तिसरा सर्जिकल स्ट्राईक मतदार करतील : सुषमा स्वराज
मुंबई : तिसरा सर्जिकल स्ट्राईक देशातील मतदार करतील आणि पुन्हा एकदा नरेंद्र मोदींच्या नेतृत्त्वातील सरकार देतील, असा विश्वास भाजपच्या जेष्ठ नेत्या आणि परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी व्यक्त केला. तसेच, नरेंद्र मोदी यांच्या हातात भारत सुरक्षित आहे, असेही सुषमा स्वराज म्हणाल्या. मुंबईत भाजपच्या महिला मेळाव्यात परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी उपस्थिती लावली. त्यावेळी त्यांनी उपस्थितांशी […]
मुंबई : तिसरा सर्जिकल स्ट्राईक देशातील मतदार करतील आणि पुन्हा एकदा नरेंद्र मोदींच्या नेतृत्त्वातील सरकार देतील, असा विश्वास भाजपच्या जेष्ठ नेत्या आणि परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी व्यक्त केला. तसेच, नरेंद्र मोदी यांच्या हातात भारत सुरक्षित आहे, असेही सुषमा स्वराज म्हणाल्या. मुंबईत भाजपच्या महिला मेळाव्यात परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी उपस्थिती लावली. त्यावेळी त्यांनी उपस्थितांशी संवाद साधला.
आचारसंहितेच्या आधिची माझी शेवटची सभा आहे, असे सांगत परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी आपल्या भाषणाला सुरुवात केली. पुढे त्या म्हणाल्या, “तिसरा सर्जिकल स्ट्राईक देशातील मतदार करतील आणि पुन्हा एकदा नरेंद्र मोदींच्या नेतृत्त्वातील सरकार देतील. कारण नरेंद्र मोदी यांच्या हातात भारत सुरक्षित आहे.”
काँग्रेसवर टीका
परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी यावेळी काँग्रेसवर जोरदार टीका केली. “तुम्ही एवढ्या दिवसात का नाही काम केली? सोन्याच्या चमचाने खाणाऱ्यांच्या घरात जन्माला आलेल्यांना समस्या काय कळणार?” असा प्रश्न विचारत सुषमा स्वराज यांनी अप्रत्यक्षरित्या राहुल गांधींवर निशाणा साधला.
योजनांचा पाढा वाचला!
“आम्ही 26 आठवड्यांची सुट्टी बाळांतीण झालेल्या महिलांना देतो. पण सगळ्यात प्रगत देशातसुद्धा फक्त 6 आठवड्यांची सुट्टी दिली जाते. 70 टक्क्यापेक्षा जास्त मुद्रा लोन महिलांना दिला. रोजगार शोधणारी महिला रोजगार द्यायला लागली आहे. ते फक्त मुद्रा लोनमुळे शक्य झालं.” असे सांगत सुषमा स्वराज यांनी केंद्र सरकारच्या महिलांसाठीच्या योजनांचा पाढा वाचला.
VIDEO : परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांचं भाषण