‘स्वप्नील लोणकरच्या कुटुंबियांना मुख्यमंत्र्यांना भेटायला ‘सह्याद्री’वर जावं लागलं, संवेदना हरवलेलं सरकार’, भाजपची टीका

स्वप्नीलच्या कुटुंबियांना मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी सह्याद्री अतिथीगृहावर यावं लागलं, हे संवेदना हरवलेलं सरकार आहे, अशा शब्दात भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्र्यांवर जोरदार टीका केलीय.

'स्वप्नील लोणकरच्या कुटुंबियांना मुख्यमंत्र्यांना भेटायला 'सह्याद्री'वर जावं लागलं, संवेदना हरवलेलं सरकार', भाजपची टीका
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, भाजप आमदार अतुल भातखळकर
Follow us
| Updated on: Jul 16, 2021 | 7:27 PM

मुंबई : MPSC परीक्षा उत्तीर्ण होऊनही नोकरी मिळत नसल्यामुळे स्वप्नील लोणकर या तरुणारे आत्महत्या केली. त्यानंतर महाविकास आघाडी सरकारवर सर्व स्तरातून जोरदार हल्ला चढवण्यात आला. राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे स्वप्नीलने आत्महत्या केल्याचा आरोप त्याच्या वडिलांनी केली होती. त्यानंतर राज्य सरकारनं एमपीएससीच्या पदभरतीबाबत निर्णय घेण्यास सुरुवात केली आहे. या पार्श्वभूमीवर आज स्वप्नील लोणकरच्या कुटुंबियांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सह्याद्री अतिथीगृहावर भेट घेतली. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी स्वप्नीलचे आई-वडील आणि बहिणीचं सांत्वन केलं. दरम्यान, स्वप्नीलच्या कुटुंबियांना मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी सह्याद्री अतिथीगृहावर यावं लागलं, हे संवेदना हरवलेलं सरकार आहे, अशा शब्दात भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्र्यांवर जोरदार टीका केलीय. (Swapnil Lonakar’s family met CM Uddhav Thackeray in Mumbai)

‘अरेरे, दुर्दैवी स्वप्नील लोणकरच्या कुटुंबियांना अखेर मुख्यमंत्र्याना भेटायला सह्याद्री अतिथीगृहात जावं लागलं. ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांच्या निधनानंतर त्यांच्या घरी जाऊन सांत्वन केले तसे स्वप्नीलच्या घरी जाता आले नसते का? हे तर निबर कातडीचे सरकार, संवेदना हरवलेले सरकार’, असं ट्वीट करत अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र डागलं आहे.

‘आम्ही सगळे तुमच्या सोबत, काळजी करू नका’

आज स्वप्नीलच्या कुटुंबियांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी ‘आम्ही सगळे तुमच्या सोबतच आहोत. काळजी करू नका,’ अशा शब्दांत स्वप्नीलच्या कुटुबियांना धीर दिला. स्वप्नील लोणकरचे आई, वडील आणि बहिण यांनी आज सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी स्वप्नीलचे आई, वडीलांचे सांत्वनही केले. तसेच स्वप्नीलची बहिणीला करता येईल, ती सर्व मदत केली जाईल, असे आश्वस्तही केले. तिचे शिक्षण आणि पात्रतेनुसार तिला रोजगार संधी उपलब्ध करून देता येईल. यासाठी कार्यवाही करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.

मुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले?

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वनीलच्या आई छाया, वडील सुनील तसेच बहिण पूजा यांची आस्थेवाईक विचारपूसही केली. घटना दुर्देवी आहे. पण धीराने घ्यावे लागेल. आम्ही सगळे तुमच्या सोबतच आहोत. काळजी करू नका, असा धीर दिला. यावेळी सह्याद्री अतिथीगृहावर विधान परिषदेच्या उपाध्यक्ष डॉ. नीलमताई गोऱ्हे, उद्योग मंत्री सुभाष देसाई, पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील, राज्यमंत्री संजय बनसोडे, खासदार सर्वश्री अनिल देसाई, विनायक राऊत, शिवसेनेचे पुणे जिल्हा प्रमुख महेश पासलकर, सामाजिक कार्यकर्त्या कल्याणी वाघमोडे आदी उपस्थित होते.

स्वप्नीलने टोकाचं पाऊल का उचललं?

एमपीएससीच्या पूर्व आणि मुख्य परीक्षेत उत्तीर्ण झाल्यानंतरही 2 वर्षे मुलाखत झालीच नाही आणि स्वप्नील लोणकर हळूहळू नैराश्यात गेला. या काळात घरची परिस्थिती आणि परीक्षेनंतर नोकरी लागेल या आशेवर घेतलेलं कर्ज यांसारख्या कारणांमुळेही स्वप्नीलवरील तणाव वाढत गेला. त्याच्या संयमाचा कडेलोट झाला आणि त्याने अखेर आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचललं.

संबंधित बातम्या : 

स्वप्नील लोणकरच्या कुटुंबियांना शिवसेनेची 10 लाखाची मदत, स्वप्नीलच्या बहिणीच्या शिक्षणासाठीही मदत करणार- एकनाथ शिंदे

एमपीएससीची पदे भरणार, 15, 511 पदांची भरती लवकरच; दत्तात्रय भरणे यांची मोठी घोषणा

Swapnil Lonakar’s family met CM Uddhav Thackeray in Mumbai

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.