हेल्मेटसक्तीला विरोध करणाऱ्या विवेक वेलणकरांवर कारवाई करा : रावते
मुंबई : पुणे सजग नागरिक मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी दिले आहेत. विवेक वेलणकर यांनी हेल्मेटसक्तीला विरोधक केला होता. नागरिकांच्या सुरक्षेसाठी असलेल्या निर्णयाला विरोध केल्याने दिवाकर रावते यांनी थेट विवेक वेलणकरांवरच कारवाईच बडगा उचलला आहे. गेल्या वेळी पुण्यात पोलीस आयुक्तांनी हेल्मेटबाबत कायदेशीर अंमलबजावणीसाठी आवाहन केलं होतं. […]
मुंबई : पुणे सजग नागरिक मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी दिले आहेत. विवेक वेलणकर यांनी हेल्मेटसक्तीला विरोधक केला होता. नागरिकांच्या सुरक्षेसाठी असलेल्या निर्णयाला विरोध केल्याने दिवाकर रावते यांनी थेट विवेक वेलणकरांवरच कारवाईच बडगा उचलला आहे.
गेल्या वेळी पुण्यात पोलीस आयुक्तांनी हेल्मेटबाबत कायदेशीर अंमलबजावणीसाठी आवाहन केलं होतं. पुणेकरांनी हेल्मेट का घालावा हा वाद घातला गेला. लोकांचा जीव वाचावा, हा मूळ हेतू आहे, असेही दिवाकर रावते म्हणाले. तसेच, हेल्मेटसक्ती हा केंद्राचा कायदा आहे, कायद्याच्या अंमलबजावणीचे केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी सर्व राज्यांना आदेश दिलेत, असेही रावतेंनी यावेळी सांगितले.
“नागरिक मंच नागरिकांचं संरक्षण करण्यासाठी असतात. तिथल्या प्रमुखांनीच विरोध करणं चुकीचं आहे. हेल्मेटलासक्ती का केली जाते, असा प्रश्न त्यांनी (विवेवक वेलणकर) विचारला, हे चुकीचं आहे. दुचाकीवरुन सर्वाधिक अपघात होतात.” असे म्हणत दिवाकर रावते पुढे म्हणाले, “मी बैठकीत या सजग नागरिक मंचाच्या पदाधिकाऱ्यावर (विवेक वेलणकर) कारवाई करा”
“पुणे सांस्कृतिक राजधानी ओळखली जाते. म्हणून पुणेकरांनी विनंती हेल्मेटबाबत पुढाकार घ्यावा. नितीन गडकरींनी दिलेले आदेश आहेत. पुणेकर भाजपला निवडून देतात, तर भाजप मंत्र्यांच्या निर्णयाला ते मान्य करतील असं वाटतं.” असेही दिवाकर रावते म्हणाले.
दारु पिऊन वाहन चालवल्यास परवाना सहा महिन्यांसाठी निलंबित केला जाईल. तर विमा नसलेले वाहन रस्त्यावर उतरवल्यास जप्तीची कारवाई केली जाईल, असे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी स्पष्ट केले. राज्य रस्ता सुरक्षा परिषदेच्या बैठकीत वाढते अपघात रोखण्यासाठी महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.