चिमणराव, म्हातारपणात तुम्ही गद्दारीचा डाग का लावून घेतला?; सुषमा अंधारे यांचा बंडखोर आमदाराला सवाल

गुलाब भाऊ, हमने तुमको दिलं दिया दिलदार समझकर, लेकीन तुमने ठुकरा दिया फूटबॉल सझकर, असा शेर सादर करत त्यांनी गुलाबरावांवर टीका केली.

चिमणराव, म्हातारपणात तुम्ही गद्दारीचा डाग का लावून घेतला?; सुषमा अंधारे यांचा बंडखोर आमदाराला सवाल
चिमणराव, म्हातारपणात तुम्ही गद्दारीचा डाग का लावून घेतला?; सुषमा अंधारे यांचा बंडखोर आमदाराला सवालImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Nov 03, 2022 | 10:19 AM

एरंडोल: शिंदे गटाचे नेते आणि पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील (gulabrao patil) आणि शिंदे गटाचेच आमदार चिमणराव पाटील यांच्यात जोरदार वाद सुरू आहे. राष्ट्रवादीच्या नेत्याला आपल्याच मतदारसंघात निधी दिल्याने चिमणराव पाटील (chimanrao patil) नाराज आहे. या वादाचे लोण थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यापर्यंत पोहोचलं. मात्र, तरीही दोघांमधील वाद काही थांबता थांबेना. हा वाद सुरू असतानाच आता ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी उडी घेतली आहे. चिमणराव, म्हातारपणात तुम्ही गद्दारीचा डाग का लावून घेतला?, असा सवालच सुषमा अंधारे (sushma andhare) यांनी चिमणराव यांना करून डिवचले आहे.

एरंडोल येथे सुषमा अंधारे यांची जाहीर सभा होती. यावेळी त्यांनी शिंदे गटाच्या दोन्ही आमदारांवर जोरदार हल्ला चढवला. उद्धव ठाकरे आजारी असताना एकनाथ शिंदेंनी भाजपला 40 जणांची कुंडली पुरवली. पण आमदार चिमणराव पाटील यांना का पळपुटेपणा करावा लागला? असा सवाल सुषमा अंधारे यानी केला.

हे सुद्धा वाचा

चिमणराव पाटील मला माझ्या आजोबासारखे आहेत. मात्र, गुवाहाटीत चिमणराव पाटील यांचं चिरतारुण्य दिसलं. चिमणराव, म्हातारपणात तुम्ही गद्दारीचा डाग लावून का लावून घेतला?; असा सवाल सुषमा अंधारे यांनी केला.

चिमणराव पाटील तुम्हाला लोक म्हणतील कसं काय पाटील बरं आहे का? गुवाहाटीला गेले ते खरं आहे का?, असा चिमटाही त्यांनी काढला. एकनाथ शिंदे यांच्या बाबत मला काहीही तक्रार नाही. कारण सरकारमध्ये त्यांचं काहीच चालत नाही, असा टोला त्यांनी लगावला.

यावेळी त्यांनी गुलाबराव पाटील यांच्यावर शेरोशायरीतून हल्ला चढवला. गुलाब भाऊ, हमने तुमको दिलं दिया दिलदार समझकर, लेकीन तुमने ठुकरा दिया फूटबॉल सझकर, असा शेर सादर करत त्यांनी गुलाबरावांवर टीका केली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पंतप्रधान नरेंद्र मोदींपेक्षा भारी आहेत. ते घटनास्थळी पोहाचण्याआधीच त्यांचा कॅमेरामन पोहोचतो. मुख्यमंत्री निवडला की मॉडेल निवडले?, अशी टीका त्यांनी केली.

भाजपने बीएसएनएल बंद पाडला. कारण अंबानींचा जीओ यांना आणायचा होता. सर्फिंग को डाटा, मात्र खाने को आटा नही अशी देशवासियांची अवस्था झाली आहे, अशा शब्दात त्यांनी केंद्र सरकारवर टीका केली. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मिमिक्रीही केली.

नरेंद्र मोदींनी हर घर तिरंगा उपक्रम राबवला. मात्र त्यांचे टेंडर गुजरातमध्ये दिलं आणि आम्हाला तिरंगा विकत घ्यायला लावला. आम्हाला झेंडा लावायचा आहे. पण घर कुठे आहे?, असा हल्लाबोलही त्यांनी केला.

पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोडी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोडी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.