काँग्रेसला जबर धक्का, सुजय विखेंचा भाजपमध्ये प्रवेश

मुंबई : काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे सुपुत्र सुजय विखे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, नगरचे पालकमंत्री राम शिंदे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, मंत्री सदाभाऊ खोत यांच्यासह दिग्गज भाजप नेत्यांच्या उपस्थितीत सुजय विखेंचा भाजपमध्ये […]

काँग्रेसला जबर धक्का, सुजय विखेंचा भाजपमध्ये प्रवेश
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:17 PM

मुंबई : काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे सुपुत्र सुजय विखे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, नगरचे पालकमंत्री राम शिंदे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, मंत्री सदाभाऊ खोत यांच्यासह दिग्गज भाजप नेत्यांच्या उपस्थितीत सुजय विखेंचा भाजपमध्ये प्रवेश झाला. यावेळी सुजय विखेंच्या पत्नी धनश्री विखे पाटीलही हजर होत्या.

मुंबईतील वानखेडे स्टेडियममधील गरवारे क्लबमध्ये सुजय विखे पाटलांच्या प्रवेशाचा सोहळा पार पडला. ‘एकच वादा, सुजय दादा’ अशा घोषणा देत गरवारे क्लब सुजय विखेंच्या कार्यकर्त्यांनी दणाणून सोडला. नगरमधून मोठ्या संख्येत सुजय विखेंचे समर्थक या सोहळ्यासाठी मुंबईत आले होते.

“मुख्यमंत्र्यांनी मला प्रचंड आदर दिला, वडिलांच्या निर्णयाविरुद्ध जाऊन मी भाजप प्रवेश केला. नगरमध्ये भाजप वाढवण्यासाठी मनापासून प्रयत्न करेन. नगरमधील जागा युतीच्या असतील” असे यावेळी सुजय विखे म्हणाले.

LIVE UDPATE :

  • नगरमधील दोन्ही खासदार युतीचे असतील, असा शब्द देतो – सुजय विखे पाटील
  • माझ्या वडिलांच्या विरुद्ध निर्णय घ्यावा लागलाय, त्यामुळे माझ्यावर मोठी जबाबदारी आहे – सुजय विखे पाटील
  • मोदींच्या प्रभावातून मी आणि माझ्या कार्यकर्त्यांनी भाजप प्रवेशाचा निर्णय घेतला – सुजय विखे पाटील
  • मोदी साहेब, शाह साहेब आणि फडणवीस साहेब यांचे आभार, कारण त्यांनी मला कार्यकर्ता म्हणून संधी दिली – सुजय विखे पाटील
  • भाजपकडून विरोधी पक्षनेत्याच्या घराला खिंडार, सुजय विखे अखेर भाजपच्या गोटात सामिल
  • काँग्रेसला जबर धक्का, विरोधी पक्षनेत्याची घरात खिंडार, सुजय विखेंचा भाजपमध्ये प्रवेश
  • ‘एकच वादा, सुजय दादा’…. गरवारे क्लब दुमदुमला

  • सुजय विखे पाटील भाजपच्या व्यासपीठावर, काही क्षणात भाजपमध्ये अधिकृत प्रवेश

  • मुख्यमंत्री फडणवीस, दानवे पोहोचले, सुजय विखेंचा भाजप प्रवेश थोड्याच वेळात
  • एकच वादा, सुजय दादा, गरवारे क्लबमध्ये सुजय विखेंच्या कार्यकर्त्यांची घोषणाबाजी
  • मुख्यमंत्री फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष दानवे, गिरीश महाजन यांच्यासह भाजप नेते गरवारे क्लबमध्ये पोहोचले
  • मुख्यमंत्र्यांचा ताफा गरवारे क्लबमध्ये पोहोचला
  • वानखेडे स्टेडियममधील गरवारे क्लबमध्ये सुजय यांचा भाजप प्रवेश होणार, तयारी पूर्ण
  • सुजय विखे यांच्या पत्नी धनश्री विखे पाटील वानखेडे स्टेडियमवर दाखल

राधाकृष्ण विखे पाटील राजीनामा देणार? 

महाराष्ट्र काँग्रेसमध्ये लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मोठा राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे. विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील पदाचा राजीनामा देणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. विखे पाटलांचे चिरंजीव सुजय विखे उद्या भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यापूर्वी विखे पाटील पदाचा राजीनामा देणार असल्याचं बोललं जातंय. मुलगा भाजपमध्ये प्रवेश करत असल्यामुळे नैतिकतेचा प्रश्न म्हणूम राजीनामा देणार असल्याची माहिती आहे.

विखे पाटलांची खंत 

मुलाच्या जागेसाठी एवढा संघर्ष करावा लागतोय, काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांची खंत व्यक्त केली. पक्षातील विरोधकांचा दिल्लीत हायकमांडसमोर विखेंनी पाढा वाचला.

तसेच, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनीही सुजय विखेंच्या भाजप प्रवेशाच्या शक्यतेची दखल घेतली. राहुल गांधी यांनी थेट राषट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी फोनवरुन बातचीत केली. त्यामुळे शरद पवार आणि राष्ट्रवादीची दक्षिण नगरच्या जागेबाबत काय भूमिका असेल, हे लवकरच स्पष्ट होईल.

सुजय विखेंचा भाजप प्रवेश निश्चित

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे चिरंजीव सुजय विखे यांचा भाजप प्रवेश निश्चित झालाय. अहमदनगरच्या राजकारणात या निमित्ताने मोठी घडामोड होणार आहे. डॉ. सुजय विखे हे आज दुपारी 12 वाजता मुंबईतील भाजप प्रदेश कार्यालयात भाजपात प्रवेश करतील, अशी सूत्रांची माहिती आहे. त्यामुळे आता भाजपचे विद्यमान खासदार दिलीप गांधी यांचा पत्ता कट होणार यात काही शंका नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर गांधी समर्थकांनी शक्ती प्रदर्शन केलं, मात्र आता वेळ निघून गेल्याने कोणताही उपयोग नाही.

भाजप प्रवेशाअगोदर 11 वाजता मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी वर्षा बंगल्यात सुजय विखे आणि त्यांचे कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर ठीक 12 वाजता भाजपच्या प्रदेश कार्यालयात स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित सुजय विखे पाटील भाजपात प्रवेश करणार असल्याचं सूत्रांनी सांगितलंय. तसेच नगरच्या काही निवडक कार्यकर्त्यांना आज रात्री मुंबईत येण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे विखेंकडून मुंबईत शक्तीप्रदर्शन केलं जाण्याचीही शक्यता आहे.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.