आपत्तीग्रस्तांना पुनर्वसनासाठी तातडीने मदत करा, दरेकरांची राज्य सरकारकडे मागणी, तळीये गावातील जखमींची जे.जे. रुग्णालयात विचारपूस

आपत्तीग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी तातडीने अंमलबजावणी करावी, अन्यथा सर्व पूर्वपदावर झाल्यानंतर सरकार वरातीमागून घोडे नाचवणार असेल, योजनांवर भर देणार असेल, तर त्याचा काहीही उपयोग होणार नाही, असं विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर म्हणाले.

आपत्तीग्रस्तांना पुनर्वसनासाठी तातडीने मदत करा, दरेकरांची राज्य सरकारकडे मागणी, तळीये गावातील जखमींची जे.जे. रुग्णालयात विचारपूस
Follow us
| Updated on: Jul 26, 2021 | 11:11 PM

मुंबई : कोकणसह पश्चिम महाराष्ट्रामध्ये निसर्गाचा प्रकोप होऊन हजारो लोक आपत्तीग्रस्त झाले आहेत. त्यांचं तात्काळ पुनर्वसन करण्याची गरज आहे. या आपत्तीग्रस्तांना राज्य सरकारने तातडीने आर्थिक स्वरुपात मदत द्यावी. सरकारने या संकटाच्या परिस्थितीत केवळ इच्छाशक्ती दाखवून चालणार नाही. तर आपत्तीग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी तातडीने अंमलबजावणी करावी, अन्यथा सर्व पूर्वपदावर झाल्यानंतर सरकार वरातीमागून घोडे नाचवणार असेल, योजनांवर भर देणार असेल, तर त्याचा काहीही उपयोग होणार नाही, असं विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर म्हणाले. (Praveen Darekar inquires about the injured in Taliye and sutarkund)

दरेकर यांनी आज अतिवृष्टीमुळे दरडीखाली सापडलेल्या पोलादपूर तालुक्यातील सुतारकुंड आणि महाड येथील तळीये गावांमधील रुग्णांची मुंबईतील जे.जे. रुग्णालयात जाऊन भेट घेत विचारपूस केली. त्यावेळी संबंधित डॉक्टरांना रुग्णांची अधिक काळजी घेण्याबाबत त्यांनी सूचनाही दिल्या. त्याचबरोबर कुठलीही मदत आवश्यक असल्यास भाजप आपल्यासोबत असल्याचे आश्वासनही त्यांनी यावेळी तळीये आणि सुतारकुंड गावातील जखमी रुग्णांना दिलं.

‘बेडवर असतानाही त्यांना भविष्याची चिंता लागून राहिली आहे’

भेदरलेल्या मनस्थितीमध्ये असलेल्या लोकांना आधार आणि दिलासा देण्याची गरज आहे. जे. जे. रुग्णालयात दाखल केलेल्या रुग्णांची परिस्थिती काय आहे? त्यांच्यासाठी उपाययोजना काय आहे? हे पाहण्यासाठी आलो. आज ते बेडवर असतानाही त्यांना भविष्याची चिंता लागून राहिली आहे. हे जखमी लोक सध्या मानसिकदृष्ट्या कमकुवत झाले आहेत, असं दरेकर यावेळी म्हणाले.

राज्यात पूरग्रस्त नागिरकांचे पुनर्वसन तातडीने करण्याची आवश्यकता आहे. अत्यंत दयनीय परिस्थिति उद्भवली आहे. निसर्गाचा कोप झाल्यामुळे या गोष्टींना सामोरे जावे लागत आहे. अनेक रुग्ण स्थिरावलेले असले तरी काही रुग्णांचे हात किंवा पाय कामातून गेले आहेत. शेवटी त्यांचा जीव वाचविण्याचा डॉक्टरांचा प्रयत्न आहे. त्यामुळे सरकारने सुद्धा त्यांच्या पुनर्वसनाची काळजी घ्यावी, अशी मागणी दरेकर यांनी यावेळी केली.

संबंधित बातम्या :

Chiplun Flood : चिपळूणच्या तिवरे गावाला मुसळधार पावसाचा तडाखा, 6 ठिकाणी भूस्खलन झाल्यानं गावकरी धास्तावले!

केवळ डोकं बाहेर, सगळं अंग चिखलात रुतून, 24 तास धडपड, दरडीला गाढणाऱ्या आजीचा थरार

Praveen Darekar inquires about the injured in Taliye and sutarkund

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.