पक्षातून हाकलून लावले त्यांना परत घेण्याचा प्रश्नच नाही; राजू शेट्टींचा खोत यांच्याशी हातमिळवणीस नकार
ज्यांचे हात आणि चारित्र्य स्वच्छ आहे. अशा लोकांसोबतच मी काम करतो, असं अशी टीका करतानाच ज्यांना पक्षातून हाकलून लावले त्यांना परत घेण्याचा प्रश्नच येत नाही, असं स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी सांगितलं. (swabhimani shetkari sanghatana chief raju shetti slams sadabhau khot)
कोल्हापूर: ज्यांचे हात आणि चारित्र्य स्वच्छ आहे. अशा लोकांसोबतच मी काम करतो, असं अशी टीका करतानाच ज्यांना पक्षातून हाकलून लावले त्यांना परत घेण्याचा प्रश्नच येत नाही, असं स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी सांगितलं. (swabhimani shetkari sanghatana chief raju shetti slams sadabhau khot)
‘टीव्ही 9 मराठी’शी बोलताना राजू शेट्टी यांनी ही टीका केली. ज्यांचे हात आणि चारित्र्य स्वच्छ आहेत. त्यांच्याबरोबरच मी काम करतो. ज्यांना पक्षातून हाकलून लावले त्यांना परत पक्षात घेण्याचा प्रश्नच येत नाही, असं सांगतानाच आपलं अस्तित्व टिकविण्यासाठी सदाभाऊ खोत यांचा प्रयत्न सुरू आहे. ज्या ठिकाणी आहेत, तिथे काही तरी पदरात पाडून घेण्याचा त्यांचा प्रयत्न आहे, असा टोला राजू शेट्टी यांनी लगावला. खोत यांना शेतकऱ्यांचा एवढाच कळवळा असेल तर त्यांनी ‘कडकनाथ’चे पैसे परत करावेत, असं आव्हानही त्यांनी दिलं.
शेट्टी यांनी दिलेल्या या तीव्र प्रतिक्रियेमुळे शेट्टी-खोत यांच्यातील दिलजमाईचे दरवाजे बंद झाल्याचं बोललं जात आहे. त्याआधी खोत यांनी शेट्टी यांच्यासोबत दिलजमाईचे संकेत दिले होते. राजकारणात कोणीच कोणाचा कायमचा शत्रू नसतो. आमची विचारधारा एकच आहे. केवळ काही मुद्द्यांवर आमचे मतभेद होते, असं खोत म्हणाले होते.
आमच्यातले वाद केवळ शेतकऱ्यांच्या काही मुद्द्यांवर झाले होते. आमच्यात काही बांधावरचं भांडण नाही. शेतकऱ्यांना न्याय मिळावा हीच दोघांचीही भूमिका आहे, असं खोत यांनी म्हटलं होतं. त्यामुळे पहिल्यांदाच खोत आणि शेट्टी एकत्र येणार असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली होती. दोन्ही संघटनांमधील कार्यकर्त्यांनी त्याबाबत सकारात्मक प्रतिक्रियाही दिली होती. मात्र, शेट्टी यांनी खोत यांना संघटनेचे दरवाजे बंद राहतील असं सांगून दिलजमाईला स्पष्ट नकार दिला आहे. त्यामुळे त्यावर खोत काय प्रतिक्रिया देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
VIDEO : दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी pic.twitter.com/hCPzbtUnJN
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 16, 2020
संबंधित बातम्या:
राष्ट्रवादी काँग्रेसकडून विधान परिषदेवर एकनाथ खडसे, राजू शेट्टी, आनंद शिंदे, यशपाल भिंगे यांची नाव जवळपास निश्चित
“कोणीही बाहुबलीने रस्त्यावर येऊन आंदोलन करुन दाखवावं”, राजू शेट्टींचा चक्काजाम आंदोलनात विरोधकांना इशारा
ऊस शेतकऱ्यांची फसवणूक झाली तर साखरेचा एक कणही कारखान्यातून बाहेर पडू देणार नाही; राजू शेट्टींचा इशारा
(swabhimani shetkari sanghatana chief raju shetti slams sadabhau khot)