प्रणिती शिंदेंना भाजपकडून अनेकवेळा ऑफर, सुशीलकुमार शिंदेंचा गौप्यस्फोट
सोलापूर : काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांना भाजपकडून अनेकदा ऑफर होती, असा गौप्यस्फोट काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी केला आहे. मात्र, जीव जाईपर्यंत प्रणिती काँग्रेसमध्येच राहील, असा विश्वासही सुशीलकुमार शिंदेंनी केला. काँगेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या मुलांच्या भाजप प्रवेशाच्या राजकारणाने सध्या राज्यात चर्चाना उधाण आलेले असताना, आता काँग्रेस आमदार प्रणिती शिंदेंना […]
सोलापूर : काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांना भाजपकडून अनेकदा ऑफर होती, असा गौप्यस्फोट काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी केला आहे. मात्र, जीव जाईपर्यंत प्रणिती काँग्रेसमध्येच राहील, असा विश्वासही सुशीलकुमार शिंदेंनी केला.
काँगेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या मुलांच्या भाजप प्रवेशाच्या राजकारणाने सध्या राज्यात चर्चाना उधाण आलेले असताना, आता काँग्रेस आमदार प्रणिती शिंदेंना सुद्धा भाजपने कितीतरी वेळा भाजपने ऑफर दिली होती, असा गौप्यस्फोट काँग्रेसचे वरिष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी केला. भाजपने प्रणिती शिंदेला ऑफर दिली होती, मात्र प्रणिती शिंदे जीव जाईपर्यंत काँग्रेस मध्येच राहील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
आमच्या रक्तातच काँग्रेस असून, जियेंगे या मरेंगे वो काँग्रेस के साथही, असेही काँग्रेसचे वरिष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी म्हटले.
गेल्या काही दिवसात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. भाजपने ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर आघाडीला सर्वात मोठा धक्का दिला, तो विरोधी पक्षनेत्याच्या घराला खिंडार पाडूनच. काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे सुपुत्र सुजय विखे पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर, माढ्याचे राष्ट्रवादीचे खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांचे सुपुत्र रणजितसिंह मोहिते पाटील यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादीमधून नेत्यांची भाजपकडे ओढ असताना, सुशीलकुमार शिंदे यांनी केलेल्या गौप्यस्फोटाला महत्त्व प्राप्त झालं आहे.