरेल
मोदी सरकारचा दहशतवादाविरुद्ध मोठा निर्णय, यापुढे तसं कृत्य युद्ध ठरेल.
भारतीय लष्कराकडून सैन्याच्या शौर्याचा व्हिडीओ शेअर, एकदा बघाच...
भारतीय लष्कराकडून सैन्याच्या शौर्याचा व्हिडीओ शेअर, एकदा बघाच....
VIDEO: पाकच्या रहिम यार खान एअरबेसचा चक्काचूर अन् धावपट्टीही उद्ध्वस्त
VIDEO: पाकच्या रहिम यार खान एअरबेसचा चक्काचूर अन् धावपट्टीही उद्ध्वस्त.
चिनाब नदीवरील सलाल धरणातून पाणी सोडलं, पाकिस्तानात पूर येणार?
चिनाब नदीवरील सलाल धरणातून पाणी सोडलं, पाकिस्तानात पूर येणार?.
पाकिस्तानचा कांगावा, 'तो' दावा खोटा, भारतीय लष्कराने दिला पुरावा
पाकिस्तानचा कांगावा, 'तो' दावा खोटा, भारतीय लष्कराने दिला पुरावा.
ऑपरेशन 'सिंदूर'मध्ये टॉप 5 कमांडरचा खात्मा, पाकिस्तानातून थेट नाव समोर
ऑपरेशन 'सिंदूर'मध्ये टॉप 5 कमांडरचा खात्मा, पाकिस्तानातून थेट नाव समोर.
VIDEO पाकला मोठा हादरा, भारतानं असं उडवलं रावळपिंडीतलं नूर खान एअरबेस
VIDEO पाकला मोठा हादरा, भारतानं असं उडवलं रावळपिंडीतलं नूर खान एअरबेस.
भारताचा मोठा स्ट्राईक, पाकचे 5 एअरबेस उडवले; पाकसाठी किती महत्त्वाचे?
भारताचा मोठा स्ट्राईक, पाकचे 5 एअरबेस उडवले; पाकसाठी किती महत्त्वाचे?.