सुषमा स्वराज यांची कन्या बांसुरी स्वराज यांना भाजपकडून मोठी जबाबदारी, राजकारणात एन्ट्री

दिवंगत नेत्या आणि माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांची मुलगी बांसुरी स्वराज यांना भाजपने नवीन जबाबदारी दिली आहे. त्यामुळे त्यांची दिल्लीच्या राजकारणात एन्ट्री झाली आहे.

सुषमा स्वराज यांची कन्या बांसुरी स्वराज यांना भाजपकडून मोठी जबाबदारी, राजकारणात एन्ट्री
Follow us
| Updated on: Mar 28, 2023 | 9:18 PM

नवी दिल्ली : भारतीय राजकारणातील एक मोठं नाव माजी परराष्ट्र मंत्री आणि दिल्लीच्या मुख्यमंत्री राहिलेल्या दिवंगत भाजप नेत्या सुषमा स्वराज ( Sushma Swaraj ) यांच्या कन्या बांसुरी स्वराज ( Bansuri Swaraj ) यांना दिल्लीत भाजपकडून ( Delhi BJP ) महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली आहे. सुषमा स्वराज यांची कन्या बांसुरी स्वराज यांनी यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजप पक्षश्रेष्ठींचे आभार मानले आहेत. बांसुरी स्वराज यांच्यावर सोपवण्यात आलेल्या जबाबदारीबाबत सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया पुढे येत आहेत.

बांसुरी स्वराज यांना भाजपच्या कायदेशीर सेलचे सहसंयोजक म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. दिल्लीचे कार्याध्यक्ष वीरेंद्र सचदेवा म्हणाले की, बांसुरी स्वराज यांची नियुक्ती तात्काळ लागू होईल आणि भाजपला बळकट करेल अशी अपेक्षा आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून नियुक्ती पत्राचा फोटो शेअर करत बांसुरी स्वराज यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा, भाजपचे सरचिटणीस बीएल संतोष, भाजप प्रदेशाध्यक्ष वीरेंद्र सचदेवा आणि भाजप दिल्ली यांचे आभार मानले आहेत.

सुषमा स्वराज यांनी आपल्या राजकीय कारकीर्दीत अनेक महत्वाच्या पदांवर काम केले आहे. मोदी सरकारमध्ये देखील त्यांना मोठी जबाबदारी मिळाली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना परराष्ट्र मंत्री केल्यानंतर त्यांनी या पदावर असताना सर्वसामान्यांना न्याय देण्याता पूरेपूर प्रयत्न केला. अडचणीत असलेल्या लोकांना तात्काळ मदत करणाऱ्या मंत्र्यांमध्ये त्या आघाडीवर होत्या. लोकं फक्त एक ट्विट करायचे आहे सुषमा स्वराज तात्काळ त्यावर अॅक्शन घेत असत.

प्रकृती अस्वस्थ असल्याने मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळात त्यांना मंत्रीपद घेतलं नव्हतं. पण तरी देखील त्या पक्षात अॅक्टीव्ह होत्या. सुषमा स्वराज या त्यांच्या प्रभावी भाषणामुळे ओळखल्या जात असतं. त्यांनी आपल्या भाषणातून अनेकवेळा विरोधकांना सडेतोड उत्तर दिले आहे. त्यांच्या भाषणाची चर्चा नेहमीच देशभरात व्हायची.

सुषमा स्वराज यांच्या मुलीला आता भाजपकडून जबाबदारी देण्यात आल्याने सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. कोणी याला घराणेशाही म्हणत आहे. कोणी त्यांना आपल्या आईप्रमाणेच काम करण्यासाठी सल्ला देत आहे. कोणी या निर्णयाचं स्वागत करत आहे. तर काही लोकं यावर टीका देखील करत आहेत. सुषमा स्वराज यांची जागा भरुन काढणं शक्य नसलं तरी त्यांच्या सारख्या नेत्यांची देशाला गरज असल्याचं अनेक जण म्हणत आहेत.

कोण आहे बांसुरी स्वराज?

बांसुरी स्वराज या सर्वोच्च न्यायालयात प्रॅक्टिस करतात. 2007 मध्ये त्या दिल्ली बार कौन्सिलमध्ये रुजू झाल्या. इंग्रजी साहित्यात बीए ऑनर्ससह पदवी घेतल्यानंतर, त्यांनी लंडनमधील बीपीपी लॉ स्कूलमध्ये कायद्याचे शिक्षण घेतले. त्यांनी ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या सेंट कॅथरीन कॉलेजमधून मास्टर्स केले आहे.

धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?.
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल.
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?.
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट.
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'.
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'.
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य.
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर.
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस.
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?.