टास्क मास्टर बीएल संतोष कर्नाटकचे मुख्यमंत्री होणार? दोन की चार उपमुख्ममंत्री? वाचा सविस्तर

कर्नाटकात लिंगायत समाज हा मोठा आहे. पण लिंगायत समाजाला आता मुख्यमंत्रीपद नको अशी भूमिका येडियुरप्पांनीच जाहीर केलीय. पण तरीही कर्नाटकबहुल समाजाला दुर्लक्षित केलं जाईल याची शक्यता नाही.

टास्क मास्टर बीएल संतोष कर्नाटकचे मुख्यमंत्री होणार? दोन की चार उपमुख्ममंत्री? वाचा सविस्तर
BL Santosh Next CM of Karnataka?
Follow us
| Updated on: Jul 27, 2021 | 11:36 AM

बीएस येडियुरप्पा यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर आता मुख्यमंत्री कोण होणार यावर चांगलीच चर्चा झडतेय. अनेक नावं समोर येतायत. पण त्यात सर्वाधिक चर्चा आहे ती बी एल संतोष यांची. संतोष हे आरएसएसचे प्रचारक राहीलेले आहेत. टास्क मास्टर म्हणून ते ओळखले जातात. यूपी, असो की महाराष्ट्र, बीएल संतोष यांनी भाजपातले संघटनात्मक वाद सोडवलेत. जेपी नड्डा हे ‘ऐकूण’ घेण्यात माहिर मानले जातात तर संतोष हे त्याच्या नेमके उलटे, आहे ते कडक शब्दात ते सुनावतात अशी त्यांची ओळख. त्यांच्याच खांद्यावर आता भाजपा कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी देतेय अशी जोरदार चर्चा आहे. इंडियन एक्स्प्रेसनं तसं वृत्तही दिलंय.

कोण आहेत बी.एल. संतोष?(B.L.Santosh) संघाचे प्रचारक ही संतोष यांची खास ओळख. ते 54 वर्षांचे आहेत. इंजिनिअरींगमध्ये त्यांनी पदवी मिळवलेली आहे. कर्नाटक भाजपचे सरचिटणीस म्हणून संतोष यांनी काम केलंय. दोन वर्षापासून ते भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस म्हणूनही कार्यरत आहेत. संतोष यांचं संघटन कौशल्य वादातीत असल्याचं मानलं जातं. कर्नाटकच्या प्रत्येक विधानसभा क्षेत्रातले कार्यकर्ते संतोष यांना नावासह माहित असल्याचं अनेक जण सांगतात. पक्षात त्यांनी संतोषजी नावानेच बोललं जातं. येडियुरप्पा यांनी राजीनामा दिल्यानंतर लगेचच संतोष हे कर्नाटकात पोहोचलेले आहेत.

बंडाची भाजपला भीती? येडियुरप्पांनी राजीनामा दिल्यानंतर कर्नाटकात चांगलीच हालचाल आहे. काहींनी उघड उघड मुख्यमंत्रीपदावर दावा केलाय. त्यातच कर्नाटक हे राजकीयदृष्ट्या अस्थिर राज्य आहे. त्यामुळे बी.एल.संतोष आणि इतर भाजपा नेते हे स्वत: जेडीएस नेते एचडी रेवण्णा यांच्या संपर्कात आहेत. कारण जेडीएसचेच उपनेते बंदेप्पा काशेमपूर हे गेली चार दिवस दिल्लीत तळ ठोकून होते. येडियुरप्पांना याची कल्पना आहे, त्यामुळेच 2008 मध्ये जेडीएसनं ठरलेलं असतानाही भाजपला कशी सत्ता सोपवली नव्हती याची आठवण भाजपला करुन दिलीय.

दोन की चार उपमुख्यमंत्री? कर्नाटकात उपमुख्यमंत्रीपद तयार केलं जाणार पण नेमके किती असणार याबद्दलही राजकीय उत्सुकता आहे. कारण काहींच्या अंदाजानुसार चार उपमुख्यमंत्रीपद निर्माण करण्यावरही भाजपा विचार करतेय. यूपीच्या मॉडेलवर दोन तर केलेच जातील अशी शक्यताही बळावलीय. त्यात एसटीचा एक उपमुख्यमंत्री असेल असही सांगितलं जातंय. कर्नाटकात लिंगायत समाज हा मोठा आहे. पण लिंगायत समाजाला आता मुख्यमंत्रीपद नको अशी भूमिका येडियुरप्पांनीच जाहीर केलीय. पण तरीही कर्नाटकबहुल समाजाला दुर्लक्षित केलं जाईल याची शक्यता नाही. त्यामुळेच एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री यावर शिक्कामोर्तब होईल असं मानलं जातंय.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.